Friday, May 31, 2019


गाडेगाव येथील वाहतुक मार्गात बदल
नांदेड दि. 31 :-  नवीन रेल्वे ट्रॅकचे कामासाठी मुगट ते कामठा चौक (गाडेगाव मार्ग) हा 1 जून 2019 रोजी रात्री 8 ते 12 वाजेपर्यंत (4 तास)  बंद राहणार आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग मुगट-पुणेगाव-वाजेगाव-नांदेड व कामठा चौक-वाजेगाव बायपास मार्ग मुगट हा राहणार आहे.   
मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 व मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार प्राप्त अधिकारान्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी गाडेगाव येथील लेव्हल क्रॉसिंग रेल्वे गेट नं. 150 जवळी 355/0-1 या ठिकाणी नवीन रेल्वे ट्रॅकचे कामाकरीता वाहतूक सुरळीत व्हावी, नागरिकांची गैरसोय होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून 1 जून 2019 रोजी रात्री 8 ते 12 वाजेपर्यंत (4 तास) या कालावधीत वाहतुकीच्या मार्गात बदल केला आहे. अशी अधिसुचना 31 मे 2019 रोजी जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी पारित केली आहे.
00000


स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा जिल्हा प्रशासनातर्फे सत्कार
नांदेड दि. 31 :- युपीएससी एमपीएससी परीक्षेतील यशस्वीतांचा सत्कार जिल्हा प्रशासनातर्फे रविवार 2 जुन 2019 रोजी सकाळी 10.30 वा. डॉ. शंकरराव चव्हाण  प्रेक्षागृह नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने उज्ज्वल नांदेड मोहिम राबवली जात आहे. याअंतर्गत नांदेड जिल्हयातील युपीएससी, एमपीएससी इतर परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात येणार आहे.
                  जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या कार्यक्रमास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले, जिल्हा परीषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे तसेच जिल्हयातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी  हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या सत्कार कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
00000

नोंदणीकृत मदरसांना पायाभूत सुविधा, ग्रंथालय,
विषय शिक्षकांच्‍या वेतनासाठी सहाय्यक अनुदान  
नांदेड दि. 31 :- डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत राज्‍यातील नोंदणीकृत मदरसांना पायाभूत सुविधा, ग्रंथालय आणि विषय शिक्षकांच्‍या वेतनाकरिता सहाय्यक अनुदान सन 2019-20 अंतर्गत राज्यातील नोंदणीकृत मदरसांमध्ये पारंपारिक धार्मिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्‍यांसाठी ज्‍या मदरसांना आधुनिक शिक्षणाकरिता शास‍कीय अनुदान घेण्‍याची इच्‍छा आहे अशा मदरसांकडून अल्‍पसंख्‍यांक विकास विभाग, महाराष्‍ट्र शासन अर्ज मागवित आहे.
सदर मदरसे धर्मदाय आयुक्‍त अथवा महाराष्‍ट्र राज्‍य वक्‍फ बोर्डाकडे नोंदणीकृत असावेत. अशा मदरशानी शासन निर्णय, क्रमांक अविवि- 2010/प्र.क्र.152/10/का-6, दि.11 ऑक्‍टोबर, 2013 च्‍या तरतूदीनुसार पुढील बाबींकरिता विहित नमुन्‍यात अर्ज करावेत.  1) विज्ञान, गणित, समाजशास्‍त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू हे विषय शिकविण्‍याकरिता शिक्षकांसाठी मानधन  2) पायाभूत सुविधा व ग्रंथालयासाठी अनुदान. शासन निर्णय दि.11.10.2013 च्‍या तरतूदीनुसार मदरसा मध्‍ये नियुक्‍त केलेल्‍या जास्‍तीत जास्‍त 3 डी.एड/ बी.एड शिक्षकांना मानधन देण्‍यात येईल. विद्यार्थी व शिक्षक यांचे प्रमाण 40:1 असे राहील. शिक्षणासाठी हिंदी/इंग्रजी/मराठी/उर्दू यापैकी एका माध्‍यमाची निवड करून त्‍यानुसार शिक्षकांची नेमणूक करणे आवश्‍यक आहे. ग्रंथालयासाठी तसेच विद्यार्थ्‍यांकरिता शैक्षणिक साहित्‍यासाठी एकदाच रू. 50,000/- अनुदान देय आहे. पायाभूत सुविधासाठी जास्‍तीत जास्‍त रू.2.00 लक्ष इतक्‍या मर्यादेपर्यंत अनुदान देय आहे.
सदर योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्‍या पायाभूत सुविधा - 1) मदरशांच्‍या इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी, 2) पेय जलाची व्‍यवस्‍था करणे 3) प्रसाधन गृह उभारणे व त्‍याची डागडुजी करणे 4) विद्यार्थ्‍यांसाठी आवश्‍यक फर्निचर  5) मदरसाच्‍या निवासस्‍थानात इन्‍वहर्टरची सुविधा उपलब्‍ध करणे,  6) मदारसांच्‍या निवासी इमारतीचे नूतनीकरण व डागडुजी, 7) संगणक, हार्डवेअर, सॉफटवेअर, प्रिंटर्स इ.  8) प्रयोगशाळा साहित्‍य सायन्‍स कीट, मॅथेमॅटीक्‍स कीट व इतर अध्‍ययन साहित्‍य. योजनेंतर्गत लाभासाठी नोंदणी करून 3 वर्ष पूर्ण झालेल्‍या तसेच अल्‍पसंख्‍यांक बहुल क्षेत्रातील मदरशांना प्राधान्‍य देण्‍यात येईल. ज्‍या मदरशांना Scheme for Providing Quality Education in Madarsa (SPQEM) या केंद्र पुरस्‍कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे अशा मदरसांना ह्या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
इच्‍छुक मदरशांनी शासन निर्णय दि.11.10.2013 मध्‍ये नमूद केलेल्‍या विहित नमुन्‍यातील परिपूर्ण अर्ज आवश्‍यक कागदपत्रे जोडून जिल्‍हा नियोजन समिती, जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दिनांक 31 ऑगस्‍ट 2019 पर्यंत सादर करावा. त्‍यानंतर जिल्‍हाधिकारी कार्यालयात प्राप्‍त होणारे प्रस्‍ताव विचारात घेतले जाणार नाहीत.शासन निर्णय क्र-अविवि. 2010/प्र152.क्र/10/का-6, दिनांक 11.10.2013 व अर्जाचा नमुना,आवश्‍यक कागदपत्रांची  यादी http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे.
000000

धार्मिक अल्‍पसंख्‍याक विद्यार्थी बहुल शासनमान्‍य शाळांमध्‍ये
पायाभूत सोयी सुविधा पुरविण्‍यासाठी अनुदान योजना

नांदेड दि. 31 :- जिल्‍ह्यातील धार्मिक अल्‍पसंख्‍याक विद्यार्थी बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, नगरपालिका/ नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्‍ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्‍यासाठी अनुदान सन 2019-20 योजनेंतर्गत कमाल 2 लाख रुपयांचा अनुदानाचा लाभ घेण्‍यासाठी विहीत नमुन्‍यात अर्ज मागविण्‍यात येत आहेत.
योजनेच्‍या अटी व शर्ती- शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था,  नगरपालिका/ नगरपरिषद शाळांमध्‍ये अल्‍पसंख्‍यांक समाजाचे (मुस्लिम, बौध्‍द, ख्रिश्चन, जैन, शिख, व पारसी मिळून) किमान 70% विद्यार्थी शिकत असणे आवश्‍यक आहे. शासन मान्‍यताप्राप्‍त अपंगाच्‍या शाळांमध्‍ये किमान 50% अल्‍पसंख्‍यांक विद्यार्थी शिकत असणे आवश्‍यक आहे.
या योजनेंतर्गत अनज्ञेय असलेल्‍या पायाभूत सोयी-सुविधा -    1)  शाळेच्‍या इमारतींचे नुतनीकरण व डागडुजी,   2)  शुध्‍द पेयजलाची व्‍यवस्‍था करणे,    3)  ग्रंथालय अद्ययावत करणे,   4)  प्रयोगशाळा उभारणे/ अद्यावत करणे,   5)  संगणक कक्ष उभारणे/ अद्यावत करणे,   6)  प्रसाधनगृह/ स्‍वच्‍छतागृह उभारणे/ डागडुजी करणे, 7)  विद्यार्थ्‍यांसाठी आवश्‍यक फर्निचर,   8)  इन्‍व्‍हर्टर/ जनरेटरची सुविधा निर्माण करणे,  9)  झेरॉक्‍स मशीन, 10) अध्‍ययनाची साधने (Learning Material)/ एल.सी.डी.प्रोजेक्‍टर, अध्‍ययनासाठी लागणारे विविध सॉफटवेअर, इत्‍यादी. 11) इंग्रजी लॅंग्‍वेज लॅब 12) संगणक हार्डवेअर/ सॉफ्टवेअर इच्‍छुक शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, नगरपालिका/ नगरपरिषद शाळा व अपंग शाळांनी संपूर्ण भरलेला अर्ज जिल्‍हा नियोजन समिती, जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दिनांक 31 ऑगस्‍ट 2019 पर्यंत सादर करावा.
या योजनेंतर्गत यापूर्वी 5 वेळा अनुदान घेतलेल्‍या शाळा/ संस्‍था या वर्षी अनुदानास पात्र असणार नाहीत.विहित मुदतीनंतर प्राप्‍त झालेले प्रस्‍ताव ग्राह धरले जाणार नाहीत. शासन निर्णय व अर्जाचा नमुना https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष उच्चस्तरीय निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांनी केले आहे.
00000

वादळी वीज पडतांना स्‍वत:चा बचाव कसा करावा .... 
       नांदेड दि. 31 :- दरवर्षी जगात विजा पडुन होणा-या मृत्‍युंचे प्रमाण हे खपुच जास्‍त आहे. नांदेड जिल्‍हयात वारंवार विजा पडुन मोठया प्रमाणावर वित्‍त आणि जीवितहानि झालेली आहे. निश्चितच ही बाब जिल्‍हा प्रशासनासाठी चिंतेचे कारण बनलेली असुन याबाबत सखोल संशोधन करण्‍यासाठी भारतीय उष्‍णदेशीय मौसम विज्ञान संस्‍थान, पृथ्‍वी विज्ञान,मंत्रालय भारत सरकार, पुणे येथील दोन वरीष्‍ठ शास्‍त्रज्ञांनी नांदेड जिल्‍हयातील विज प्रवण गावांना भेटी दिल्‍या होत्‍या तसेच त्‍यांचा संशोधनाचा अहवाल जिल्‍हा प्रशासनास पाठविलेला होता.
वादळी व पावसाळी विजेपासुन स्‍वतःचा बचाव करण्‍यासाठी
वादळी वातावरणात खालील खबरदारी घ्‍यावी:
1.      उंच झाड किंवा लोखंडी कुंपन/खांबाजवळ थांबु नका.
2.      उंच झाड कोसळणा-या विजेला आकर्षित करतात.
3.      डोक्‍यावर असलेले विजेचे तार अथवा लोखंडी आच्‍छादनाखाली आश्रय घेऊ नका.
4.    विजेचा कडकडाट होतांना टेलिव्हिजन संच बंद करा. दार/खिडकीतुन बाहेर डोकावु नका.
5.     विजेचा कडकडाट होतांना जवळ पास आश्रय उपलब्‍ध नसल्‍यास खाली बसुन जा... कारण विज ही उंचीच्‍या ठिकाणी कोसळते.
6.      वाहनावर असाल तर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍या.
7.     विज कोसळण्‍यापुर्वी मोठा प्रकाश होतो व त्‍यानंतर पाच ते आठ सेकंदांनी विज कोसळते. आवाजापेक्षा प्रकाशाची गती जास्‍त असल्‍यामुळे हे घडते त्‍यामुळे अशा वेळी सावध रहा.
8.     शेतात खुल्‍या ठिकाणी लहान झोपडी बांधुन घ्‍यावी, ज्‍यामुळे आकाशात विजा चमकतात तेव्‍हा या ठिकाणी आसरा घेता येते. ही जागा उंच झाड अथवा मनो-याच्‍या ठिकाणापासुन दुर असावी, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर  यांनी केले आहे.
00000

जिल्हा रुग्णालयात जागतिक तंबाखू नकार दिन साजरा
नांदेड दि. 31 :- जागत्तिक तंबाखू नकार दिनानिमित्त आज श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.पी.कदम व अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. 
या दिनाचे औचित्य साधून ३१ मे ते ३० जून पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालय व जिल्हा रुग्णालय या मध्ये ३० वर्षावरील सर्वांचे मौखिक तपासणी करण्यात येणार असून सदर तपासणी मोहिमेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कदम यांनी केले आहे.
यावेळी अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी बाह्यरुग्ण विभागात उपस्थित रुग्ण व नातेवाईक यांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत मार्गदर्शन केले तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दिपक हजारी तथा अन्न सुरक्षा अधिकारी श्री कावळे यांनी उपस्थितांना कोटपा कायदा २००३ बाबत माहिती दिली.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.साईप्रसाद शिंदे यांनी केले, डॉ.सौ.अर्चना तिवारी यांना उपस्थितांना तंबाखूमुक्तीसाठी शपथ दिली. तसेच जिल्हा रुग्णालयातील डॉ.हनमंत पाटील, डॉ.दीपक गोरे व सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी गायकवाड परिश्रम घेतले. 
00000

प्रधानमंत्री पिक विमा योजना : खरीप हंगाम
नांदेड दि. 31 :- प्रधानमंत्री पिक विमा योजना महाराष्ट्र राज्यात खरीप हंगाम 2019 मध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचीत क्षेत्रातील अधिसुचीत पिकांसाठी बंधन कारक असुन, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.
या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार असुन, खरीप हंगामातील पिकांसाठी 2 टक्के व कापसासाठी 5 टक्के ठेवण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत जोखीम स्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे. पिक पेरणीपासुन काढणीपर्यंतचा कालावधी नैसर्गीक आग,विज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पुर, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग ईत्यादी बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणीपश्चात नुकसान ईत्यादी जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे.नांदेड जिल्हयातील भात, खरीप ज्वारी, तीळ, मुग, उडीद, तुर, सोयाबीन व कापुस या पिकांसाठी ही योजना लागु आहे.
या योजने अंतर्गत विमा संरक्षीत रक्कम व विमा हप्ता पुढील प्रमाणे राहणार आहे.
पीक
विमा संरक्षीत रक्कम रु./हेक्टर
शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता (रु)
भात
43500/-
870/-
ख.ज्वार
24500/-
490/-
तुर
31500/-
630/-
मुग
19000/-
380/-
उडीद
19000/-
380/-
सोयाबीन
43000/-
860/-
तीळ
23100/-
462/-
कापुस
43000/-
2150/-

कर्जदार शेतकऱ्यांना व बिगर कर्जदार शेतक-यांना पिक विमा उतरवण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2019 ही आहे. अधिकच्या माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषि अधिकारी किंवा जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


हवामान आधारीत फळपिक विमा योजना 
नांदेड दि. 31 :- प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुर्नरचीत हवामानावर योजना सन 2019-20 मध्ये राबविण्याकरीता लागु करण्यासाठी शासनाने 22 मे 2019 च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिलेली आहे. नांदेड जिल्हयातील मृग बहारामधील मोसंबी या फळपिकाचा यामध्ये समावेश केलेला आहे.
ही योजना नांदेड जिल्हयातील अधिसुचीत केलेल्या महसुल मंडळात एस.बी.आय.जनरल इंशुरन्स विमा कंपनी लि. मार्फत राबविण्यात येत आहे. मोसंबी फळपिकाखालील नांदेड तालुक्यामध्ये लिंबगाव, विष्णूपुरी, मुदखेड तालुक्यात मुदखेड, बारड, मुखेड तालुक्यात मुखेड व जाहुर, धर्माबाद तालुक्यात करखेली, हदगांव तालुक्यात हदगाव व पिंपरखेड, कंधार तालुक्यात बारुळ या महसुल मंडळांचा समावेश आहे. पुर्नरचीत हवामान आधारीत पिक विमा योजना 2019-20 च्या मृग बहाराकरीता मोसंबी या पिकासाठी एकुण विमा संरक्षीत रक्कम (प्रति हे.) रु.77,000/- असुन शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता (प्रति हे) रु. 3,850/- एवढा आहे.
मृग बहारामधील मोसंबी फळपिकाचा विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत  दिनांक 1 जुलै 2019 अशी आहे. त्याकरीता इच्छुक मोसंबी उत्पादक शेतकरी बंधुंना आव्हान करण्यात येते की, विहित मुदतीत विमा हप्ता बँकेत भरावा. अधिक माहितीसाठी आपल्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

Thursday, May 30, 2019

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या
पोटनिवडणूकीचा कार्यक्रम


       नांदेड, दि. 30:- महाराष्‍ट्र पंचायत समित्‍या (निर्वाचक गण आणि निवडणूक घेणे) नियम, 1962 यांचा  नियम 13, पोट-नियम (1) याद्वारे प्रदान करण्‍यात आलेल्‍या अधिकाराचा वापर करून अरुण डोंगरे, जिल्‍हाधिकारी, यांनी जिल्‍हा नांदेड याव्‍दारे यासोबतच्‍या अनुसूचिच्‍या स्‍तंभ (1) मध्‍ये निर्दिष्‍ट करण्‍यात आलेल्‍या निर्वाचक गणाकडून (ज्‍यांचा  यात यापुढे निर्देश संबंधित निर्वाचक गण असा करण्‍यात आलेला आहे) केल्‍या जाणा-या निवडणूकीच्‍या संबंधात, पुढीलप्रमाणे तारीख, वेळ व जागा निश्चित करीत आहे.
संबंधित निर्वाचक गणांसमोर उक्‍त अनुसूचीच्‍या स्‍तंभ (2) मध्‍ये विनिर्दिष्‍ट करण्‍यात आलेली तारीख व वेळ ही संबंधित निर्वाचक गणांच्‍या संबंधातील नामनिर्देशनपत्रे सादर करण्‍यासाठी अखेरीची तारीख व वेळ असेल ; उक्‍त अनुसूचीच्‍या स्‍तंभ (3) मध्‍ये, निर्वाचक गणापुढे अनुक्रमे विनिर्दिष्‍ट केलेली तारीख आणि वेळ संबंधित निर्वाचक गणाच्‍या बाबतीत नामनिर्देशनपत्राच्‍या छाननीसाठीची तारीख व वेळ असेल ; उक्‍त अनुसूचीच्‍या स्‍तंभ (4) मध्‍ये, संबंधित निर्वाचक गणापुढे अनुक्रमे विनिर्दिष्‍ट केलेली ठिकाणे ही, नामनिर्देशनपत्रे सादर करण्‍याची आणि त्‍यांची छाननी करण्‍याची ठिकाणे असतील.
उक्‍त अनुसूचीच्‍या स्‍तंभ (5) मध्‍ये, संबंधित निर्वाचक गणापुढे अनुक्रमे विनिर्दिष्‍ट केलेली तारीख ही संबंधित पंचायत समितीसाठी व्‍यक्‍तीची निवडणूक ज्‍या तारखेस घेण्‍यात येईल ती तारीख असेल ;  उक्‍त अनुसूचीच्‍या स्‍तंभ 6 मध्‍ये, निर्वाचक गणापुढे अनुक्रमे विनिर्दिष्‍ट केलेली वेळ ही, ज्‍यावेळी मतदान घेण्‍यात येईल ती वेळ असेल ;’ उक्‍त अनुसूचीच्‍या स्‍तंभ (7) मध्‍ये निर्वाचक गणापुढे विनिर्दिष्‍ट केलेली तारीख व वेळ ही, मतमोजणीची तारीख व वेळ असेल ; (क)उक्‍त अनुसूचीच्‍या स्‍तंभ (8) मध्‍ये, निर्वाचक गणापुढे अनुक्रमे विनिर्दिष्‍ट केलेली ठिकाणे ही, मतमोजणीची ठिकाणे असतील.

अनुसूची
निर्वाचक गणाचा क्रमांक व  नांव
नामनिर्देशन पत्र सादर करण्‍यासाठी शेवटची तारीख व वेळ
नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्‍यासाठी तारीख व वेळ
नामनिर्देशनपत्रे सादर करण्‍याची व त्‍यांची छाननी करणे यासाठीची जागा
आवश्‍यकता असल्‍यास, ज्‍या  ज्‍या तारखेस मतदान घेण्‍यात  येईल ती तारीख
ज्‍यावेळी मतदान घेण्‍यात येईल ती वेळ
मतमोजणीची तारीख व वेळ
मतमोजणीची ठिकाणे
1
2
3
4
5
6
7
8
01-
वाई बा.
मा. माहुर
सोमवार, 03 जून , 2019
(सकाळी 11 ते दु.3 पर्यंत)
ते शनिवार 08 जून , 2019
(सकाळी 11 ते दु.3 पर्यंत)
(बुधवार दि.05/06/2019 रोजी सार्व.सुट्टी असल्‍याने नामनिर्देशनपत्र स्विकारण्‍यात येणार नाहीत.)
सोमवार, 10 जून , 2019
(सकाळी 11 वाजेपासुन)
तहसिलदार, माहुर यांचा कक्ष, तहसिल कार्यालय, माहुर
रविवार, 23, जून , 2019

सकाळी 7.30  ते 5.30 पर्यंत
सोमवार, 24, जून , 2019
(सकाळी 10.00 पासुन)
तहसिलदार, माहुर यांचा कक्ष, तहसिल कार्यालय, माहुर
67- अटकळी ता.बिलोली
तहसिलदार, बिलोली यांचा कक्ष, तहसिल कार्यालय, बिलोली
तहसिलदार, बिलोली यांचा कक्ष, तहसिल कार्यालय, बिलोली
103-
जांब बु. ता.मुखेड
तहसिलदार, मुखेड यांचा कक्ष, तहसिल कार्यालय, मुखेड
तहसिलदार, मुखेड यांचा कक्ष, तहसिल कार्यालय, मुखेड

तळटीपः-
टप्‍पे
कार्यक्रमाचा दिनांक
1
निवडणुकीच्‍या तारखांची सुचना व निवडणुकीचा कार्यक्रम जिल्‍हाधिका-यांनी प्रसिध्‍द करण्‍याची तारीख
सोमवार, 03 जून , 2019
2
संकेतस्‍थळावर भरण्‍यात आलेले नामनिर्देशनपत्र निर्वाचन अधिका-यांनी स्विकारण्‍याचा कालावधी
सोमवार, 03 जून , 2019
(सकाळी 11 ते दु.3 पर्यंत)
ते शनिवार 08 जून , 2019
(सकाळी 11 ते दु.3 पर्यंत)
(बुधवार दि.05/06/2019 रोजी सार्व.सुट्टी असल्‍याने नामनिर्देशनपत्र स्विकारण्‍यात येणार नाहीत.)
3
नामनिर्देशनपत्राची छाननी व त्‍यावर निर्णय देणे.
सोमवार, 10 जून , 2019       
(सकाळी 11 वाजेपासुन)  
4
वैध उमेदवारांची यादी प्रसिध्‍द करण्‍याचा दिनांक
सोमवार, 10 जून , 2019       
(छाननीनंतर लगेच)  
5
नामनिर्देशनपत्राचा स्विकार करण्‍याबाबत किंवा ते नामंजुर करण्‍याबाबतचा निवडणुक निर्णय अधिका-याने दिलेल्‍या निर्णयाविरुध्‍द जिल्‍हा न्‍यायाधिशांकडे अपिल करण्‍याची शेवटची तारीख
गुरुवार, 13 जून , 2019
6
जिल्‍हा न्‍यायाधिशांनी अपिलावर सुनावणी व निकाल देण्‍याची संभाव्‍य शेवटची तारीख
सोमवार, 17 जून , 2019
7
जिल्‍हा न्‍यायाधिशांनी अपिल निकालात काढल्‍यावर वैध उमेदवारांची यादी प्रसिध्‍द करणे.
सोमवार, 17 जून , 2019
8
उमेदवारी मागे घेणे.
(अ) जेथे अपील नाही तेथे
शनिवार, 15 जून , 2019      
(सकाळी 11 ते दु.3 पर्यंत)
(ब) जेथे अपील आहे तेथे
बुधवार, 19 जून , 2019      
(सकाळी 11 ते दु.3 पर्यंत)
9
निवडणुका लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्‍द करणे व निशाणी वाटप-                  
(अ) जेथे अपील नाही तेथे
शनिवार, 15 जून , 2019       
(दुपारी 3.30 नंतर)
(ब) जेथे अपिल आहे जेथे
बुधवार, 19 जून , 2019        
(दुपारी 3.30 नंतर)
10
मतदानाची तारीख
रविवार, 23, जून , 2019        
(सकाळी 7.30  ते 5.30 पर्यंत)
11
मतमोजणीची तारीख
सोमवार, 24, जून , 2019        
(सकाळी 10.00 पासुन)
12
निवडणुक आलेल्‍या सदस्‍यांची नावे प्रसिध्‍द करणे.
गुरुवार, 27 जून , 2019 पर्यंत

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...