कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या निर्बंधात काही प्रमाणात शिथीलता
नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्गमीत केलेल्या आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन काही प्रमाणात शिथीलता दिली आहे. जिल्ह्यातील कोविड पॉझिटिव्हीटी रेट व ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता तसेच दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांची परिस्थिती लक्षात घेता 26 जून रोजीच्या आदेशानुसार लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करुन शासनाच्या पुढील आदेशापर्यंत 3 ऑगस्टपासून जिल्ह्यातील सेवाचा तपशिल व निश्चित करण्यात आलेल्या वेळा पुढीलप्रमाणे राहतील.
सर्व दुकाने, आस्थापना यांच्या वेळा- सर्व अत्यावश्यक व अत्याश्यक नसलेली (शॉपींग
मॉल सहीत) हे दररोज रात्री 8 वाजेपर्यंत चालू राहतील व शनिवार दुपारी 3 वाजेपर्यंत
सुरू राहतील (अत्यावश्यक दुकाने वगळून) रविवारी बंद राहतील. सार्वजनिक ठिकाणे
आणि खुली मैदाने- व्यायम, चालणे, जॉगींग
आणि सायकलींग यासाठी चालू राहतील. सर्व शासकीय कार्यालये व खाजगी कार्यालये-
पुर्ण क्षमतेने चालू राहतील. प्रवासाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची होणारी गर्दी
टाळण्यासाठी कार्यालयीन कामाचे तास नियंत्रीत करावे. ज्या कार्यालयांची कामे वर्क
फार्म होम पध्दतीने चालू आहेत ते त्याप्रमाणेच राहतील. सर्व कृषी विषयक,
बांधकामे, औद्योगिक कारखाने, वाहतूक तसेच माल वाहतूक संबंधीत कामे- पुर्ण
क्षमतेने सुरू राहतील. व्यायामशाळा, केशकर्तनालय
दुकाने, ब्युटी पार्लर्स, स्पा,
योगा सेंटर्स- 50 टक्के
क्षमतेसह पूर्वसूचना देऊन वेळ निश्चित केलेल्यासाठीच सोमवार ते शुक्रवार रात्री 8
वाजेपर्यंत, शनिवार दुपारी 3 वाजेपर्यंत आणि रविवार पुर्णपणे बंद राहतील. एसी, वातानुकुलिन
यंत्रणा चालू ठेवण्यास मुभा असणार नाही. सिनेमा हॉल, थिएटर, ड्रामा थिएटर, नाटयगृह,
मल्टी प्लेक्स (स्वेतंत्र तसेच मॉल्स मधील)- पुढील आदेशापर्यंत पुर्णपणे बंद राहतील. सर्व प्रार्थना स्थळे-
पुढील आदेशापर्यंत पुर्णपणे बंद राहतील. शाळा व महाविद्यालये- राज्य शिक्षण
विभागाचे तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे आदेश लागू राहतील. रेस्टॉरंटस- कोविड-19
च्या नियमाचे पालन करण्याच्या अटीसह 50 टक्के
क्षमतेसह दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. सायंकाळी 4
नंतर पार्सल सेवा सुरु राहील. जमावबंदी, संचारबंदी- रात्री 9 ते
सकाळी 5 वाजेपर्यंत वैध कारणाशिवाय बाहेर फिरण्यास मनाई
असेल. वाढदिवस कार्यक्रम, राजकीय, सामाजीक व सांस्कृ तिक कार्यक्रम, निवडणुका, निवडणूक प्रचार, रॅलीज, निषेध
मोर्चे- यापुर्वीचे निर्बंध कायम राहतील.
कोविड-19 च्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक
उपाय
मास्करचा वापर, शारिरीक अंतर पाळणे बंधनकारक सामाजिक अंतर ईत्याकदीचे पालन नागरीक काटेकोरपणे करतील. या उपायाचे पालन न करणारे नागरीक भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्तीअ व्यरवस्थापन अधिनियम 2005, मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. आदेशात नमुद नसलेल्या बाबी यापूर्वीच्या आदेशाप्रमाणे निर्बंधीत राहतील. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्काळ कार्यवाही करण्यात येईल. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात गटविकास अधिकारी तसेच नागरी भागात संबंधीत आयुक्त, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत मुख्याधिकारी यांची राहिल. या आदेशाची अंमलबजावणी करताना सद्भावनेने केलेल्या, कृत्यांसाठी कोणत्यांही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विरुध्द कार्यवाही केली जाणार नाही. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, तहसिलदार यांची राहिल.
साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 च्या मधील
तरतुदीनुसार संदर्भात नमूद अधिसूचना 14 मार्च 2020 अन्वये प्रादुर्भाव रोखण्यांसाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्यात
करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणुन जिल्हादंडाधिकारी यांना घोषित केले आहे. हा
आदेश 3 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी
डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केला आहे.
00000
No comments:
Post a Comment