Tuesday, July 26, 2022

 शेतकऱ्यांनी रासायनिक खतासोबत

नॅनो युरीया खताचा वापर करावा

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :खरीप हंगाम पेरणीचे कामे जवळपास पुर्ण झालेली आहेत. जिल्हयातील शेतकरी खते खरेदीसाठी बाजारपेठेत चाचपणी करीत आहेत. खताबरोबर नॅनो युरीयाचा वापर केल्यास अधिक फायदेशीर होईल. नॅनो युरीया खताचा नत्राचा नायट्रोजन स्त्रोत आहे. जो पिकांची योग्य वाढ आणि विकासासाठी आवश्यक असणारा एक पोषक घटक आहे. सुक्ष्म कणांसाठी व पाने पुर्ण ओली  होण्यासाठी प्लॅट फॅन किंवा कट नोझल असलेल्या फवारणी पंपाचा वापर करावा. फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. ज्यावेळेस दवबिंदु पडलेले नसतील. गरज असल्यास नॅनो युरीया सोबत जैविक उत्तेजक बायोस्टीमुलटस )  शंभर टक्के  विद्राव्य खते आणि कृषि रसायन मिसळावीत. पण मिसळया आणि फवारणी आधी सुसंगता चाचणी करावी. नॅनो युरीया खताचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी.चलवदे यांनी केले आहे.

 

जगात नॅनो युरीया हा प्रथम इफको तंत्रज्ञान संशोधन संस्था यांनी  गुजरातमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसीत केलेला आहे. संपुर्ण भारतभर वेगवेगळया ठिकाणी व वेगवेगळया पिकांवरती घेण्यात आलेल्या चाचण्यांनुसार हे निश्चित करण्यात आले आहे कीनॅनो युरीयाच्या वापराव्दारे पारंपारिक नत्रयुक्त खतांचा 50 टक्के  पर्यंत वापर कमी करता येऊ शकतो. पारंपरीक पध्दतीने दिल्या जाणाऱ्या युरीया खतामधील फक्त 30-50 टक्के  नत्र हे पिकांना उपलब्ध होते. बाकी नत्र वायुरुपात अमोनियानायट्रस ऑक्साइड हवेत उडुन जाते व नायट्रेट रुपातील जमीन हवा व पाणी प्रदुषित करते.

 

नॅनो युरीया चे फायदे पुढील प्रमाणे आहेत.

नॅनो युरीया मुळे उत्पन्नावर कोणताही परिणाम न होता युरीया खताचा वापर कमी होतो. पिकाच्या उत्पादकते मध्ये वाढ व खर्चात बचत यामुळे शेतक-यांना उत्पन्नात वाढ होते. जमीनहवा व पाणी यांची गुणवत्ता सुधारते.नॅनो युरीया मध्ये एकुण वजनाच्या 4 टक्के नत्र आहे. नॅनो युरीया मधील नत्राचा सरासरी आकार हा 30-50 नॅनोमीटर दरम्यान आहे.

 

वापरण्याचे प्रमाण व पध्दत

2-4 मि.लि.नॅनो युरीया एक लिटर पाण्यात मिसळुन दोन वेळेस फवारणी करावी पहिल फवारणी फुटवे फांद्या निपण्याच्या अवस्थेत (उगवल्यानंतर 30-35 दिवसांनी किंवा लागवडी नंतर 20-25 दिवसांनीआणि दुसरी फवारणी फुल निघण्याच्या 7-10 दिवस अगोदर करावी.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...