Friday, July 4, 2025

 राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४साठी

प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ

 

 मुंबईदि. 4 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिताउत्कृष्ट लेखनउत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथाउत्कृष्ट छायाचित्रकारसमाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक जानेवारी, 2024 ते 31 डिसेंबर, 2024 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम  दि. 31 जानेवारी, 2025 असा होता. आता या पुरस्कारासाठी प्रवेशिका मागविण्याकरिता दि. 19 जुलै, 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

 राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनीमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयतळमजलाहुतात्मा राजगुरु चौकमादाम कामा मार्गमंत्रालयमुंबई-32, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने http://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

000000


 वृत्त क्र. 699    

मनुष्यचलित टोकण पेरणी यंत्राचा

शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : कृषी विभाग

 

नांदेडदि. 4 जुलै :- शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन क्षमता वाढविणेकामाचा वेळ व कष्ट कमी करणे हे उद्दिष्ट ठेवून कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. कृषि यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत मनुष्यचलित टोकण पेरणी यंत्राचा लाभ घ्यावा. हे पेरणी यंत्रावर अनुदान उपलब्ध असून शेतकऱ्यांनी या टोकण यंत्राचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

 

कृषि यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत मनुष्यचलित टोकण पेरणी यंत्र (Dibbler) गादी वाफयावर/ बेडवर पेरणी करता येत आहे. सरीमध्ये साचलेले पाणी पीकाला उपलब्ध होत आहे. दिर्घकाळ पावसाचा खंड पडल्यास पिकाला पाण्याचा ताण बसत नाही. अतिरीक्त किंवा जास्तीचे साचलेले पाणी सरीमधून निघुन जातेया मनुष्य चलीत पेरणी यंत्राचा वापर करुन एक मजुर एका दिवसात ते एकर सहजरीत्या गादी वाफयावरबेडवर पेरणी करु शकतो.

 

अर्ज करण्याची पद्धत

शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर (सीएससी) सेतु सुविधा केंद्रात जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा. जो शेतकरी प्रथम अर्ज करेल त्यांची प्रथम निवड होणार आहे. (FCFS) यासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.

 

यंत्राचे फायदे

पेरणीसाठी कमी मनुष्यबळाची आवश्यकतावेळ आणि बियाण्यांची बचतएकसंध पेरणीस मदतउत्पादनक्षमता वाढविण्यात मदतया योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी शेती सुलभ आणि उत्पादनक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यावाअधिक माहितीसाठी संपर्क तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला भेट द्यावीअसेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 698

जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत सहकार दिंडीचे आयोजन

नांदेड दि. 4 जुलै :- आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 चे अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयामार्फत सहकार दिंडीचे आज आयोजन करण्यात आले होते. या दिंडीमार्फत सहकार से समृध्दी तसेच सहकारातील विविध उपक्रमाची जनजागृती करण्याच्या हेतुने सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उप जिल्हाधिकारी सामान्य अजय शिंदे,  जिल्हा उपनिबंधक अशोक भिल्लारे, सहायक निबंधक प्रशासन योगेशकुमार बाकरे आदीची उपस्थिती होती. ही दिंडी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत काढण्यात आली. या दिंडीत कृषि उत्पन्न बाजार समिती, सहकारी संस्था, सहकारी बँका, सहकारी पतसंस्था व जिल्हृयातील सर्व गटसचिव, अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला. सकाळी 10 वा. दिंडी सुरुवात झाली. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. या कार्यक्रमास उप जिल्हाधिकारी सामान्य अजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी मार्गदर्शन केले व सहकार विभागाच्या विविध उपक्रमास शुभेच्छा दिल्या. 

00000







माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक १ जानेवारी, २०२४ ते ३१ डिसेंबर, २०२४ पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दि. ३१ जानेवारी, २०२५ असा होता. आता या पुरस्कारासाठी प्रवेशिका मागविण्याकरिता दि. १९ जुलै, २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-३२, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने http://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.



वृत्त क्र. 697

हिमायतनगर येथे दोन किराणा दुकानामधून केला गुटखा जप्त

अन्न व औषध प्रशासनाची कार्यवाही

नांदेड दि. 4 जुलै :- सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन कार्यालय, नांदेड येथील पथकाने हिमायतनगर येथे अचानक भेट देऊन शहरातील मे. प्रणव किराणा स्टोअर्स व मे.सलीम किराणा स्टोअर्स या किराणा दुकानांची तपासणी केली. तपासणी वेळी मे. प्रणव किराणा स्टोअर्स, दीक्षाभूमी चौक, हिमायत नगर या पेढीतून दीपक हरिश्चंद्र अमृतसागर वय वर्ष २८ रा. कालिका नगर हिमायत नगर या व्यक्तीच्या ताब्यातून राजनिवास सुगंधीत पानमसाला, विमल पानमसाला, डायरेक्टर स्पेशल पानमसाला, मुसाफीर पानमसाला, सागर पानमसाला, गुटखा, विविध प्रकारचे सुंगधीत तंबाखू इत्यादी प्रतिबंधित अन्न पदार्थाचा एकूण २७ हजार ६८८ रुपये प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त केला. संबंधित हजर व्यक्ती दीपक हरिश्चंद्र अमृतसागर वय वर्ष २८ रा. कालिका नगर, हिमायतनगर यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मरेवार यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६चे कलम २६,२७,३०(२)(अ),५९ भारतीय न्यायसंहितेच्या १२३,२२३,२७४,२७५ कलमानुसार पोलीस स्टेशन, हिमायत नगर येथे फिर्याद दाखल केली आहे.
तसेच मे.सलीम किराणा स्टोअर्स, खुबा चौक, हिमायतनगर या पेढी तपासणी वेळी राजनिवास सुगंधीत पानमसाला, विमल पानमसाला, सागर पानमसाला, गुटखा, विविध प्रकारचे सुंगधीत तंबाखू इत्यादी प्रतिबंधित अन्न पदार्थाचा एकूण १ हजार ९५० रुपये एवढ्या किंमतीचा साठा आढळला. या पेढीतील हजर व्यक्ती अब्दुल अहमद लाल मोहम्मद वय वर्ष ४७ रा. सुभाष चौक, हिमायतनगर व पेढी मालक अब्दुल जब्बार अब्दुल मजीद खुबा चौक, हिमायतनगर यांच्या विरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी, अनिकेत भिसे यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६चे कलम २६,२७,३०(२)(अ),५९ भारतीय न्यायसंहितेच्या १२३,२२३,२७४,२७५ कलमानुसार पोलीस स्टेशन, हिमायतनगर येथे फिर्याद दाखल केली आहे.
तपासणी नंतर सदर दोन्ही पेढी सील करण्यात आल्या. सदरची कार्यवाही सहायक आयुक्त राम भरकड व सहायक आयुक्त संजय चट्टे यांचे मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सर्वश्री ऋषिकेश मरेवार, अनिकेत भिसे, अरूण तम्मडवार तसेच प्रशिक्षणार्थी अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश गिरी, श्रीमती शिल्पा श्रीरामे, श्रीमती अमृता दुधाटे, नमुना सहायक बालाजी सोनटक्के व पोलीस निरीक्षक अमोल भगत व इतर पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्याने पार पडली.
0000


Thursday, July 3, 2025

 वृत्त क्र. 696   

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाची बैठक संपन्न

 

नांदेडदि. 3 जुलै :- जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाची त्रैमासिक बैठकजिल्हा समुदाय संसाधन समूह बैठकजिल्हा एचआयव्ही-टीबी समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषदेत पार पडली.

 

बैठकीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे न्यायाधीश तथा सदस्य सचिव शरद देशपांडेजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरकेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुखशासकीय आयुर्वेद महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटीलजिल्हा आर.सी.एच.अधिकारी डॉ. शिवशक्ती पवारवरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप जाधवमनपा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. बडीयोद्दीनशिक्षण अधिकारी सौ.फुटाणेजिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी प्रतिनिधिसमाज कल्याण कार्यालय प्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्था प्रतिनिधीजिल्हा समुदाय संसाधन समूह (D-CRG) प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

 

खाजगी रक्त तपासणी केंद्रातून एचआयव्ही पॉजिटिव्ह आलेले रूग्ण आयसीटीसी केंद्रांना संदर्भित करण्याबाबत सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरवर सर्व गरोदर मातांची एचआयव्ही व गुप्तरोग तपासणी होईल यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत त्यांनी सूचित केले.

 

जिल्ह्यातील 17 आयसीटीसी केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यात  एचआयव्ही व गुप्तरोग तपासणी केली जाते. सन 2024-25 मध्ये 18 ते 35 वयोगटात एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. तरुणाईला या रोगापासून दूर ठेवण्याकरिता आयसीटीसी समुपदेशकांमार्फत जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयात एचआयव्ही व गुप्तरोग जनजागृतीपर समुपदेशनाचा ड्राइव घेणार असल्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी सांगितले. जिल्ह्यातील एड्स रोगाबाबतची सांख्यिकीय वैशिष्ट्ये सन 2024-25 आणि मे 2025 पर्यंतचा सर्व डेटा पीपीटी माध्यमातून जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप अंकुशे यांनी समिती समोर सादर केला.

0000

वृत्त क्र. 696  

 

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाची बैठक संपन्न

 

नांदेडदि. 3 जुलै :- जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाची त्रैमासिक बैठकजिल्हा समुदाय संसाधन समूह बैठकजिल्हा एचआयव्ही-टीबी समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषदेत पार पडली.

 

बैठकीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे न्यायाधीश तथा सदस्य सचिव शरद देशपांडेजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरकेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुखशासकीय आयुर्वेद महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटीलजिल्हा आर.सी.एच.अधिकारी डॉ. शिवशक्ती पवारवरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप जाधवमनपा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. बडीयोद्दीनशिक्षण अधिकारी सौ.फुटाणेजिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी प्रतिनिधिसमाज कल्याण कार्यालय प्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्था प्रतिनिधीजिल्हा समुदाय संसाधन समूह (D-CRG) प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

 

खाजगी रक्त तपासणी केंद्रातून एचआयव्ही पॉजिटिव्ह आलेले रूग्ण आयसीटीसी केंद्रांना संदर्भित करण्याबाबत सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरवर सर्व गरोदर मातांची एचआयव्ही व गुप्तरोग तपासणी होईल यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत त्यांनी सूचित केले.

 

जिल्ह्यातील 17 आयसीटीसी केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यात  एचआयव्ही व गुप्तरोग तपासणी केली जाते. सन 2024-25 मध्ये 18 ते 35 वयोगटात एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. तरुणाईला या रोगापासून दूर ठेवण्याकरिता आयसीटीसी समुपदेशकांमार्फत जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयात एचआयव्ही व गुप्तरोग जनजागृतीपर समुपदेशनाचा ड्राइव घेणार असल्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी सांगितले. जिल्ह्यातील एड्स रोगाबाबतची सांख्यिकीय वैशिष्ट्ये सन 2024-25 आणि मे 2025 पर्यंतचा सर्व डेटा पीपीटी माध्यमातून जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप अंकुशे यांनी समिती समोर सादर केला.

0000













वृत्त क्र. 695    

ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांना मानधन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड, दि. 3 जुलै :- राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेंतर्गत कला व साहित्य क्षेत्रातील योगदान असलेल्या मान्यवर साहित्यिक व कलावंतांनी सन 2025-26 साठी ऑनलाईन अर्ज येत्या 31 जुलैपर्यंत करावेत, असे जास्तीत जास्त ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. पात्र लाभार्थ्यांना https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या लिंकवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरता येतील. 

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना ही सन 1954-55 या वर्षापासून संपूर्ण राज्यात सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत राबविण्यात येते. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयानुसार कला व साहित्य क्षेत्रातील योगदान असलेल्या मान्यवर साहित्यिक व कलावंत यांना प्रति महिना एप्रिल 2024 पासून सरसकट 5 हजार रुपये एवढे मानधन देण्यात येत आहे. तसेच दरवर्षी नांदेड जिल्हाअंतर्गत 100 कलावंताची निवड जिल्हा निवड समिती मार्फत करण्यात येते. 

योजनेसाठी पात्रता

ज्याचे वय 50 पेक्षा जास्त, दिव्यांगाना वयाची अट 10 वर्षानी शिथिल करण्यात येते (दिव्यांगाना वयोमर्यादा 40 वर्ष) आहे. ज्याचे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी 15 वर्ष आहे. ज्यांनी साहित्य व कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची भर घातली आहे. वयाने ज्येष्ठ असणारे, विधवा, परितक्त्या, दिव्यांग कलाकारांना प्राधान्य राहील. कलाकारांचे सर्व मार्गांनी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 60 हजार रुपयापेक्षा जास्त नसावे. ज्या कलाकारांची उपजिविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार. केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे व इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेचे इतर वैयक्तिक शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. कलाकार, साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवाशी असणे बंधनकारक आहे. 

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे

वयाचा दाखला 50 पेक्षा जास्त (दिव्यांगांना वयामर्यादा 40 वर्षे), आधार कार्ड, उत्पनाचा दाखला 60 हजार रुपया पर्यंत (तहसिलदार), रहिवाशी दाखला तहसिलदार यांच्याकडून मिळालेले, प्रतिज्ञापत्र इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत नसले बाबत. पति-पत्नीचा एकत्रीत फोटो (लागु असल्यास), बॅक तपशिल बँक खाते क्रमांक व बँकेचा आयएफएससी कोड क्रमांकासह, अपंगत्वाचा दाखला (लागु असल्यास), राज्य केंद्र सरकारचे पुरस्कार प्रमाणपत्र (लागु असल्यास), नामांकित संस्था,व्यक्ती यांचे शिफारस पत्र (लागु असल्यास), विविध पुरावे, मोबाईल क्रमांक (आधार क्रमांकास व बॅकेस मोबाईक क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे), शासन निर्णय तरतुदीनुसार सर्व अटी शर्ती लागु राहतील. 

या संबंधी अधिक माहिती नांदेड जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ zpnanded.in वर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  अपुर्ण अर्ज असल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज फेटाळला जाईल, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे नांदेड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) यांनी कळविले आहे. 

00000

 वृत्त क्र. 694

शिकाऊ उमेदवारांसाठी आज रोजगार मेळाव्याचे आयोजन 

नांदेड दि. 3 जुलै :- मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रद्वारा श्री गुरुगोबिंदसिंघजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड यांच्यावतीने शुक्रवार 4 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वा. शिकाऊ उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. तरी आयटीआय, पदवी, पदव्युत्तर, दहावी, बारावी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस.व्ही. सुर्यवंशी यांनी केले आहे. 

या मेळाव्यात आयटीआय उत्तीर्ण व आयटीआय व्यवसाय अभ्यासक्रमातील अंतिम वर्षात प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत भरती मेळावा घेण्यात येत आहे. तरी आयटीआय, पदवी, पदव्युत्तर, दहावी, बारावी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे उद्या 4 जुलै रोजी सकाळी ठिक 10 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गुरुगोबिंदसिंघजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस.व्ही. सुर्यवंशी यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्र. 693

उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन 

नांदेड दि. 3 जुलै :- उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात व नांदेड जिल्ह्यात यापूर्वी घडल्या आहेत. भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस प्रजातीच्या बूरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे फ्युमिगाक्लेविन यासारखी विषद्रव्ये तयार होतात.  पावसाळयातील वातावरण बूरशीच्य वाढीसाठी अनूकुल असते, अशी बूरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी उपवासाला भगर खाताना काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

भगर खाताना काय काळजी घ्यावी 

बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करा. शक्यतोवर पाकीटबंद भगर घ्या. ब्रँड नाव नसलेली  किंवा लेबल नसलेली भगर पाकीटे व सूटी भगर घेऊ नका. भगर घेतांना पाकीटावरचा पॅकींग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासा. भगर साठवताना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी, व्यवस्थित झाकण बंद डब्यात ठेवा, जेणेकरून वातावरणातील ओलाव्यामुळे बूरशीची वाढ होणार नाही. जास्त दिवस भगर साठवू नका. जास्त दिवस साठवलेली भगर खाऊ नका. शक्यतोवर भगरीचे पीठ विकत आणू नका. भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता अधिक असते. त्यामूळे पिठाला बूरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते. भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी  खिचडी खावी. भगरीचे पीठ आवश्यक असेल तेवढेच दळून घ्या. जास्त दिवस पीठ साठवू नका. बाहेरुन दळून आणण्यापेक्षा घरीच  दळा. भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहेत. दोन ते तिन दिवस सलग उपवास असताना या पदार्थांचे सेवन ॲसिडीटी वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटी, मळमळ व पोटाचे त्रास होतात. या पदार्थांचे सेवन पचनशक्ती नुसार मर्यादेतच करावे. भगरीचे सेवन करतांना या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे संभाव्य अपाय टाळता येईल. 

भगर विक्रेत्यांसाठी सूचना 

विक्रेत्यांनी पॅकबंद भगरचीच विक्री करावी. भगर खरेदी करतांना घाऊक विक्रेत्याकडून पावती घ्यावी.भगरीचे पॅकेट, पोत्यावर उत्पादकांचा पत्ता,परवाना क्र., पॅकींग दिनांक, अंतिम वापर दिनांक असल्याची खात्री करून घ्या. मुदतबाह्य भगर किंवा भगर पिठाची विक्री करु नये. सुटी भगर व खुले भगर पीठ शक्यतो विक्रीसाठी ठेऊ नये. 

अन्न व औषध प्रशासनाचेवतीने भगर विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई करण्यात येईल येईल असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

0000

 वृत्त क्र. 692

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालतीचे आयोजन 

नांदेड दि. 3 जुलै :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जुलै महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 8 जुलै, 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

०००००

 वृत्त क्र. 691

देशासाठी मध्यस्थी अभियानास प्रारंभ

नांदेड दि. 3 जुलै :- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशात एकाच वेळी देशासाठी मध्यस्थी हे अभियान राबविण्यात येत आहे. नांदेड येथे 1 जुलै रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गं. वेदपाठक यांच्या हस्ते या अभियानाचा प्रारंभ झाला आहे.

या अभियानांतर्गत दिवाणी न्यायालय, फौजदारी न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, सहकार न्यायालय व ग्राहकमंच मध्ये दाखल असलेली जास्तीत जास्त प्रकरणे मध्यस्थीसाठी पाठविण्यात यावी. हे अभियान 30 सप्टेंबर 2025 पर्यत चालणार असून, आठवडयातील सात दिवस प्रशिक्षित मध्यस्थ प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तरी जास्तीत जास्त पक्षकारानी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद जी. देशपांडे यांनी केले आहे.

0000

 चला घडवूया विकसित महाराष्ट्र !

विकसित महाराष्ट्राची रुपरेषा ठरविण्यात आपला सहभाग द्या!

'विकसित महाराष्ट्र २०४७ : महाराष्ट्राचे व्हिजन डॉक्युमेंट'साठी १७ जुलै, २०२५ पर्यंत होणाऱ्या नागरिक सर्वेक्षणात सहभाग नोंदवा..

Wednesday, July 2, 2025

 वृत्त क्र. 690

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष

ॲड निलेश हेलोंडे पाटील यांचा नांदेड सुधारित दौरा 

 

नांदेड दि. 2 जुलै  :-  कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ॲड निलेश हेलोंडे पाटील हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.  

शुक्रवार 4 जुलै 2025 रोजी अमरावती येथून काळी 10.15 वा. नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2 वा. विश्रामगृह,  भोकर जि.नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वा. रोहयोअंतर्गत शासकीय गायरान जमीनीवर चारा लागवडीसंबंधी उपजिल्हाधिकारी (रोहयो) व तहसिलदार उमरी यांनी सुचविलेल्या उमरी तालुक्यातील मौजे जिरोना येथे भेट व पाहणी.(तहसिलदार, गटविकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उमरी हे सोबत राहतील) सायं. 6 वा. सोईनुसार अमरावतीकडे प्रयाण करतील.

00000

 वृत्त क्र. 689

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता  

हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना  

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 02 जुलै 2025 रोजी दुपारी 12:31 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 02 जुलै व 06 जुलै 2025 या दोन दिवसासाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दि. 02 व 06 जुलै 2025 ह्या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

या गोष्टी करा 

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. तुमच्या स्मार्ट मोबाईल फोन मध्ये 'दामिनी', 'सचेत' हे दोन ॲप डाउनलोड करा 'दामिनी' ॲप तुमच्या आजूबाजूला वीज विषयक संभाव्य धोके दर्शविते तर 'सचेत' ॲप मुळे तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या हवामानाविषयी अचूक इशारे व माहिती मिळते. 

या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

0000

 वृत्त क्र. 688

आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी प्रशिक्षण 

नांदेड दि. 2 जुलै :- आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या प्रशिक्षण केंद्रात येत्या 1 ऑगस्ट 2025 पासून विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार आहेत. या प्रशिक्षण सत्रात नोकऱ्यांसाठी विविध स्पर्धा परिक्षांची तयारी करून घेण्यात येते. पात्र इच्छूक आदिवासी (अनुसूचित जमातीचे) उमेदवारांनी 30 जुलै, 2025 पर्यंत शैक्षणीक व जातीचे प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी किनवट यांनी केले आहे.  

या प्रशिक्षण सत्रात नौकऱ्यासाठी द्याव्या लागणाऱ्या विविध स्पर्धा परिक्षेची तयारी करुन घेण्यात येते तसेच आदिवासी उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर खात्याच्या स्वयंरोजगार योजनांची माहिती देवून मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण केंद्रात 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणाऱ्या 112 व्या प्रशिक्षण सत्रात आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना विविध स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी प्रवेश देण्यासाठी उमेदवारांनी 30 जुलै, 2025 तत्पुर्वी या कार्यालयास पोहचतील अशा बेताने आदिवासी (अनुसूचीत जमातीचे ) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी या पत्त्यावर आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या बाजूस गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड नि कोड-431811, संपर्क दुरध्वनी क्रमांक 02469-221801/ 7219709633, 9423748008 वर संपर्क करावा, असेही कळविले आहे.  

या प्रवेशाच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत. उमेदवार अनुसूचित जमाती पैकी (एस.टी.) प्रवर्गातील असावेत. नांदेड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील उमेदवारांचाही प्रवेशासाठी विचार करण्यात येइल. उमेदवार कमीत कमी शालांत परीक्षा उतीर्ण असावेत, उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधाण्य देण्यात येईल. उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. उमेदवारांनी किनवट येथे स्वत: रहाण्याची व जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. प्रशिक्षण कालावधी 3 महीने 15 दिवस असून शालांत परीक्षा उतीर्ण उमेदवारांना तसेच पदवी धारकांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. वयोमर्यादा - उमेदवाराचे वय 30 जुलै, 2025 रोजी 18 वर्ष पुर्ण असावे व 35 पेक्षा जास्त नसावे. प्रशिक्षणार्थिचे विद्यावेतन संबंधीत प्रशिक्षणार्थिचे बँक खात्यामध्ये दर महा जमा करण्यात येणार असल्यामूळे प्रशिक्षणार्थिंचे बँक खाते चालू असणे आवश्यक आहे. आपण यापुर्वी अशाप्रकारचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास किंवा सदर प्रशिक्षण सत्र अर्ध्यातुन सोडलेले असल्यास प्रवेश देण्यात येणार नाही असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 687

नांदेडमधील 28 कृषी सेवा केंद्रावर कार्यवाही ; कृषी विभाग अॅक्शन मोडवर

12 बियाणे, खत, कीटकनाशक विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

14 बियाणे विक्रेत्यांचे परवाने निलंबित

नांदेड दि. 2 जुलै  :- खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची व्यापक तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत कृषी सेवा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली आहे. नियमबाह्य कामकाज करणाऱ्या तसेच तपासणीमध्ये त्रुटी आढळल्याने दोषी ठरलेल्या एकूण 28 कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी ही माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच विनापरवाना खताची अवैध विक्री केल्याच्या कारणावरून इस्लापूर व हिमायतनगर येथे अवैध खत विकणाऱ्या विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियमबाह्य कामकाज करणाऱ्या इस्लापूर तालुक्यातील एका कृषी सेवा केंद्राचे तिन्ही परवाने कायमस्वरूपी निलंबित करण्यात आले आहेत. या दुकानांमध्ये परवाना नसलेले एचटीबीटी बियाणे यांची वाहतुकीच्या पावत्या अवैध्यरित्या दुकानात आढळून आल्याने इस्लापूर येथील कृषी सेवा केंद्रांचे तिन्ही परवाने कायमस्वरूपी निलंबित करण्यात आले आहेत.

कृषी विभागाच्या तपासणीत कृषी सेवा केंद्रातील विविध त्रुटी उघड झालेले आहेत. यामध्ये भावफलक व साठा फलक न लावणे, विक्री परवाने दुकानदाराने दर्शनी भागात न लावणे, साठा पुस्तके अद्यावत न ठेवणे, स्त्रोत परवान्यात नमूद नसणे, ग्राहकांना निविष्ठा विक्रीच्या पावत्या न देणे, विक्री अहवाल दर महिन्याला सादर न करणे इत्यादी विविध प्रकारच्या त्रुटी आढळल्या आहेत. त्यांची सुनावणी घेण्यात आली व त्यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली.

दरम्यान अशा 28 कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आलेली आहे. याशिवाय विक्री परवानगी घेतली असतानाही दुकान बंद ठेवणाऱ्या केंद्रावरही मोहिमेत विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. या कारवाईमध्ये तालुका नायगाव येथील आठ कृषी सेवा केंद्राचा समावेश असून हदगाव तालुक्यातील दोन कृषी सेवा केंद्र तसेच नांदेड तालुक्यातील एक कृषी सेवा केंद्र, देगलूर तालुक्यातील दोन कृषी सेवा केंद्र, कंधार तालुक्यातील एक कृषी सेवा केंद्र, किनवट तालुक्यातील पाच कृषी सेवा केंद्र, मुखेड तालुक्यातील दोन कृषी सेवा केंद्र, उमरी तालुक्यातील पाच कृषी सेवा केंद्र, लोहा तालुक्यातील एक व मुदखेड तालुक्यातील एक कृषी सेवा केंद्र यांचा समावेश आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना योग्य वेळी आणि नियमानुसार सेवा मिळाव्यात यासाठी ही मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. अशाच प्रकारची नियमित तपासणी सुरु राहणार असून, नियमभंग करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

00000

वृत्त क्र. 686

लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन 

नांदेड दि. 2 जुलै  :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकशाही दिन सोमवार 7 जुलै 2025 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित केला आहे. 

या दिवशी महसूल,  गृह,  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभाग व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. 

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांनी दिली आहे.

00000

  राज्य शासनाच्या  ‘ उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार   २०२४ ’ साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ    मुंबई ,  दि. 4  :  माहिती...