Tuesday, October 4, 2016

लेख -

शिकाऊ उमेदवार योजनेतून
कुशल मनुष्यबळ निर्मिती

देशातील उद्योग व्यवसायासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे हे लक्ष  डोळयासमोर ठेवून शिकाऊ  उमेदवारी अधिनियम 1961 नुसार कायद्यायचे स्वरुप देवून देशात 1 मार्च पासून शिकाऊ उमेदवार योजना अंमलात आली आहे.
या योजनेच्या स्वरुपाबाबत सांगायचे झाले तर देशातील शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी उद्योग व्यवसायाच्या गरजेप्रमाणे मनुष्यबळ  निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाने देशातील उद्योगाचे 35 गटांमध्ये वर्गीकरण केले आहे. पारंपारिक औद्योगीक क्षेत्रामध्ये एकुण 275 व्यावसाय समाविष्ट केले आहेत. यामध्ये काळानुसार व आवश्यकतेनुसार नवीन व्यवसायाचा समावेश आणि कालबाह्य झालेल्या विषयांना वगळण्यात येते.
योजनेची वैशिष्टये पुढील प्रमाणे आहेत. या  योजनेमुळे उद्योगांसाठी लागणारे मनुष्यबळ हे चांगल्या आणि कुशल दर्जाचे उपलब्ध होते. उत्पादनाचा दर्जा वाढतो आणि उद्योगाची भरभराट होते. उत्पादनाच्या खर्चात कपात होते. कच्या मालाचे नुकसान टाळले जाते. तज्ज्ञ, कुशल, प्रशिक्षित कामगारांमुळे कारखान्यातील यंत्र सामुग्रीला हानी पोहचत नाही. अपघाताचे प्रमाण कमी होते. कामगारामध्ये योग्य पध्दतीने विचार करण्याची व पुढाकार घेण्याची क्षमता निर्माण होते. प्रशिक्षित झालेले शिकाऊ उमेदवारांची भरती दोन सत्रात केली जाते. पहिले 16 जुलै ते 15 ऑक्टोबर आणि दुसरे सत्र  16 जानेवारी ते 15 एप्रिल या कालावधीत पार पडते. ज्या उमेदवारांचे वय 14 वर्ष पूर्ण आहे व ते शारिरीक दृष्ट्या सक्षम आहेत. अशा उमेदवारांना भरती केले जाते. या भरतीची माहिती निर्देशीत केलेल्या APP- 4 विवरण पत्रात 7 दिवसाच्या आत दयावी लागते. भरती करण्यात आलेल्या उमेदवाराचे मुळ कागदपत्रे आस्थापना विभागात कार्यकाळ पूर्ण होईपर्यत ठेवून घेतले जाते  व कार्यवाही समाप्ती नंतर परत केले जातात.
ब-याचदा आस्थापनेला उमेदवार मिळत नसल्यामुळे जागा रिक्त राहतात. ही अडचण दूर करण्यासाठी आस्थापनेत 100 टक्के रिक्त जागेवर भरती व्हावी व त्यांना योग्य उमेदवार निवडता यावेत म्हणून या भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.   
            भरती केलेला उमेदवार आयटीआय उत्तीर्ण असावा त्याच व्यवसायात शिकाऊ  उमेदवारी करत असेल व प्रशिक्षण कालावधीमध्ये पूर्ण सुट मिळत असेल तर त्यास फक्त सैद्धांतीक व प्रात्यक्षिक परिक्षा दयावी लागेल किंवा उमेदवार त्यांच्या व्यवसाय व्यतिरिक्त दुस-या व्यवसायात शिकाऊ उमेदवारी करत असेल  प्रशिक्षण कालावधीमध्ये अंशता सूट मिळत असेल तर आशा उमेदवारांना संपूर्ण विषयाची परिक्षा दयावी लागेल. उदा. लाईनमन, बॉयलर, फिटर स्ट्रक्चरल इत्यादी तसेच फ्रेशर, शिकाऊ उमेदवारांना संपूर्ण विषयांची परिक्षा दयावी लागेल. जसे ब्युटीशयन, अशिस्टंट, बार्बर, स्क्रीन प्रिटींग, बॅटरी रिपेअर इत्यादी अनुषांगिक वर्ग फेब्रुवारी 2007 सत्रापासून बंद करण्यात आले आहेत. या प्रशिक्षण कालावधीत 240 दिवस उपस्थिती  बंधनकारक आहे.
            भरती केलेल्या उमेदवारांना  प्रशिक्षण कालावधी दरम्यान विद्यावेतन दिले जाते. तसेच एकुण 37 रजा देण्यात येतात यामध्ये प्रथम वर्ष दरमहा आयटीआय उत्तीर्ण नाहीत अशा उमेदवारांना  किमान अर्धकुशल कामगारांचे विद्यावेतन दुस-या वर्षी आयटीआय उत्तीर्ण व शिकाऊ  उमेदवारांना 70 टक्के तर तिस-या वर्षी 80 टक्के विद्यावेतन आणि चौथ्या वर्षी यात वाढ होऊन या शिकाऊ उमेदवारांना 90 टक्के विद्यावेतन दिले जाते. तर रजा या किरकोळ 12 दिवस, वैद्यकीय 15 दिवस, असाधारण रजा वर्षातून 10 देय आहेत. भरती केलेल्या व प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांचे संविदा नोंदणी  (करारपत्र) भरती झाल्यापासून 30 दिवसाच्या आत केंद्रास पाठवणे व 90 दिवसात संविदा नोंदणी करुन घेणे आवश्यक आहे. आस्थापना व शिकाऊ  उमेदवारांनी संविदा नोंदणी वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे त्याशिवाय त्यांची निवड ग्राहय धरल्या जात नाही.
            ज्या शिकाऊ उमेदवारांचा कालावधी 15 ऑक्टोबर किंवा 15 एप्रिल पूर्वी संपतो व ते परिक्षेस बसण्याचा सर्व अटी, नियमांची पूर्तता करतात. या उमेदवारांना अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा अनुक्रमाने ऑक्टोंबर आणि एप्रिल महिन्यात व्यवसाय शिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्याकडून घेतली जाते. उतीर्ण विद्यार्थ्यांना अंतीम प्रमाणपत्र (एनएसी) प्रदान केले जाते. अशा उमेदवारांना शासनाकडून  कुशल  करागीर म्हणून संबोधले जाते.  
-         रविंद्र पी. सोनकांबळे  
9422174147
  (लेखक जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथे आंतरवासिता करीत आहेत)

0000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...