Wednesday, November 19, 2025

 वृत्त क्रमांक 1224

मतदान व मतमोजणीच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार राहणार बंद 

नांदेड दि. 19 नोव्हेंबर : जिल्ह्यात नगरपरिषदा व  नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदानाच्या दिवशी मंगळवार 2 डिसेंबर 2025 व बुधवार 3 डिसेंबर 2025 मतमोजणीच्या दिवशी जिल्‍ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्‍याचे आदेश मार्केट अॅंड फेअर अॅक्‍ट 1862 चे कलम 5 अन्‍वये जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा‍दंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमीत केले आहेत.

नगरपरिषद व  नगरपंचायत मतदार संघात मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान व बुधवार 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. त्‍याअनुषंगाने पणन संचालकमहाराष्‍ट्र राज्‍यपुणे यांनी मतदान व मतमोजणी दिनांकास जिल्‍ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्‍यास आदेशित केले आहे. 

मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार भरणाऱ्या ठिकाणाची नावे पुढीलप्रमाणे आहेत. बिलोली येथे जनावराचा बाजार तर कुंडलवाडी, उमरी, लोहा येथे आठवडी बाजार तर मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच 3 डिसेंबर 2025 रोजी हिमायतनगर याठिकाणचे  आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार 4 डिसेंबर 2025 रोजी भरविण्यात यावेत, असे आदेश निर्गमित केले आहे.

00000  

 वृत्त क्रमांक 1223

ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी होत असल्यास

तक्रार निवारण अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन
                                                                                                                                                                                                                                                                                                                
नांदेड, दि. 19 नोव्हेंबर : ऊस तोडणी मजूर व मुकादम व वाहतूक कंत्राटदार यांचेकडून ऊस तोडणीसाठी रोख पैशाची व अन्य वस्तू व सेवा यांची मागणी होत असल्यास शेतकऱ्यांनी तक्रार निवारण अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी. संबंधित तक्रार निवारण अधिकारी यांनी तक्रारीचे निराकरण न केल्यास, कार्यालयाच्या ई-मेल rjdsnanded@rediffmail. com वर तक्रार करावी किंवा 02462-254156 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन प्रादेशिक सहसंचालक (साखर) विश्वास देशमुख यांनी केले आहे.
                                                                                                                                                                                                                                                                                                                
राज्यात 2025-26 गाळप हंगामात उपलब्ध असलेला सर्व ऊस सर्वसाधारणपणे 145-150 दिवसात गाळपा होईल एवढी साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढली आहे. शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळप होईल की नाही याबाबत शंका घेऊन ऊस लवकर गाळपास जावा यासाठी अनुचित मार्गाचा अवलंब करुन नये. ऊस पिक चांगले नाही, खराब आहे, ऊस पडलेला आहे, ऊस क्षेत्र अडचणीचे आहे, तोडणी करणे परवडत नाही अशी विविध कारणे सांगून शेतकऱ्यांकडून रोख पैशाची व अन्य वस्तू व सेवा यांची मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी याबाबत काही तक्रारी असल्यास कारखान्याच्या तक्रार निवारण अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
                                                                                                                                                                                                तक्रार निवारण अधिकाऱ्यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक
                                                                                                                                                                                                                                                                                                            
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लि. यु-1, लक्ष्मीनगर ता. अर्धापूर साठी आर.टी.हरकळ-8378990760, सुभाष शुगर प्रा.ली. हडसनी ता. हदगाव के.बी. वानखेडे-9423436621, एम.व्ही.के.ॲग्रो फुडस प्रॉडक्टस लि. वाघलवाडा, उमरी ता. नांदेड एम.जी.गाडेगांवकर-9850641709, कुंटूरकर शुगर अँन्ड अँग्रो प्रा.ली. कुंटूर ता. नायगाव साठी एस. देशमुख- 9423508437, ट्वेन्टीवन शुगर लि. यु-3 शिवणी, ता. लोहा साठी एस.ए. पंतगे- 7030908528, शिवाजी सर्व्हीस स्टेशन, मांजरी, बाऱ्हाळी ता. मुखेडसाठी एस.जी.माळेगावे-9359164988 याप्रमाणे तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नावे व संपर्क क्रमांक आहेत .शेतकऱ्यांनी ऊस तोडणीबाबत काही तक्रारी असल्यास यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000

वृत्त क्रमांक 1222

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे काम सुरळीत ;

नवीन LOI देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार

गैरव्यवहार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई


नांदेड, दि. 19 नोव्हेंबर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र (LOI) देण्याव्यतिरिक्त इतर सर्व कामकाज सुरळीत सुरू आहे. लाभार्थ्यांना दिला जाणारा व्याज परतावा कोणत्याही अडथळ्याविना नियमितपणे वितरित केला जात असल्याची अधिकृत माहिती महामंडळाने यापूर्वी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. सप्टेंबर 2025 अखेर ‘होल्ड’ व ‘ब्लॉक’ केलेली प्रकरणे वगळता व्याज परताव्यासाठी दावा केलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात व्याज परताव्याची रक्कम जमा करण्यात आली आहे.

काही माध्यमांमध्ये महामंडळाचे कामकाज बंद असल्याच्या बातम्या प्रसारीत झाल्या होत्या. त्या संदर्भात महामंडळाने स्पष्टीकरण दिले आहे. पात्रता प्रमाणपत्र (LOI) प्रक्रिया काही तांत्रिक कारणांमुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. मात्र व्याज परतावा व बँक मंजुरी प्रकरणांचे कामकाज सुरळीत सुरू आहे.

नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील काही एजंट व ट्रॅक्टर एजन्सींनी संगनमत करून एकाच मोबाईल क्रमांकाचा वापर करून अनेक प्रकरणे महामंडळाकडे दाखल केली होती. यातील काही व्याज परताव्याचे पैसे एजंटांने स्वतःच्या खात्यात घेतल्याचे निदर्शनास आले आहे. या माहितीची दखल घेऊन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांना त्वरित कारवाई साठी पत्र पाठविले. पोलिस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी तातडीने कारवाई करत तोफखाना पोलीस ठाणे, अहिल्यानगर येथे संबंधितावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. नाशिक व अहिल्यानगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अनियमिततेबाबत गुन्हे दाखल झाले असून, तपास सुरू असल्याची माहिती महामंडळाने दिली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांतही अशा प्रकारचे गैरव्यवहार घडले आहेत का, याची स्वतंत्र तपासणी सुरू आहे.

नाशिक व अहिल्यानगरसारख्या घटना अन्य ठिकाणी घडू नयेत म्हणून महामंडळाने Account Validation प्रणाली लागू केली आहे. एजंटमार्फत दाखल केलेली अशी प्रकरणे महामंडळाने तात्पुरत्या स्वरूपात ‘Block’ केली आहेत. ज्या लाभार्थ्यांची प्रकरणे Block आहेत त्यांनी त्यांच्या मूळ कागदपत्रांसह संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधावा. जिल्हा समन्वयकांचे संपर्क क्रमांक www.udyog.mahaswayam.gov.in या प्रणालीवर उपलब्ध आहेत.

यापुढे नागरी सुविधा केंद्र वगळता इतरत्र, एकाच मोबाईल क्रमांक किंवा लॉगिनवरून एकच प्रकरण दाखल करता येईल, अशी सुधारणा महामंडळाने प्रस्तावित केली आहे. पात्रता प्रमाणपत्र (LOI) प्रक्रियेतील तांत्रिक सुधारणा पूर्ण करून शक्य तितक्या लवकर नवीन LOI देण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
0000

 वृत्त क्रमांक 1221

तंबाखू मुक्त युवा अभियाना अंतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न                                                                                                                                                                                                                                                              नांदेड, दि. 19 नोव्हेंबर : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने जिल्हा मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे तंबाखू मुक्त युवा अभियान 3.0 अंतर्गत जनजागृती कार्यक्रम 18 नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न झाला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली व नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील यांच्या नियंत्रणाखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रणातर्गंत या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


तरुणांमध्ये तंबाखूचे व्यसन वाढत आहे. ही एक गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने 9 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2025 या कालावधीत संपूर्ण देशामध्ये तंबाखू मुक्त युवा अभियान 3.0 राबविले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांना तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती देणारी पोस्टर्स, पोम्लेटचे वाटप करून जनजागृती करण्यात आली. हा कार्यक्रम बस स्थानक प्रमुख यासीन खान यांच्या उपस्थित घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी जिल्हा सल्लागार डॉ. शितल चातुरे, डॉ. संजीवनी जाधव, समुपदेशक प्रकाश आहेर व सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड तसेच जिल्हा मध्यवर्ती बसस्थानक येथील लिपिक सुरेश फुलारी, गुलाब रब्बानी व इतर कर्मचारी उपस्थित होते.  
00000


वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...