वृत्त क्रमांक 1186
सैनिक कल्याण विभागात लिपिक टंकलेखक पदासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
वृत्त क्रमांक 1186
सैनिक कल्याण विभागात लिपिक टंकलेखक पदासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
वृत्त क्रमांक 1185
राष्ट्रीय लोकअदालतीचे जिल्ह्यात 13 डिसेंबर रोजी आयोजन
नांदेड, दि. 10 नोव्हेंबर :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष सुनिल वेदपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्यातर्फे शनिवार 13 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्हयातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, धनादेश अनादरीत झाल्याबाबत प्रकरणे, तसेच कौटुंबिक न्यायालयातील तडजोड होण्यायोग्य प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण मंच, सहकार न्यायालय व कामगार न्यायालयातील प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
या शिवाय सदर लोकअदालतीत दाखलपूर्व प्रकरणे जसे थकीत मालमत्ता कर, थकीत विद्युत बिल, थकीत टेलीफोन बिल, विविध बॅकांचे कर्ज वसुली प्रकरणे, थकीत पाणीबिल, ईत्यादी प्रकरणे तडजोडीव्दारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये झालेल्या निवाडयाविरूद्ध अपील नाही. प्रलंबित प्रकरणात भरलेली कोर्ट फीची रक्कम 100 टक्के परत मिळते. नातेसंबधात कटुता निर्माण होत नाही. अशाप्रकारे लोकन्यायालयाच्या माध्यमातुन सुलभ, जलद व मोफत न्याय मिळतो.
या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष सुनिल गं. वेदपाठक यांनी केले आहे. तसेच सर्व पक्षकारांनी तडजोडीसाठी येताना आपले अधिकृत ओळखपत्र सोबत घेवून यावे व राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
000000
वृत्त क्रमांक 1184
सरदार @१५० पदयात्रेचे आज आयोजन
माय भारत नांदेड कार्यालयाचा उपक्रम
नांदेड, दि. १० नोव्हेंबर २०२५ : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त “माय भारत”, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने सरदार @१५० पदयात्रेचे आयोजन उद्या मंगळवार ११ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेनुसार, दक्षिण नांदेडची पदयात्रा ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी यशस्वीरीत्या संपन्न झाली असून, आता उत्तर नांदेड पदयात्रा उद्या ११ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
ही पदयात्रा महात्मा फुले पुतळा, नांदेड येथून सकाळी ८ वाजता प्रारंभ होऊन व्ही.आय.पी. रोडमार्गे अण्णा भाऊ साठे पुतळा येथे पोहोचेल आणि त्याच मार्गाने परत येऊन औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), नांदेड येथे सांस्कृतिक कार्यक्रमासह समारोप करण्यात येईल.
या पदयात्रेत शहरातील शाळा, महाविद्यालयांतील युवक-युवती, महिला मंडळे तसेच विविध युवा मंडळांचे पदाधिकारी सहभागी होतील.
जास्तीत जास्त युवक-युवतींनी या पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन माय भारतच्या जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर यांनी केले आहे.
0000
वृत्त क्रमांक 1183
भूकरमापक पदांसाठी 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन परीक्षा
नांदेड, दि. 10 नोव्हेंबर :- भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमूह 4 (भूकरमापक) संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता 13 आणि 14 नोव्हेंबर 2025 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक आणि उमेदवारांच्या प्रवेशपत्राची लिंक विभागाच्या https://mahabhumi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे यांनी कळविले आहे.
भूमि अभिलेख विभागातील उपरोक्त रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता 1 ऑक्टोबर 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार विहीत कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी गुरूवार 13 नोव्हेंबर रोजी पहिल्या सत्रात पुणे आणि अमरावती विभागात परीक्षा होणार असून या विभागात परीक्षा केंद्र असणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 8 वाजता उपस्थित राहावयाचे आहे. तर दुसऱ्या सत्रात नाशिक आणि नागपूर विभागांमध्ये केंद्र असणाऱ्या उमेदवारांनी दुपारी 12 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावयाचे आहे. शुक्रवार 14 नोव्हेंबर रोजी पहिल्या सत्रात मुंबई (कोकण) विभागात परीक्षा केंद्र असणाऱ्या उमेदवारांनी सकाळी 8 वाजता तर दुसऱ्या सत्रात छत्रपती संभाजीनगर विभागात केंद्र असणाऱ्या उमेदवारांनी दुपारी 12 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावयाचे आहे.
पात्र उमेदवारांने संबंधित संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सूचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेण्याचे असून प्रवेशपत्रावर नमुद परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावयाची आहे. परीक्षा केंद्र बदलण्याबाबतच्या कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाही. सामान्य प्रशासन विभागाकडील 4 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाइन पद्धतीने परीक्षेच आयोजन करण्यात येणार असल्यामुळे उमेदवाराचे परीक्षा केंद्र हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्हा, तालुका अथवा इतर ठिकाणी असून शकते. तसेच काही अपरिहार्य कारणास्तव परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल झाल्यास त्याबाबतची माहिती विभागाच्या https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
या परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहितीपुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे भूमि अभिलेख कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
00000
वृत्त क्रमांक 1182
निवडणूक कालावधीत शस्त्रे बाळगणे व वाहून नेण्यावर निर्बंध
नांदेड दि.9 नोव्हेंबर:- राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर केला आहे. त्यादिवशीपासून जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यक्षेत्रात आचार संहिता लागू झाली आहे.
या निवडणुकीची प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडण्याच्या दृष्टीने शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 22 (1) (ख) नुसार आणि भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये निवडणूकीचे कालावधीत शासकीय कर्तव्य पार पाडणारे अधिकारी व कर्मचारी तसेच बँकेचे सुरक्षा गार्ड यांच्या व्यतिरिक्त इतर सर्व परवानाधारकास परवान्यातील शस्त्रास्त्रे बाळगण्यास व वाहून नेण्यास प्रतिबंधीत करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत.
हा आदेश नांदेड जिल्ह्यातील बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगांव, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी, भोकर, किनवट, लोहा या नगरपरिषदा व हिमायतनगर नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात तसेच संपूर्ण जिल्ह्यात हा आदेश निर्गमित झाल्यापासून ते 3 डिसेंबर 2025 पर्यत अंमलात राहील.
00000
वृत्त क्रमांक 1181
शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेची विरुपता करण्यास निर्बंध
नांदेड दि.9 नोव्हेंबर:- राज्य निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित केला आहे. त्यादिवशीपासून निवडणूक कार्यक्षेत्रात आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.
निवडणुकीची प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडण्याच्या दृष्टीने भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार जिल्ह्यात देगलूर, भोकर, धर्माबाद, किनवट, उमरी, हदगांव, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड, लोहा या 12 नगरपरिषदांसह, हिमायतनगर नगरपंचायतीच्या निवडणुक कालावधीत शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विरुपता करण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे. हा आदेश सदर नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचे कार्यक्षेत्रात आदेश निर्गमित झाल्यापासून 3 डिसेंबर 2025 पर्यत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत.
0000
वृत्त क्रमांक 1180
निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर
पक्ष प्रचाराचे कापडी फलके, झेंडे लावणे इत्यादी बाबीस प्रतिबंध
नांदेड दि. 9 नोव्हेंबर:- राज्य निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदांसह एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित केला आहे. त्यादिवशीपासून निवडणूक कार्यक्षेत्रात आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.
नांदेड जिल्ह्यातील नगर परिषद/नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असून, या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी यादृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार स्थानिक स्वराज्य मतदारसंघ कार्यक्षेत्रासह नांदेड जिल्ह्यात निवडणूक कालावधीत प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणे इत्यादी बाबीसाठी प्रतिबंध केला आहे असे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहे. फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रीन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून 2 फुट उंची पेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनावर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजुनेच लावण्यात यावा. इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही. फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी यांच्या वाहना व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनावर लावता येणार नाही.
हा आदेश नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ कार्यक्षेत्रात निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यत म्हणजेच दि. 3 डिसेंबर 2025 पर्यत अंमलात राहील.
00000
वृत्त क्रमांक 1179
शासकीय वाहनाच्या गैरवापरास प्रतिबंध
नांदेड दि.9 नोव्हेंबर:- राज्य निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदांसह एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित केला आहे. त्यादिवशीपासून निवडणूक कार्यक्षेत्रात आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.
नांदेड जिल्ह्यातील नगर परिषद/नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असून, या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी यादृष्टीने भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार स्थानिक स्वराज्य मतदारसंघ कार्यक्षेत्रात नांदेड जिल्ह्यात निवडणूक कालावधीत तीनपैक्षा अधिक मोटारगाड्या, वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत.
हा आदेश नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ कार्यक्षेत्रात निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यत म्हणजेच दि. 3 डिसेंबर 2025 पर्यत अंमलात राहील.
00000
वृत्त क्रमांक 1178
कार्यालये, विश्रामगृहे इत्याडी परिसरात
मिरवणूका, घोषणा, उपोषण, सभा घेण्यावर निर्बंध
नांदेड दि.9 नोव्हेंबर:- राज्य निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदांसह एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित केला आहे. त्यादिवशीपासून निवडणूक कार्यक्षेत्रात आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.
नांदेड जिल्ह्यातील नगर परिषद/नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असून, या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी यादृष्टीने भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार स्थानिक स्वराज्य मतदारसंघ कार्यक्षेत्रात निवडणूक कालावधीत शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालये, विश्रामगृहे इत्यादी परिसरात मिरवणूका घोषणा देणे, सभा घेणे इत्यादीवर निर्बंध घातले आहेत, याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहे. हा आदेश नांदेड जिल्ह्यातील देगलूर, भोकर, धर्माबाद, किनवट, उमरी, हदगांव, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड, लोहा, नगरपरिषदांसह, हिमायतनगर नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आदेश निर्गमित झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यत दि. 3 डिसेंबर 2025 पर्यत अंमलात राहील.
00000
वृत्त क्रमांक 1177
ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापरावर नियमन व नियंत्रण
नांदेड दि.9 नोव्हेंबर:- राज्य निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदांसह एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित केला आहे. त्यादिवशीपासून निवडणूक कार्यक्षेत्रात आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.
नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी यादृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार स्थानिक स्वराज्य मतदारसंघ कार्यक्षेत्रात निवडणूक कालावधीत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाच्या वापरावर निर्बंध घातले आहेत.
कोणताही व्यक्ती, संस्था, पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते यांना ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय करता येणार नाही. फिरत्या वाहनांवर ध्वनीक्षेप व ध्वनीवर्धकाचा वापर करता येणार नाही. महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग, शासन निर्णय क्रमांक ध्वनीप्र 2009/प्र.क्र.12/08/ता.क्र.1 दिनांक 31 जुलै 2013 नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर ध्वनी प्रदुषणाची पातळी विहित मर्यादेत राखून करावी. ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर सकाळी 6 वाजेपूर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर करता येणार नाही असे आदेश जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहे.
हा आदेश नांदेड जिल्ह्यातील देगलूर, भोकर, धर्माबाद, किनवट, उमरी, हदगांव, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड, लोहा, नगरपरिषदांसह, हिमायतनगर नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आदेश निर्गमित झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यत दि. 3 डिसेंबर 2025 पर्यत अंमलात राहील.
00000
वृत्त क्रमांक 1176
धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाजवळ
तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास प्रतिबंध
नांदेड दि.9 नोव्हेंबर:- नांदेड दि.9 नोव्हेंबर:- राज्य निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदांसह एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित केला आहे. त्यादिवशीपासून निवडणूक कार्यक्षेत्रात आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी यादृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार स्थानिक स्वराज्य मतदारसंघ कार्यक्षेत्रात निवडणूक कालावधीत धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणा जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर प्रतिबंधीत केले आहे असे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत.
हा आदेश नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ कार्यक्षेत्रात आदेश निर्गमित झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यत म्हणजेच दि. 3 डिसेंबर 2025 पर्यत अंमलात राहील.
00000
वृत्त क्रमांक 1175
निवडणूक कालावधीत शासकीय, निमशासकीय विश्रामगृहाच्या वापरावर नियंत्रण
नांदेड दि.9 नोव्हेंबर:- राज्य निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदांसह एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित केला आहे. त्यादिवशीपासून निवडणूक कार्यक्षेत्रात आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.
नांदेड जिल्ह्यातील नगर परिषद/नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी यादृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार शासकीय व निवडणूकीच्या कामावर असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त , इतर कोणत्याही व्यक्तीस स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ कार्यक्षेत्रासह नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय विश्रामगृहाच्या वापर करणे संबंधित विभागाने अधिकृत परवाना असल्याशिवाय किंवा सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्व परवानगी शिवाय प्रवेश करण्यास प्रतिबंध केला आहे.
हे आदेश स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ कार्यक्षेत्रासह नांदेड जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दि. 3 डिसेंबर, 2025 पर्यंत अंमलात राहतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी आदेश निर्गमित केले आहे.
0000
वृत्त क्रमांक 1174
उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस अवलंब करावयाची कार्यपध्दत
नांदेड दि.9 नोव्हेंबर:- राज्य निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदांसह एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित केला आहे. त्यादिवशीपासून निवडणूक कार्यक्षेत्रात आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.
देगलूर, भोकर, धर्माबाद, किनवट, उमरी, हदगांव, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड, लोहा या 12 नगरपरिषदांसह, हिमायतनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी यादृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार उमेदवारांने नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळेस अवलंब करावयाची कार्यपध्दतीबाबत आदेश निर्गमित केले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषद व एका नगरपंचायतीच्या निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या 100 मी. च्या बाहेर वाहने व मिरवणूक थांबवावी व वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहनांना, तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात उमेदवारासोबत सूचक, अनुमोदक अथवा दोन व्यक्ती असे तीन पेक्षा जास्त व्यक्तीना तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूका, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणने आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे असे, आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत.
हा आदेश नांदेड जिल्ह्यातील सर्व 12 नगरपरिषद एका नगरपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाच्या हद्दीत 10 नोव्हेंबरचे सकाळी 6 वाजेपासून ते 26 नोव्हेंबर 2025 चे मध्यरात्रीपर्यत अंमलात राहील.
00000
वृत्त क्रमांक 1173
सार्वजनिक ठिकाणी पक्षांचे चित्रे, कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषणावर निर्बंध
नांदेड दि.9 नोव्हेंबर:- राज्य निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदांसह एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित केला आहे. त्यादिवशीपासून निवडणूक कार्यक्षेत्रात आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.
देगलूर, भोकर, धर्माबाद, किनवट, उमरी, हदगांव, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड, लोहा या 12 नगरपरिषदांसह, हिमायतनगर नगरपंचायतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी यादृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यक्षेत्रात निवडणूक कालावधीत सार्वजनिक ठिकाणी पक्षांचे चित्रे, चिन्हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण देण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे असे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत.
हा आदेश नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ कार्यक्षेत्रात आदेश निर्गमित झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यत म्हणजेच दि. 3 डिसेंबर 2025 पर्यत अंमलात राहील.
00000
वृत्त क्रमांक 1172
निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
वृत्त क्रमांक 1277 जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध नांदेड (जिमाका) , दि . 5 :- जिल्हा माहिती कार्यालय , नांदे...