Saturday, March 16, 2024

 वृत्त क्र. 247

 

समाज घडविण्यात ग्रंथालयाची भूमिका महत्वाची

: ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जगदीश कदम

 

·         ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवास प्रारंभ

·         रविवारी ग्रंथदालनाला भेट देण्याचे आवाहन

·         विविध कार्यक्रमाचे आयोजन

 

नांदेड दि. 16 :- समाज घडविण्यात सार्वजनिक ग्रंथालयाची भूमिका अत्यंत महत्वाची असून ग्रंथालये ही समाजाच्या मेंदूचे काम करतात. ज्या देशात उत्तम ग्रंथालये आहेतत्या देशाचा विकास कोणीही रोखू शकत नाहीअसे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक तथा मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम यांनी केले. जिल्हा ग्रंथालयात आयोजित ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

 

आज ग्रंथोत्सवाची सुरुवात भव्य अशा ग्रंथदिंडीने ग्रंथाची पालखी घेऊन करण्यात आली. सकाळी 8.30 वाजता ग्रंथ दिंडीची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून त्यांना अभिवादन करून करण्यात आली. या ग्रंथ दिंडीमध्ये भजनी मंडळे तसेच अनेक शाळेतील लेझीम पथक सहभागी झाले होते. ही ग्रंथ दिंडी जिल्हा ग्रंथालय कार्यालयासमोर आल्यानंतर विविध ग्रंथ स्टॉलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करुन या ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. या ग्रंथोत्सवात 24 पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले आहेत.

 

संतांचे साहित्य ही आपल्यासाठी मोठी शिदोरी असून सदाचाराची शिकवण देणारे संत हेच साहित्यिकांचे पुढारी आहेत. शतकानुशतके हे पुढारी समाजप्रबोधनाचे काम करीत आहेत. त्यांचे ग्रंथ आजही लोक वाचतात. सयाजीराव गायकवाड महाराजराजर्षी शाहू यांनी गाव तेथे ग्रंथालय ही चळवळ उभी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ग्रंथ सहवासातून जगभर लौकिक केला. यशवंतराव चव्हाण यांच्या सारख्या साहित्य प्रेमीनी भाषा आणि साहित्याचे स्वतंत्र दालन निर्माण केले. आज ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली ग्रंथालय चळवळ समृध्द होईल यात शंकाच नाहीअसे उद्गगार ज्येष्ठ साहित्यिक तथा 43 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम यांनी नांदेड ग्रंथोत्सव 2023 चे उद्घाटन करताना काढले.

 

वाचन संस्कृतीला बळ मिळावे व त्यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती व्हावी तसेच लेखकप्रकाशक व वाचक एका छताखाली यावेत व ग्रंथालय चळवळ परिपक्व व्हावी म्हणून ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते असे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. नांदेडची ग्रंथालय चळवळ समृध्द करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या जास्त असूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्कारासाठी जिल्ह्यातून एकही प्रस्ताव दाखल झाला नाही याविषयी त्यांनी खंत व्यक्त केली. जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक करताना सर्वांच्या सहकार्याने नांदेड जिल्हा हा ग्रंथालय चळवळीत अग्रेसर ठेवू असे आश्वासन दिले.

 

जगात उत्क्रांती व क्रांती केवळ पुस्तकेच करू शकतात - गोविंद नांदेडे

जगामध्ये उत्क्रांती व क्रांती केवळ पुस्तकेच घडू शकतात म्हणून ग्रंथालयाने दर्जेदार पुस्तके वाचकांच्या हाती द्यावेत असे प्रतिपादन माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेड यांनी नांदेड ग्रंथोत्सव 2023 च्या उद्घाटन प्रसंगी केले. जगात सर्वात प्रिय व्यवहार म्हणजे ज्ञान देणे हा होय आणि पुस्तके हीच खरी ज्ञान देणारी साधने आहेत. म्हणून ग्रंथचालकांनी वाचकाच्या हातात दर्जेदार ग्रंथ दिले पाहिजेत. देशात वाचन संस्कृती वाढली तर समाजात हिंसा होणार नाही. यातून सुसंस्कृत व संयमी समाजाची निर्मिती होवून आदर्श व उन्नत राष्ट्र उभे राहू शकेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

नांदेड जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळ ही सशक्त झाली पाहिजे. जिल्ह्यातील लेखककवींची पुस्तके आपल्या ग्रंथालयात वाचकांना उपलब्ध करून दिली पाहिजे अशी अपेक्षा ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी व्यक्त केली. ग्रंथोत्सवातून मोठ्या प्रमाणात दर्जेदार ग्रंथाची ग्रंथ खरेदी व्हावी व गावागावातील वाचनालय समृद्ध व्हावेत. वाचन संस्कृती तळागाळापर्यंत पोहचावी यासाठी ग्रंथालय पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करावेअसे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. या ग्रंथोत्सवात विविध पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यात अत्यंत दर्जेदार पुस्तके ठेवण्यात आली आहे तेंव्हा सर्वांनी मोठ्या प्रमाणात या पुस्तकाची खरेदी करावी. रविवार 17 मार्च 2024 रोजी ग्रंथोत्सवाचा दुसरा दिवस असून ग्रंथप्रेमी नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.  

000000








No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...