#मन्याड नदीच्या पुरात वझरगा येथील मारोती हनमंत कोकणे हा व्यक्ती मौ. टाकळी खुर्द येथे वाहून जातांना त्याने झाडावर आश्रय घेतला होता. ही माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या सुचनेनुसार बिलोलीचे उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार बालाजी मिठेवाड, सहाय्यक महसूल अधिकारी राजेश्वर आलमवाड, महसूल सहाय्यक शेख युनूस व बोटऑपरेटर आशिष जनार्दन आंबोडे यांच्या पथकाने त्या व्यक्तीला बोटीच्या सहाय्याने टाकळी खुर्द येथून सूखरुप बाहेर काढले.
मारोती कोकणे या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी महसूल, पोलीस प्रशासन, टाकळी गावचे सरपंच, गावकऱ्यांनी, मंडळ अधिकारी कल्पना मुंडकर, ग्राम महसूल अधिकारी प्रणिता काळे, शिवाजी घोंगडे, चव्हाण, ललित पाटील, मिलिंद सुपेकर, बीट जमादार काळे आदींनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment