वृत्त क्रमांक 1109
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी महिलांची पतसंस्था स्थापन करणे बाबतचा घेतला आढावा
नांदेड, दि. 17 - जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली महिलांची पतसंस्था स्थापन करण्याबाबत विविध विभागांची आढावा बैठक घेण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गणेश वाघ यांनी जिल्ह्यात महिलांची पतसंस्था स्थापन करण्यासंदर्भात ची सद्यस्थिती सांगितली. याप्रसंगी आमदार श्रीजया चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर, उमेद,NRULM, महिला बचत गट ,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ,बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय तसेच खाजगी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते . त्यांनी त्यांच्या स्तरावर महिलांची पतसंस्था स्थापन करण्याबाबतच्या कार्यवाहीचा आढावा सदरील सभेत दिला. श्रीमती बोर्डीकर यांनी संबंधितांना संस्था स्थापन करण्याबाबत अधिक वेगवान गतीने काम करण्यास निर्देशित केले १५ नोव्हेंबर तारखेपर्यंत संबंधित पतसंस्था स्थापन करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
याप्रसंगी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नांदेड शहर यांनी 28 व्या राष्ट्रीय पोषण महादरम्यान राबविलेल्या उपक्रमांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर व आमदार श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
0000000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment