Thursday, March 31, 2022

 विष्णुपुरी प्रकल्पाजवळील काळेश्वर परिसर

आता ठरेल पर्यटनाचे प्रमुख आकर्षण 


·    पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नातून 12 कोटी 25 लक्ष रुपयांचा निधी मंजूर 

नांदेड (जिमाका) दि. 31 :-  नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी प्रकल्प हे बंदिस्त पाईपलाईनने मोठया प्रमाणात कृषि क्षेत्रासाठी  पाणी पुरवठा करणारा आशिया खंडातला पहिला प्रकल्प म्हणून ओळखला जातो. आता या वैभवात भर पडत असून काळेश्वर मंदिर परिसर हे पर्यटनासह जलक्रीडा आणि साहस यांचेही आकर्षण केंद्र म्हणून नावारुपास येईल. 

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून हे केंद्र पर्यटनाच्या दृष्टीनेही विकसित केले जाणार आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून  12 कोटी 25 लक्ष रुपये मंजूर केले आहेत. यापैकी 4 कोटी 62 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या प्रकल्पामूळे नांदेडच्या सौंदर्यात भर पडणार असून येथील पर्यटन  क्षेत्रालाही चालना मिळेल असा विश्वास पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.  

येथील जी नैसर्गिक संपदा आहे त्या संपदेला कोणताही बाधा न पोहचवता काळेश्वर परिसरातील याअनुषंगाने असणारी अत्यावश्यक कामे लवकरच पायाभूत सुविधेसह पूर्ण केल्या जातील. हा प्रकल्प केवळ पर्यटनच नव्हे तर जिल्ह्यातील युवकांच्या जलक्रीडा, पोहणे या क्षमतानाही विकसित करणारे चांगले केंद्र ठरेल असेही त्यांनी स्पष्ट केले. 

काळेश्वर विकास प्रकल्पात बोटींग क्लब, ॲडव्हेंचर पार्क याचा समावेश राहील. याठिकाणी मल्टी ॲडव्हेंचर टॉवर ॲण्ड ग्लॉन्ट स्विंग, झिप लाईन रोप कोर्सेस, मुलांच्या खेळाचे साहित्य, फ्लोटींग जेट्टी, प्लॅटफॉर्म आदी वैशिष्टपूर्ण कामे पूर्ण केली जाणार आहेत.

0000


लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 31 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. लोकशाही दिन सोमवार 4 एप्रिल 2022 दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे. 

यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. 

न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे. 

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील असे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी कळविले आहे.

00000


 नांदेड जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित नाही 

नांदेड (जिमाका) दि. 31 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 656 अहवालापैकी एकही अहवाल कोरोना बाधित आढळला नाही. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 798 एवढी असून यातील 1 लाख 105 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 रुग्ण उपचार घेत आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 1 व्यक्ती उपचार घेत आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 97 हजार 375

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 77 हजार 408

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 798

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 105

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-4

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-1

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

Wednesday, March 30, 2022

 प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने 

हेल्मेट जनजागृतीसाठी विविध उपक्रमाचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि 30 :-प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने हेल्मेटचा वापर करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दुचाकी स्वारांनी हेल्मेटचा वापर केला त्यांचे  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गुलाबपुष्प देवून नुकतेच अभिनंदन केले. याप्रसंगी उपप्रादेशिक अधिकारी अविनाश राऊत, संदीप निमसे, मोटार वाहन निरीक्षक पंकज यादव, रत्नकांत ढोबळे, पद्माकर भालेकर, सेमावानी, गवळी, राजूरकर, जारवाल, गाजुलवाड, कंधारकर, देवदे, पवळे, बुरकुले यांची उपस्थिती होती. 

या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने परिपत्रक काढण्यात आले आहे. शहरातील एसजीजीएस कॉलेज, आयटीआय येथील विद्यार्थ्यांशी  संवाद साधून हेल्मेट वापरण्याचे महत्व सांगण्यात आले. सर्व शासकीय कार्यालयात कार्यरत असलेले अधिकारी-कर्मचारी यांना  हेल्मेट वापरण्याचे महत्व सांगण्यात आले. नो हेल्मेट नो इन्ट्रीचे बॅनर व माहितीपत्रक शासकीय कार्यालयापुढे लावण्यात आले आहे. 31 मार्च पासून नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण प्रबोधनपर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर 1 एप्रिल 2022 पासून कडक हेल्मेट तपासणी मोहिम राबविण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी  प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 

 नांदेड जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित नाही 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 714 अहवालापैकी निरंक अहवाल कोरोना बाधित आले आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 798 एवढी झाली असून यातील 1 लाख 105 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 रुग्ण उपचार घेत आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. आज नांदेड नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 2 असे एकुण 2 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 1 असे एकुण 1 व्यक्ती उपचार घेत आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 96 हजार 719

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 76 हजार 756

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 798

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 105

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-05

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-1

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

 1 एप्रिल पासून विनाहेल्मेट

दुचाकी स्वारांचा परवाना होईल रद्द 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- सर्व दुचाकी स्वारांनी हेल्मेट घालुनच प्रवास करावा. विना हेल्मेट दुचाकी वाहन चालविताना आढळून आल्यास नागरिक, अधिकारी-कर्मचाऱ्यांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गंत वाहन चालकास 500 रुपये दंड व अनुज्ञप्ती (लायसन्स) 3 महिन्यासाठी निलंबित करण्यात येईल. ही मोहिम ही 1 एप्रिल 2022 पासून राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व दुचाकी वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य सचिव डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 129 मध्ये नमुद केल्यानुसार कोणतेही दोन चाकी वाहन रस्त्यावर चालवितांना हेल्मेट परिधान / घालणे हे सक्तीचे आहे. वेळोवळी मा. उच्च न्यायालय व मा. सर्वोच्च न्यायालय यांनी देखील दुचाकी वाहन चालवतांना हेल्मेट घालणे हे सक्तीचे असल्याबाबत निर्णय दिलेले आहेत. वाहन चालवितांना हेल्मेट वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. बहुतांशी दुचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असतात असे दिसून आले आहे. 

शासकीय कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणारे बहुतांशी नागरिक तसेच कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी हे विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्हयातील सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयात येणाऱ्या नागरिक, कर्मचारी व अधिकारी यांना विनाहेल्मेट दुचाकी वाहनावर प्रवास केल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे याबाबतची माहिती द्यावी असे सर्व कार्यालय प्रमुखांना परिपत्रकान्वये कळविले आहे.

000000

Tuesday, March 29, 2022

नांदेड जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित नाही 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 620 अहवालापैकी निरंक अहवाल कोरोना बाधित आले आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 798 एवढी झाली असून यातील 1 लाख 103 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 3 रुग्ण उपचार घेत आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. आज नांदेड नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 1 असे एकुण 1 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 3 असे एकुण 3 व्यक्ती उपचार घेत आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 96 हजार 5

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 76 हजार 47

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 798

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 103

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-09

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-3

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000 


 तृतीयपंथी ओळख दिनानिमित्त

मतदार नोंदणीचे विशेष शिबीर 

नांदेड (जिमाका) दि. 29 :-  आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिन म्हणून 31 मार्च हा दिवस जगभर साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत तृतीय पंथीयाच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. तेंव्हा आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी ओळखदिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील तृतीय पंथीयासाठी कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थानी आणि व्यक्तींनी या मोहिमेला सहकार्य करुन अधिकाधिक तृतीय पंथीयांनी या विशेष शिबिरात मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

सर्व पात्र तृतीयपंथीय नागरिकांची मतदार यादीत नोंदणी करणे हे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे उद्दिष्ट आहे. मुंबई शहर, उपनगर या जिल्ह्यात 27 मार्च ते 10 एप्रिल 2022 या कालावधीत तर उर्वरित महाराष्ट्रात 27 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत ही नोंदणी शिबिर राबविली जाणार आहेत. तृतीय पंथीयाकडे आवश्यक कागदपत्रे असलेली कमतरता लक्षात घेऊन भारत निवडणूक आयोगाने त्यांना कागदपत्रांबाबत सवलत देवू केली आहे. 18 ते 21 वयोगटातील ज्या तृतीय पंथी व्यक्तीकडे वयाचा कोणताही पुरावा नसेल तर त्यांच्या गुरु मॉ ने दिलेले प्रमाणपत्रही पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. तसेच 21 वर्षावरील तृतीय पंथीयाने वयाचा पुरावा म्हणून स्वत:चे वय सांगणारे प्रमाणपत्र दिल्यास ग्राह्य धरले जाते. तसेच पत्त्याचा पुरावा म्हणून संबंधित व्यक्तींच्या नावे सध्याच्या निवासस्थानी आलेले टपालसुध्दा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. या कागदपत्रानुसार नोव्हेंबर 2021 मध्ये झालेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत नांदेड जिल्ह्यात मोठया प्रमाणात तृतीय पंथीयांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे.

00000



 

जागरूक लोकसहभाग हाच

ग्रामीण भागाच्या विकासाचा मूलमंत्र  

- पालकमंत्री अशोक चव्हाण 

नांदेड, (जिमाका) दि. 29 :- लोकसहभाग हा कोणत्याही गावाच्या विकासाचा आत्मा असतो. या मूलमंत्रावर शेंबोली येथील नागरिकांनी विकास कामांना गुणात्मक दर्जा बहाल केला आहे. शासनाचा विविध योजनांच्या माध्यमातून मिळणारा निधी अधिकाधिक सदउपयोगात, दर्जेदार कामात कसा उपयोगी आणावा याचे उत्तम उदाहरण म्हणून शेंबोलीकडे पाहता येईल, या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शेंबोलीकरांचा गौरव केला. 

मुदखेड तालुक्यातील मुगट, शेंबोली येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमर राजूरकर, गोविंदराव शिंदे नागेलीकर, हरिहरराव भोसीकर, आनंद बोंढारकर, अरुणाताई कल्याणे आदी मान्यवर उपस्थित होते. 

शेंबोली गावातील सिमेंट रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. ग्रामपंचायत असलेल्या गावात एवढ्या गुणात्तमक दर्जाचा चांगला रस्ता होऊ शकतो, यावर विश्वास बसणार नाही. या गावात जवळपास 20 लाख रुपये लोकवर्गणी करुन बौद्ध विहार साकारला जातो, ही बाब सुद्धा तेवढीच भूषणावह असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगून दोन्ही कामांच्या गुत्तेदारांचा गौरव केला. ग्रामीण भागातील जनतेला प्रत्यक्ष भेटून त्यांचे म्हणणे समजून घेणे, त्यांच्या नजरेतील विकासाच्या गरजा समजून घेणे याला मी अधिक प्राधान्य देत आलो आहे. मुदखेड, भोकर व नांदेड जिल्ह्यातील बऱ्याचशा भागात पांदण रस्त्यांचा प्रश्न शेतकऱ्यांच्या चर्चेतूनच समोर आला. या प्रश्नांवर आपण जिल्हा पातळीवर एक स्वतंत्र मोहिम राबवून जिल्हा प्रशानातर्फे गती दिली. अजूनही बऱ्याच भागात शेतीकडे जाणारे लहान पांदण रस्ते होणे आवश्यक असून त्यासाठी ग्रामविकास विभाग व इतर विभागांशी चर्चा करून अधिकचा निधी कसा उपलब्ध होईल याचे नियोजन करत असल्याचे त्यांनी सांगितले.   

नांदेड जिल्ह्यात महामार्गाचे जाळे आपण मोठ्या प्रमाणात निर्माण करीत आहोत. भोकर-मुदखेड मार्गाने दोन्ही तालुके अधिक जवळ आले आहेत. आजवर दूर्लेक्षीत असलेल्या अनेक विकास योजना आपण हाती घेतल्या. जवळपास 20 कोटी 66 लक्ष रुपये एकट्या शेंबोली गावासाठी आपण मंजूर केले. आज एकुण 7 कोटी 41 लाख रुपये खर्चाच्या कामांचे भूमिपूजन केले. 13 कोटी 25 लाख रुपयांची कामे पुढच्या टप्प्यात आपण हाती घेणार आहोत. शेंबोली येथे जलव्यवस्थापनाच्यादृष्टिने पुलाच्या ठिकाणीच बंधाऱ्याच्या स्वरुपात काही करता येते का याचेही आम्ही पडताळणी करू पाहू असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ग्रामस्थांशी बोलतांना सांगितले.

ग्रामीण भागासाठी रस्ता, आरोग्य, दिवाबत्ती, पाणी हे कळीचे प्रश्न असतात. ग्रामपंचायतीने त्यांच्या पातळीवर या मूलभूत प्रश्नांसाठी योग्य व्यवस्थापन करणेही आवश्यक राहते. ग्रामीण भागातील या प्रश्नांकडे अधिक लक्ष देऊन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यात ग्रामपातळीपर्यंत भक्कम आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याचे आमदार अमर राजूरकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. ज्या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो सोडविण्यासाठी योग्य नियोजन केले आहे. या समवेत पुढील 25 वर्षात गावनिहाय असणारी लोकसंख्या लक्षात घेता किती पाणी लागेल याची ब्ल्यू प्रिंट तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला दिले असून विकासाची कोणतेही कसर राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. 

मुदखेड तालुक्यातील मुगट-रोहिपिंपळगाव रस्त्यावर दोन लहान पुलांचे बांधकाम, शेंबोली-डोंगरगाव-निवघा-खांबाळा-मुगट-धनज या मार्गावर लहान पुलांचे बांधकाम, शेंबोली-चितगिरी रस्त्यावर शेंबोली गावाजवळ मोठ्या पुलाचे पोचमार्गासह बांधकामांचा शुभारंभ आज पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.

000000

Monday, March 28, 2022

 नांदेड जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित नाही

तर एक कोरोना बाधित झाला बरा  

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 660 अहवालापैकी एकही अहवाल पॉझिटीव्ह आढळला नाही. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 798 एवढी झाली आहे. यातील 1 लाख 102 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 4 रुग्ण उपचार घेत आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील एका कोरोना बाधिताला औषध उपचारानंतर बरे झाल्याने आज सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात एकुण 4 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 95 हजार 385

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 75 हजार 456

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 798

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 102

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-10

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-4

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...