Tuesday, June 24, 2025

 सुधारित वृत्त 

वृत्त क्रमांक 657

 

आणीबाणीच्या विविध घटनांच्या

छायाचित्र प्रदर्शनाचे आज उद्घाटन

 

नांदेड दि. 24 जून :- देशात दिनांक 25 जून 1975 रोजी आणिबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेला येत्या 25 जून रोजी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात बुधवार 25 जून 2025 रोजी करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डिले यांच्या हस्ते सकाळी 10.30 वा. या छायाचित्र माहिती प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.  

 

या प्रदर्शनात आणीबाणीच्या अनुषंगाने जिल्ह्यात घडलेल्या विविध घटना-घडामोडींची तसेच आणीबाणीविरोधी संघर्षात सहभागी झालेल्या विविध कार्यकर्ते-नागरिकांची छायाचित्रे व माहितीचा समावेश असणार आहे. या छायाचित्र माहिती प्रदर्शनास उपस्थित राहण्याचे आवाहन नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे.

000

No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...