पीओएस मशिनद्वारे खत विक्रीस सुरुवात
नांदेड दि. 2:- दिनांक 01 नोव्हेंबर 2017 पासून खत खरेदी
ऑनलाईन पध्दतीने करण्याचा निर्णय
घेण्यात आला आहे. यात
जिल्हयातील 617 खत विक्रेत्यांना पॉईट
ऑफ सेल (पीओएस) मशीन
देण्यात आल्या असून खत खरेदी
करताना शेतकऱ्याच्या बोटाचा
ठसा घेऊन आधारकार्ड नंबर
नोंदविण्यात येणार आहे. त्यानुसार
शेतकऱ्याने बिलाची रक्कम अदा
करुन खत खरेदी करायचे
आहे. त्यानंतर ही नोंद
पीओएस मशीनच्या माध्यमातून केंद्रीय
सर्व्हरवर नोंद होणार आहे.
त्यानुसारच खतांवर देण्यात येणारे
अनुदान शासनाकडून संबंधित खत कंपन्यांना
देण्यात येईल. त्यामुळे अनुदानाचा
दुरुपयोग टाळता येणार असून
राज्यात 01 नोव्हेंबर 2017 पासून या पध्दतीचा
अवलंब करण्यात आलेला आहे.
जिल्हयात 609 e-Pos मशिन
कार्यान्वीत झालेली असून त्यापैकी
567 मशिन द्वारे आरंभिचा खत साठा
नोंद करण्यात आलेली आहे.
नोंद करण्यात आलेल्या मशिनवर
एकूण 13264 मे.टन खत साठा शिल्लक
दर्शविण्यात आलेला आहे. एकूण 76 टक्के
e-Pos मशिन द्वारे खत विक्री
चालू आहे.
रासायनिक खतांवर केंद्र
शासनाकडून मोठया प्रमाणात अनुदान
देण्यात येते. या अनुदानाचा
दुरुपयोग टाळावा तसेच शेतकऱ्यांना
त्याचा योग्य लाभ व्हावा, यासाठी
या पध्दतीचा अवलंब करण्यात
आलेला आहे. किरकोळ खत विक्रेत्यांना
तसेच कर्मचाऱ्यांना याबाबत
प्रशिक्षण देण्यात आले आहे.
या पध्दतीने खताची विक्री
करताना किंवा शेतकऱ्याने खत खरेदी
करताना शेतकऱ्याला आधारकार्ड असणे
आवश्यक आहे. कारण पीओएस
मशिनवर संबंधीत शेतकऱ्यांच्या बोटाचा
ठसा घेऊन त्याचा आधारकार्ड
नंबर नोंद करायचा आहे.
त्यानुसार ही कार्यवाही पूर्ण
झाल्यावर त्याला खताची विक्री
होणार आहे.नंतर त्या शेतकऱ्याने
खताच्या खरेदीची रक्कम अदा
करायची आहे. रासायनिक खत विक्री
करीता थेट लाभ हस्तांतरण
(DBT) दि.01
नोव्हेंबर 2017 पासून राज्यातील सर्व जिल्हयात
राबविण्यात येणार आहे. त्या
अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी नांदेड, मा.
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा
परिषद नांदेड यांचे अध्यक्षतेखाली रासायनिक खत उत्पादक
प्रतिनिधी, खत विक्रेते यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन आढावा
घेण्यात आला.
नांदेड जिल्हयात
दिनांक 31 ऑक्टोबर, 2017 अखेर एकूण 617
e-Pos मशिन मशिनचे वाटप विक्रेत्यांना
करण्यात आले असून त्यापैकी
567 e-Pos मशिन कार्यरत झाले व रासायनिक
खताचा साठा नोंदविण्यात आला
आहे. e-Pos मशिन मशिनवर दि.31 ऑक्टोबर,
2017 रोजी
सायंकाळ पर्यंत एकूण 13264 मे.टन रासायनिक
खताचा साठा नोंदविण्यात आला.
अतिरिक्त 428 e-Pos मशिनची मागणी नोंदविण्यात
आली होती त्यापैकी 200 e-Pos मशिनचा
पुरवठा लवकरच जिल्हयास होणार
आहे. या प्रकल्पाचे
नोडल अधिकारी तथा जिल्हाधिकारी
नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी डॉ.
तुकाराम मोटे, जिल्हा कृषि
विकास अधिकारी पंडीत मोरे
तसेच तालुका पंचायत समितीचे
सर्व कृषि अधिकारी यांच्या
मार्फत मागील 3 दिवासापासून खत विक्रेत्याकडील साठा e-Pos मशिन मध्ये नोंदविण्याचे काम
युध्द पातळीवर करण्यात आले
होते.
तरी शेतकऱ्यांनी आपले
आधारकार्ड दर्शवून रासायनिक खताची
खरेदी करावी तसेच हा प्रकल्प
जिल्हयात यशस्वीरित्या राबविला
जाईल या बाबत सर्वांनी
सहकार्य करावे असे आवाहन
मा. जिल्हाधिकारी अरुण
डोंगरे व जिल्हा
परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक
शिनगारे यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment