Monday, November 10, 2025

वृत्त क्रमांक 1184

सरदार @१५० पदयात्रेचे आज आयोजन

माय भारत नांदेड कार्यालयाचा उपक्रम

नांदेड, दि. १० नोव्हेंबर २०२५ : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त “माय भारत”, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने सरदार @१५० पदयात्रेचे आयोजन उद्या मंगळवार ११ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेनुसार, दक्षिण नांदेडची पदयात्रा ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी यशस्वीरीत्या संपन्न झाली असून, आता उत्तर नांदेड पदयात्रा उद्या ११ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

ही पदयात्रा महात्मा फुले पुतळा, नांदेड येथून सकाळी ८ वाजता प्रारंभ होऊन व्ही.आय.पी. रोडमार्गे अण्णा भाऊ साठे पुतळा येथे पोहोचेल आणि त्याच मार्गाने परत येऊन औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), नांदेड येथे सांस्कृतिक कार्यक्रमासह समारोप करण्यात येईल.

या पदयात्रेत शहरातील शाळा, महाविद्यालयांतील युवक-युवती, महिला मंडळे तसेच विविध युवा मंडळांचे पदाधिकारी सहभागी होतील.

जास्तीत जास्त युवक-युवतींनी या पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन माय भारतच्या जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर यांनी केले आहे.

0000




No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...