जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह
पाऊस व वादळी वारे वाहण्याची शक्यता
· नागरिकांनी सावधगिरी बाळगावी
नांदेड, (जिमाका) दि. 1 :- प्रा
या गोष्टी करा : विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.
या गोष्टी करु नका: आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. याबाबत सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी असेही, आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.
00000
%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE%20%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87.jpeg)
%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE%20%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87.jpeg)