मतदान कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी
Saturday, March 30, 2024
वृत्त क्र. 291
वृत्त क्र. 290
आचारसंहिता कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन नाही
नांदेड दि.30:- जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन म्हणून आयोजित करण्यात येतो. परंतु सध्या भारत निवडणूक आयोगाच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 16 मार्च ते 6 जून 2024 या कालावधीत घोषित केलेला आहे. त्यामुळे या कालावधीत आचारसंहिता लागू असल्यामुळे आचारसंहितेचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यत जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
0000
वृत्त क्र. 289
'चुनाव का पर्व, देश का गर्व ' या भावनेने राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा : जिल्हाधिकारी
86-नांदेड उत्तर विधानसभा मतदार प्रथम प्रशिक्षण
नांदेड दि. ३० : जगातल्या सर्वात मोठया लोकशाही देशाच्या मताधिकार स्वातंत्र्याला अबाधित ठेवण्यासाठी आपण निवडणूक कार्यावर आहोत. लोकशाहीच्या या अभिव्यक्ती मध्ये निवडणुकांमधील मताधिकार, मतदान प्रक्रिया राबविताना राष्ट्रीय कर्तव्याचे भान प्रत्येक कर्मचाऱ्यांने ठेवावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे केले.
86-नांदेड उत्तर विधानसभा मतदार प्रथम प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. निवडणुकीच्या महत्त्वाच्या टप्प्यात आता आपण पोहोचलो असून या टप्प्यामध्ये बिनचूकपणे सामान्य माणसाला त्याचा मताधिकार पूर्ण करता येईल, यासाठी प्रयत्न करायचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी 16-नांदेड लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत, 86-नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावरील अधिकारी / कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण, EVM Handson Training सह दि.30/03/2024 रोजी सचखंड पब्लीक स्कुल, गुरु ग्रंथ साहिब भवन, नांदेड येथे आयोजीत करण्यात आले होते.
प्रशिक्षण दोन सत्रात घेण्यात आले
प्रशिक्षणाच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांचे ललितकुमार व-हाडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) नांदेड यांनी स्वागत केले. त्यानंतर प्रत्यक्ष प्रशिक्षणास सुरुवात झाली, प्रत्येक मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी ‘‘चुनाव का पर्व, देश का गर्व’’ या भावनेने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारीने प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मतदान केंद्रावरील येणा-या संभाव्य समस्यांबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या. तसेच सदर समस्यांचे निराकरण प्रशिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण केल्यास निवडणूक पार पाडणे घेणे अधिक सुलभ होते, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रशिक्षणात केले.
दोन्ही सत्रात श्री. ललितकुमार व-हाडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी (रोहयो) नांदेड यांनी विस्तृतपणे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनच्या (सादरीकरणाच्या) माध्यमातून मतदान प्रक्रिया सुरु झाल्यापासून ते समाप्त होईपर्यंतची कामे करण्याबाबत प्रशिक्षण दिले. यात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) व VVPAT (Voter Verifiable Paper Audit Trail) व्ही.व्ही.पॅट यंत्रासंबंधी महत्वपुर्ण माहिती देण्यात आली. निवडणूकीशी संबंधित विविध फॉर्म्स कसे भरतात, कोण-कोणत्या समस्या येवू शकतात व त्या समस्यांचे उपाय कोणते याबद्दल सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. सदरील प्रशिक्षण संवादात्मक व चर्चात्मक पध्दतीने घेण्यात आले. यावेळी प्रशिक्षण मंचावर श्री.रामदास कोलगणे, व तहसिलदार प्रगती चोंडेकर, श्री.बालाजी सोनटक्के, नायब तहसिलदार हे उपस्थित होते.
निवडणूक कार्यप्रणाली व मतदान केंद्रावरील कर्तव्ये, विविध फॉर्म, विविध प्रपत्रे, संवैधानिक व असंवैधानिक लिफाफ्याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) वापराबाबतची सुलभ प्रक्रीया चर्चेव्दारे समजावून सांगण्यात आली व प्रशिक्षणार्थींच्या प्रश्नांचे / शंकांचे निरसन करण्यात आले. प्रत्येक सत्रातील पहिल्या टप्प्यात माहिती विषयक प्रशिक्षण दिले तर, दुस-या टप्प्यात प्रत्यक्ष ई.व्ही.एम. वापराचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणास सुमारे 1800 कर्मचारी उपस्थित होते.
प्रशिक्षणाच्या प्रत्येक सत्राच्या दुस-या टप्प्यात सर्व क्षेत्रिय अधिकारी आणि EVM मास्टर ट्रेनर यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) व VVPAT (Voter Verifiable Paper Audit Trail) व्ही.व्ही.पॅट प्रत्यक्ष हाताळणीबाबतचे प्रशिक्षण उपस्थित कर्मचारी यांना देण्यांत आले. यामध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) जोडणी कशी केली जाते याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणात टपाली मतपत्रिकेव्दारे मतदान करण्यासाठी निवडणूक कार्य प्रमाणपत्रासाठीचा अर्ज नमुना 12 अ व टपाली मतपत्रिकेची मागणी नोंदविण्यासाठीचा नमुना 12 भरुन टपाली मतपत्रिका प्राप्त करणेबाबत देखील सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूक कर्तव्यावर राहून सूध्दा मतदान करता येईल ही जाणीव करून देण्यात आली.
प्रशिक्षणाच्या ठिकाणी विविध कर्मचारी यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी एकूण 15 टेबलवर 30 कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच मतदार सहायता कक्ष, रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथक, नांदेड वाघाळा शहर महानगरपालीकेचे अग्निशमन दल, शहर वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस, यांना पाचारण करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणाच्या ठिकाणी आवश्यक त्या मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. या प्रशिक्षण सत्राचे सूत्रसंचालन श्री.रामदास कोलगणे, तहसिलदार व श्रीमती प्रगती चोंडेकर, तहसिलदार यांनी केले. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी 86-नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील सर्व अधिकारी / कर्मचारी विशेष परिश्रम घेतले.
वृत्त क्र. 288 दिनांक 30 मार्च 2024
मतदान कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी
यंत्रणेने सुरू केली उपाययोजना
नांदेड दि. 30:-लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने उष्णतेच्या लाटेच्या प्रभावा पासून बचाव करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाकडून सूचना निर्गमित झाल्या आहेत. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यात मतदानाच्या कालावधीत मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उष्णतेच्या लाटेच्या प्रभावापासून बचाव होण्यासाठी आरोग्य विभाग काळजी घेणार आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांनी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचारी यांना उष्णतेच्या लाटेच्या प्रभावापासून बचाव करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी आवश्यक ती वैद्यकीय सुविधा व औषध उपचाराची सोय उपलब्ध करुन देण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.
याबाबत नोडल अधिकारी व सहा. निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी आरोग्य विभागाकडून उष्णतेच्या लाटेच्या प्रभावापासून मतदान केंद्रावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचा बचाव करण्यासाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन घ्याव्यात.
0000
वृत्त क्र. 287 दिनांक 30 मार्च 2024
नांदेडमध्ये शनिवारी दोन अर्ज दाखल ; आतापर्यंत एकूण ३ अर्ज दाखल
शनिवारपर्यंत ८४ अर्जांची कक्षातून उचल
नांदेड दि.३० : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत आज शनिवारी नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये दोन अर्ज दाखल करण्यात आले. गेल्या गुरुवारी एक व आज शानिवारी २ असे एकूण आतापर्यंत ३ अर्ज दाखल झाले आहेत.तर आतापर्यंत ८४ अर्जाची उचल झाली आहे.
आज नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्या उमेदवारामध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे अकबर अख्तर खॉन यांनी अर्ज दाखल केला आहे. तर दुसरा अर्ज साहेबराव भिवा गजभारे या अपक्ष उमेदवाराचा आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी १६- नांदेड लोकसभा मतदारसंघ तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे. यापूर्वी गुरुवारी अपक्ष उमेदवार जफर अली खाँ मेहमूद अली खाँ पठाण यांनी अर्ज दाखल केला आहे.
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा निवडणूक होत आहे.२८ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. उद्यापासून पुढील पाच दिवस अर्ज दाखल करता येणार आहे. अर्जाची छाननी ५ एप्रिलला होईल. अर्ज ८ एप्रिलपर्यंत मागे घेता येईल. तर नांदेड लोकसभा निवडणुकीत नेमके किती उमेदवार हे आठ तारखेला निश्चित होईल.
८५ अर्जाची इच्छूकांकडून उचल
नांदेड लोकसभा संघाची निवडणूक २६ एप्रिल रोजी घेण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला किंवा त्यांच्या सूचकाला नामनिर्देशनपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयातील उमेदवार सहाय्य कक्षात मोफत उपलब्ध आहेत. काल गुड फ्रायडे असल्यामुळे अर्ज घेण्यासाठी सुटी होती.आज तिसऱ्या दिवशी आणखी 34 कोरे फॉर्म उमेदवार व प्रतिनिधी घेऊन गेले आहेत. पहिल्या दिवशी 50 कोरे फॉर्म उमेदवार सहाय्यता कक्षातून इच्छूकांनी घेतले होते. त्यामुळे आतापर्यंतच्या उचल झालेल्या अर्जाची संख्या 84 झाली आहे.
५ एप्रिलला छाननी
नामनिर्देशनपत्राची छाननी शुक्रवार 5 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृह येथे करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना उमेदवारांना सोमवार ८ एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यत देता येईल.
प्रवेशासाठी प्रतिबंधित क्षेत्र
उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या दिनांक पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांपासून तर उमेदवारी अर्ज दाखल करणे व अर्ज प्राप्त करण्यासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांना ओळख ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. अर्ज देण्याच्या प्रक्रिये काळात हे क्षेत्र अंशतः प्रतिबंधित करण्यात आले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षापुढेच सहाय्यता कक्ष असल्यामुळे सकाळी ११ ते ३ या काळात अत्यावश्यक काम असल्याशिवाय या परिसरात परवानगी शिवाय प्रवेश बंदी आहे.
0000
वृत्त क्र. 286 दिनांक 29 मार्च 2024
दुसरे निवडणूक खर्च अधिकारी नांदेडमध्ये डेरे दाखल
विविध विभागांचा आढावा ; खर्चावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आवाहन
नांदेड दि. २९ : नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त दुसरे वरिष्ठ सनदी अधिकारी निवडणूक खर्च अधिकारी मगपेन भुतिया यांचे रात्री उशिरा आगमन झाले आज त्यांनी विविध समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. उमेदवाराच्या व राजकीय पक्षाच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
नांदेड लोकसभा मतदारसंघातील ८९- नायगाव, ९०- देगलूर, ९१-मुखेड या तीन विधानसभा क्षेत्रातील खर्चावर निरीक्षण ठेवण्याची जबाबदारी मगपेन भुतिया यांची आहे. मगपेन भुतिया हे देखील शासकीय विश्रामगृह येथे निवासी असून त्यांना कार्यालयीन वेळेमध्ये खर्चाच्या संदर्भातील कुठल्याही तक्रारी गाऱ्हाणी व सूचनांसाठी संपर्क साधता येऊ शकतो त्यांचा दूरध्वनी क्रमांक 8902196177 आहे. नागरिकांनी निवडणूक संदर्भातील कामांसाठी त्यांना गरजेनुसार माहिती देण्याच्या आवाहनही त्यांनी केले आहे.
नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी ८५- भोकर, ८६- नांदेड उत्तर, ८७- नांदेड दक्षिण या तीन विधानसभा क्षेत्रासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून यापूर्वीच डॉ. दिनेश कुमार जांगिड हे दाखल झाले आहेत.
00000
वृत्त क्र. 285 दिनांक 29 मार्च 2024
निवडणूक खर्च निरीक्षकांची एमसीएमसी कक्षाला भेट
जाहिरात व पेडन्यूज खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आवाहन
पेडन्यूज स्वरूपात सारख्या बातम्या
आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देश
नांदेड, दि. 29 : लोकसभा निवडणुकीमध्ये जाहिरातींवर होणाऱ्या खर्चाची माहिती नियमितपणे खर्च विभागाला सादर करणे, न्यूज स्वरूपात माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण कक्षाची जबाबदारी असून याकडे बारकाईने लक्ष देण्याचे आवाहन नांदेड लोकसभा मतदार संघासाठी दाखल दोन्ही खर्च निरीक्षकांनी केले आहे.
नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी ८५- भोकर, ८६- नांदेड उत्तर, ८७- नांदेड दाक्षिण या तीन विधानसभेसाठी खर्च निरीक्षक डॉ. दिनेश कुमार जांगिड यांचे आगमन दोन दिवसांपूर्वी झाले. तर ८९- नायगाव, ९०- देगलूर, ९१- मुखेड या तीन अन्य विधानसभा क्षेत्रासाठी दुसरे खर्च निवडणूक निरीक्षक मगपेन भुतिया यांचे गुरुवारी रात्री आगमन झाले. दोन्ही अधिकाऱ्यांनी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण कक्षाला ( एमसीएमसी ) भेट दिली. एमसीएमसी केंद्रामध्ये माध्यम कक्षाचे प्रमुख जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवदे एमसीएमसीचे सदस्य सचिव जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी त्यांचे स्वागत केले.
एमसीएमसी समितीमार्फत वृत्तपत्रात येणाऱ्या राजकीय जाहिरातींना प्रमाणित केले जाते. याशिवाय वृत्तपत्रात, विविध वाहिन्यांवर तसेच सोशल माध्यमांवर उमटणाऱ्या जाहिराती, बातम्या, पोस्ट बघून यामध्ये पेड न्यूजच्या प्रकारात माहिती दिली तर जात नाही याचे निरीक्षण केले जाते. सोशल माध्यमांवर छुपा प्रचार सुरू तर नाही ना याची देखील पाहणी केल्या जाते. छुप्या पद्धतीने, परवानगी न घेता पेड न्यूज च्या माध्यमाने उमेदवारांनी प्रचार सुरू केला असल्यास एमसीएमसी समिती झालेला सर्व खर्च त्यांच्या खात्यामध्ये जिल्ह्याच्या खर्च विभागामार्फत दाखल करते.
दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या बैठकीमध्ये एमसीएमसीच्या कामकाजाची
पाहणी केली. अनेक वर्तमानपत्रात सारख्या बातम्या दिल्या जात असेल तर उमेदवारांना व
प्रसारित करणाऱ्या वृत्तपत्रांना नोटीस जारी करा असे निर्देश यावेळी दोन्हीही खर्च
निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी त्यांनी गेल्या काही दिवसात वृत्तपत्रांमध्ये
आलेल्या बातम्यांची पाहणी केली तसेच सारख्या बातम्या वृत्तपत्रांनी देऊ नये, अन्यथा अर्ज
दाखल केल्यानंतर व एकदा उमेदवारी निश्चित झाल्यानंतर उमेदवारांच्या खर्चामध्ये ही
रक्कम खर्च निरीक्षकांनी मान्यता दिल्यास येऊ शकते असेही यावेळी त्यांनी स्पष्ट
केले. यावेळी एमसीएमसी कक्षाचे कर्मचारी उपस्थित होते.
00000
वृत्त क्र. 284 दिनांक 29 मार्च 2024
राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारीने प्रशिक्षण घ्या : अभिजित राऊत
87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे प्रशिक्षण
नांदेड दि. 29 :प्रत्येक मतदान अधिकारी व
कर्मचारी यांनी 'चुनाव
का पर्व, देश का
गर्व 'या
भावनेने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारीने प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
प्रत्यक्ष मतदान केंद्रावरील येवू घातलेल्या
समस्या कोणत्या आहेत याचाही
प्रशिक्षण घेताना विचार करून आलेल्या समस्यांचे निराकरण प्रशिक्षणाच्या माध्यमातून
पूर्ण केल्यास मतदान घेणे अधिक सोईचे व सोपे होते, असे प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी
अभिजित राऊत यांनी केले. नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या 87-नांदेड दक्षिण
विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम प्रशिक्षणात ते बोलत होते.
प्रशिक्षणाच्या सुरुवातीस अभिजित राऊत यांचे
विकास माने, सहायक
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नांदेड यांनी स्वागत केले व
प्रशिक्षणाचे प्रास्ताविक नितेशकुमार बोलोलू, प्रशिक्षण प्रमूख तथा नायब तहसिलदार निवडणूक तहसिल कार्यालय
नांदेड यांनी केले. यावेळी प्रशिक्षण मंचावर ललितकुमार व-हाडे, सहायक निवडणूक
निर्णय अधिकारी 86 नांदेड
उत्तर विधानसभा संघ तथा उपजिल्हाधिकारी रोहयो, तहसिलदार उमाजी बोथीकर, मनपा शिक्षणाधिकारी आर.आर. पातळे, नायब तहसिलदार
स्विप्नील दिगलवार उपस्थित होते.
श्री गुरूग्रंथ साहीब भवन येथे दोन सत्रात हे
प्रशिक्षण देण्यात आले. पहिल्या सत्रात
विकास माने सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नांदेड यांनी
विस्तृतपणे सादरीकरणाच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया सुरु करण्यापासून समाप्त
होण्यापर्यंतचे प्रशिक्षण दिले. यामध्ये ई.व्ही.एम.,व्ही.व्ही.पॅट यासंबंधी अभ्यासपूर्ण माहिती देण्यात आली.
विविध अर्ज कसे भरतात, कोण-कोणत्या
समस्या येवू शकतात व त्या समस्यांचे उपाय कोणते याबद्दल सूध्दा प्रशिक्षण देण्यात
आले. प्रशिक्षणाच्या दुस-या टप्पयात ई.व्ही.एम. व व्ही.व्ही,. पॅटचे प्रत्यक्ष
हाताळणी बाबतचे प्रशिक्षण देण्यांत आले. यामध्ये ई.व्ही.एम. ची जोडणी कशी केली
जाते याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. सर्व क्षेत्रिय अधिकारी, मतदान अधिकारी, कर्मचारी, मास्टर ट्रेनर, मंडळ अधिकारी
अश्या विविध अधिकारी व कर्मचारी यांना
पी.पी.टी. व्दारे निवडणूक कार्यप्रणाली व मतदान केंद्रावरील कर्तव्य, विविध फॉर्म, विविध
प्रपत्रे याविषयी सविस्तर माहिती देण्यात
आली. ई.व्ही.एम. यंत्रात तांत्रिक दोष आढळल्यास त्याचे निराकरण कसे करावे हे
चर्चेव्दारे शंका निरसन करण्यात आले. याच प्रशिक्षणात टपाली ई.डी.सि. मतपत्रिका
बाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूक कर्तव्यावर राहून सूध्दा मतदान
करता येईल ही जाणीव करून देण्यात आली. या प्रशिक्षण सत्राचे सूत्रसंचालन राजेश
कूलकर्णी यांनी केले. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी राजकूमार कोटूरवार, बालाजी जाधव, संजय भालके, आर.जी. कुलकर्णी, बाबूराव जाधव, शेख जमील व महमद
आखीब तथा निवडणूक विभाग तहसिल कार्यालय नांदेड येथील सर्व कर्मचारी यांनी विशेष
परिश्रम घेतले.
00000
Thursday, March 28, 2024
वृत्त क्र. 283
वृत्त क्र. 283
निवडणूक खर्च निरीक्षक नांदेडमध्ये दाखल ;
खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आवाहन
नांदेड, दि. 28 : लोकसभा निवडणूक ही अतिशय गंभीर अशी प्रक्रिया असून प्रत्येक कर्मचारी हा या काळात भारत निवडणूक आयोगाचे कान व डोळे आहेत. त्यामुळे उमेदवाराच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून खर्चाचा सर्व तपशील योग्य पद्धतीने नोंदला जाईल याकडे लक्ष ठेवा, प्रत्येक कामाचे व्हिडिओ चित्रण काटेकोरपणे करा,असे आदेश आज नांदेड लोकसभा क्षेत्राचे निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. दिनेश कुमार जांगिड यांनी दिले.
नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी ८५- भोकर, ८६- नांदेड उत्तर, ८७- नांदेड दाक्षिण या तीन विधानसभेसाठी एक तर ८९- नायगाव, ९०- देगलूर, ९१- मुखेड या तीन अन्य विधानसभा क्षेत्रासाठी दुसरे असे दोन खर्च निवडणूक निरीक्षक म्हणून वरिष्ठ सनदी अधिकारी नांदेडसाठी नियुक्त करण्यात आले आहे. यापैकी खर्च निरीक्षक डॉ. दिनेश कुमार जंगिड यांचे आगमन झाले असून दुसरे खर्च निवडणूक निरीक्षक मग्पेन भुटीया रात्री दाखल होणार आहेत.
आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन मध्ये आयोजित बैठकीत त्यांनी यावेळी निवडणुकीतील खर्चाच्या संदर्भातील सर्व यंत्रणांची बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, महानगरपालिकेचे मुख्य लेखा अधिकारी डॉ. जनार्दन पक्वान्ने यांच्यासह विविध कक्षाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणूक ही अतिशय गंभीर प्रक्रिया असून गांभीर्याने पूर्ण प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असते. त्यामुळे विविध तपासणी पथकांनी पोलिसांच्या मदतीने रोकड,साहित्य, मद्य या संदर्भातील कोणतीही तस्करी जिल्ह्यात होणार नाही याची काळजी घ्यावी. जिल्ह्यातील हमरस्त्यांपासून गल्लीबोळातून होणाऱ्या वाहतुकीवर देखील लक्ष ठेवून तपासणी आणखी सक्रिय करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.
उमेदवाराच्या प्रचाराच्या खर्चावर देखील यावेळी लक्ष ठेवण्याचे त्यांनी सांगितले उमेदवारांच्या जाहिराती, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवरील प्रचार - प्रसार,सोशल माध्यमांवरील प्रचार - प्रसार याबाबत गांभीर्याने लक्ष ठेवण्याचे त्यांनी सुचविले. प्रमाणीकरण केल्याशिवाय कोणीही जाहिराती प्रसारित करत असेल तर त्यावर माध्यम प्रमाणीकरण व नियंत्रण समितीने लक्ष वेधण्याचे त्यांनी निर्देशित केले.
लोकसभा ही मोठी निवडणूक असून त्याचे गांभीर्य अनेक वेळा काही उमेदवारांना नसते. राजकीय पक्षांच्या विविध बैठकांमध्ये यापूर्वी ही निवडणूक लढणे व त्यासाठीच्या प्रक्रिया समजावून सांगण्याचा टप्पा पार पडला आहे. आता उमेदवाराच्या खर्चावर काटेकोर लक्ष देण्याची वेळ आली असून खर्च कसा नाही झाला, हे सिद्ध करणे उमेदवाराचे काम असते. योग्य खर्च व तपशील सादर न करणारे उमेदवारांवर गुन्हे दाखल होतात व त्यांना अनेक निवडणुका लढता येत नाही. त्यामुळे सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रण करण्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी यापूर्वी जिल्हा प्रशासनामार्फत झालेल्या प्रशिक्षणाचा आढावा घेतला. उपस्थित निवडणूक कर्मचाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा करून त्यांनी आतापर्यंत केलेल्या तयारीची देखील चाचपणी केली.
निवडणूक खर्च निरीक्षकांशी
कोणीही साधू शकतो संपर्क
नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी ८५- भोकर, ८६- नांदेड उत्तर, ८७- नांदेड दाक्षिण या तीन विधानसभा क्षेत्रासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून दाखल झालेले डॉ. दिनेश कुमार जांगिड हे नांदेड विश्रामगृहाच्या व्हीआयपी रूम नंबर तीन येथे निवासी आहेत. जिल्ह्यातील सामान्य नागरिकापासून कोणीही त्यांना कार्यालयीन वेळेमध्ये भेटू शकतो. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कोणतीही तक्रार, गऱ्हाणी, सूचना तोंडी लेखी मांडू शकतो. त्यांचा मोबाईल क्रमांक ७७०९३०७८०९ आहे. निवडणुकीमध्ये होणाऱ्या पैशांच्या गैरव्यवहारापासून तर उमेदवारांच्या संदर्भात कोणतीही माहिती निरीक्षकांना दिली जाऊ शकते.
0000
वृत्त क्र. 282
वृत्त क्र. 281
नांदेडमध्ये पहिल्या दिवशी एक अर्ज दाखल
Wednesday, March 27, 2024
वृत्त क्र. 280
सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी
आरटीओ कार्यालय राहणार सुरु
नांदेड दि. 27 :- सन 2023 2024 हे वित्तीय वर्ष दिनांक 31 मार्च 2024 रोजी समाप्त होत असून दिनांक 29, 30 व 31 मार्च 2024 या कालावधीत अनुक्रमे सार्वजनिक सुट्टी, शनिवार व रविवार येत असले तरी या काळात प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) सुरू असणार आहे.
मार्च अखेर असल्यामुळे नवीन वाहनांची खरेदी होण्याची शक्यता आहे. या कारणास्तव नवीन वाहन नोंदणी व त्याअनुषंगाने होणाऱ्या नोंदी व कार्यालयातील कामकाजाला लक्षात घेऊन ही सूचना जारी करण्यात येत आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे 29 मार्च 2024 ते दि. 31 मार्च 2024 या सुट्टीच्या कालावधीत सुरु राहील. सर्व वाहन चालक / मालक यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.
0000
वृत्त क्र. 279
दुष्काळसदृश्य भागातील
विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती
नांदेड दि. 27 :- सन 2023-24 मधील जाहीर झालेल्या दुष्काळसदृश्य भागातील इयत्ता 10 वी व 12 वीच्या परीक्षा शुल्क माफीस पात्र असलेल्या नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती मिळण्यासाठी पात्रतेच्या आवश्यक माहितीसह अर्ज करण्याचे आवाहन लातूर विभागीय शिक्षण मंडळाने केले आहे.
यासाठी स्वतःच्या, पालकांच्या आधार संलग्र बॅक खात्याच्या माहितीसह संबंधित माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाशी त्वरीत संपर्क साधावा. तपशीलवार माहिती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://mahahsscboard.in माध्यमिकसाठी http://feerefund.mh-ssc.ac.in व उच्च माध्यमिक http://feerefund.mh-hsc.ac.in या लिंकवर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव सुधाकर तेलंग यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000
वृत्त क्र. 278
बांधकाम योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध
· वाळु डेपोवरुन वाळू वाहतुक सुरु
नांदेड दि. 27 :- जिल्हयात एकूण 24 वाळु डेपो प्रस्तावित करण्यात आले आहेत. यामध्ये बिलोली, देगलुर, माहुर, हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील 17 वाळू डेपो हे नियमित वाळू डेपोंना पर्यावरण अनुमती प्रदान करण्यात आली आहे. उर्वरित 7 वाळू डेपो हे नांदेड व लोहा तालुक्यातील गाळमिश्रीत वाळु डेपो आहेत.
बिलोली तालुक्यात येसगी, सगरोळी-1 व नागणी, देगलूर तालुक्यात तमलूर व शेवाळा, हदगाव तालुक्यात बेलमंडळ, नांदेड तालुक्यात वाघी, खुपसरवाडी, भायेगाव व लोहा तालुक्यात बेटसांगवी याठिकाणी मुबलक प्रमाणात वाळू साठा उपलब्ध आहे.
ग्राहकास वाळु डेपोत उपलब्ध होणाऱ्या वाळूच्या प्रमाणात ऑनलाईन प्रणालीवरुन वाळू विक्री सुरु करण्यात आली आहे. ज्या नागरिकांना वाळुची आवश्यकता आहे, अशा नागरिकांना नजिकच्या सेतू केंद्रावर जाऊन संपर्क करावा. सदरील सेतु केंद्रावर वाळु डेपोतुन वाळु मागणी करण्यासाठी ऑनलाईन प्रणालीवर दररोज कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नोंदणी करावयाची आहे. प्रत्येक वाळु डेपोवरुन प्रतिदिन किमान 200 ब्रास इतकी रेती बुकींगची मर्यादा निश्चीत केली आहे. प्रत्येक लाभार्थ्याना प्रति महिना 10 ब्रास इतकी वाळु उपलब्ध करुन देण्यात येईल. घरकुलाच्या लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येईल. याप्रमाणे ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करुन नागरिकांनी वाळु उपलब्ध करुन घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र. 277
५ एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्राची छाननी
नांदेड दि. २७ :- नांदेड लोकसभा मतदार संघामध्ये उद्या दिनांक २८ मार्चपासून नाम निर्देशनपत्र दाखल करण्यात येणार आहे. २८ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. छाननी ५ एप्रिलला होईल. अर्ज ८ एप्रिलपर्यंत मागे घेता येईल. तर नांदेड लोकसभा निवडणुकीत नेमके किती उमेदवार हे आठ तारखेच्या रात्री निश्चित होईल.
नामनिर्देशनपत्राची छाननी शुक्रवार 5 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृह येथे करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना उमेदवारांना सोमवार 8 एप्रिल 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यत देता येईल.
नांदेड जिल्हयात २६ लक्ष ९७ हजार २८७ मतदार
नांदेड जिल्ह्यामध्ये २२ मार्च पर्यंत नोंदीनुसार एकूण मतदारांची संख्या २६ लाख ९७ हजार २८७ आहे. एकूण ३ हजार ८१ मतदान केंद्र यासाठी सज्ज झाले आहे. त्यापैकी भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगलूर, मुखेड, या सहा विधानसभा क्षेत्रातील 18.43 लक्ष मतदार नांदेड लोकसभा मतदारसंघात 2 हजार 62 मतदान केंद्रावरून मतदान करणार आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 9 लक्ष 50 हजार 976 पुरुष, तर 8 लक्ष 92 हजार 129 महिला व 139 तृतीय पंथी आपला मताधिकार बजावणार आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये 25 हजार 14 मतदार हे 85 वर्ष वयापेक्षा अधिक वयाचे असून त्यांच्यापैकी ज्यांची मतदान केंद्रावर यायची क्षमता नसेल त्यांना बॅलेट पेपरने मतदान करता येणार आहे. प्रशासन त्यांच्या घरी जाऊन मतदान प्रक्रिया पूर्ण करणार आहे.
तर जिल्ह्यातील किनवट व हदगाव विधानसभा क्षेत्रातील 05.57 लक्ष मतदार 649 केंद्रावरून हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी मतदान करणार आहेत. याशिवाय लोहा विधानसभा क्षेत्रातील 02.92 लक्ष मतदार ३३० मतदार केंद्रावरून लातूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान करणार आहेत.
निवडणुकीचा कार्यक्रम
निवडणुकीची घोषणा : 16 मार्च 2024
निवडणुकीची अधिसूचना : 28 मार्च नामनिर्देशनाची अंतिम तारीख : 4 एप्रिल 2024
छाननी : 5 एप्रिल 2024
अर्ज मागे घेण्याची तारीख : 8 एप्रिल 2024
मतदान :26 एप्रिल 2024
मतमोजणी :4 जून 2024
0000
वृत्त क्र. 276
संभाव्य काळात पाणी व चारा टंचाई
भासणार नाही याची दक्षता घ्यावी
- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड दि. 27:- जिल्ह्यात उन्हाळ्याच्या संभाव्य काळात पाणीटंचाई व जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई भासू नये यासाठी संबंधित विभागानी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित संभाव्य पाणी टंचाई आराखडा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यातील पाण्याच्या व चाऱ्याच्या उपलब्धतेचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आढावा घेतला. तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू शकते अशा ठिकाणी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याबाबत संबंधित विभागांना सूचना दिल्या. त्या अनुषंगाने जिल्ह्यात विहिर अधिग्रहण, तात्पुरता पाणी पुरवठा व टंचाई निवारणासाठीची कामे आगामी काळात प्राधान्याने राबविले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सद्यस्थितीत जिल्ह्यात चाऱ्याबाबत कुठल्याही प्रकारची चणचण नसल्याचे यावेळी सांगितले. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागावर लक्ष ठेवून असावे असेही यावेळी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना निर्देशित केले.
0000
वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...