अल्पसंख्याक घटकातील युवकांनी
तंत्रकुशल शिक्षणासाठी पुढे यावे - ज. मो. अभ्यंकर
नांदेड, (जिमाका) दि. 24 : अल्पसंख्याकांना विकासाचा प्रभावात आणण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत . डॉ. झाकीर हुसेन मदरसा शासनाने सुरू केला. आधुनिक शिक्षण प्रणालीव्दारे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते . तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिक शिक्षण प्रणालीव्दारे विद्यार्थ्यांनी अधिक तंत्र कुशल होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य आर. डी. शिंदे, के. आर. मेढे, रमेश शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे, पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, संतोषी देवकुळे यांची उपस्थिती होती.
नांदेड जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याकांची संख्या मोठी आहे. आज तरूण पिढीला आवश्यक असणारे औद्योगिक प्रशिक्षण देवून जास्तीत जास्त तरूण तरूणींना उदरनिर्वाह करण्यासाठी स्वंबळावर उभे करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी तंत्रशिक्षणात आवश्यक ते बदल होणे गरजे आहे . अल्पसंख्याक समुदायातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, प्री मेट्रिक शिष्यवृत्ती देण्यात येते अपुऱ्या मनुष्यबळामुळे या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
महराष्ट्रातील पहिले उर्दु घर हे नांदेड शहरात तयार करण्यात आले. येथे भव्य ग्रंथालय तयार करण्यात आले असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके व डिजीटल ग्रंथालय उपलब्ध असून येत्या काळात अभ्यासासाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल .यामुळे या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यंनी लाभ घ्यावा असे ते यावेळी म्हणाले.
बॉक्स
कृषी समाजकल्याण व पशुसंवर्धन अंतर्गत दुर्गम व
ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आंतरजातीय विवाह
केलेल्या जोडप्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ,
दुर्गम भागातील लाभार्थ्यांच्या चेहऱ्यांवरील समाधान बघून खूप आनंद
झाला. खर तर आयोगा समोर कागदावर अहवाल ठेवण्यात येतो परंतु जिल्हा परिषद नांदेडने
लाभार्थ्यांना समोर केल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा आनंद मिळाला . या भावना समितीने व्यक्त
केल्या.जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी
अधिकारी वर्षा ठाकुर – घुगे, यांनी
मेरी बेटी मेरा अभिमान अंतर्गत मुलींच्या नावाच्या पाट्यांच्या उपक्रमाचे त्यांनी
भरभरून कौतुक केले.स्त्री आत्मसन्मानाचा दृष्टिने हे महत्वाचे पाऊल आहे, असे त्यांनी नमूद केले.
000000
No comments:
Post a Comment