Thursday, September 18, 2025

 वृत्त क्रमांक 979 

पावडेवाडी येथे ग्रामीण स्वच्छता अभियान संपन्न  

 

 नांदेडदि. 18 सप्टेंबर :भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस 17 सप्टेंबर ते महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता पंधरवडा मोहिम राबवल्या जात आहे. कौशल्य रोजगार उदयोजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने पावडेवाडी (बु.) येथे ग्रामीण स्वच्छता अभियानाचे आयोजन करून ग्रामीण स्वच्छता अभियान घेण्यात आले.

 

या अभियानात पावडेवाडी ग्रामपंचायतचे बंडूभाऊ भाऊराव पावडेउपसरपंच बंडूभाऊ गंगाधरराव पावडेबाळासाहेब पावडेनितीन सावतेग्रामपंचायत अधिकारी संजयकुमार रामोड महसूल अधिकारी शिवाजी तोतरेग्रामपंचायत कर्मचारी, गावकरी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी गावातील रस्तेसार्वजनिक ठिकाणेशाळा परिसर आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली आणि ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृतीही करण्यात आली. ग्रामपंचायतचे उपसरपंच बंडू पावडे यांनी उपस्थितांना दोन वेळेस अल्पोपहाराची व्यवस्था केली.                               

 

17 सप्टेंबर रोजी श्री गुरुगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथील  प्राचार्य,  जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी दिनेश पोतदार   आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSSविभागाच्या सदस्य व संस्थेतील सर्व गटनिदेशक, शिल्पनिदेशक, कंत्राटी निदेशक तासिका निदेशककार्यालयीन कर्मचारी व 150 ते 200 प्रशिक्षणार्थ्याच्यावतीने ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सहकार्याने पावडेवाडी (वाडी बुद्रुक) या गावात ग्रामीण स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

 

या उपक्रमाचे उद्दिष्ट ग्रामीण भागात स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि "स्वच्छ भारत" या संकल्पनेला बळकटी देणे हे होते. हा उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित न राहतासंस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला असून भविष्यातही असेच सामाजिक उपक्रम राबवले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

00000





वृत्त क्रमांक 978 

केळी-उत्तम कृषी पद्धती प्रशिक्षण वर्ग संपन्न 

 नांदेड, दि. 18 सप्टेंबर :- सहकार व पणन विभागाकडून आशियाई विकास बँक अर्थसाहित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, आत्मा व कृषी विभाग नांदेड हिरकणी बायोटेक अर्धापूर नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने अर्धापूर येथे केळी-उत्तम कृषी पद्धती प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण घेण्यात आले. 

नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सोसायटीचे चेअरमन धर्मराज देशमुख, केळी संशोधन केंद्राचे डॉ. शिवाजी शिंदे, अर्धापूर तालुका कृषी अधिकारी एस. एस. देवकांबळे, महाकृषी शेतकरी उत्पादक कंपनी उपसर सोलापूरचे व्यवस्थापक नरहर कुलकर्णी, प्रगतशील शेतकरी निलेश देशमुख, हिरकणी बायोटेक व्यवस्थापकीय संचालक रत्नाकर देशमुख, केळी तज्ज्ञ हेमंत कदम, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप, गजेंद्र नवघरे,अक्षय हातागळे, मॅग्नेट प्रकल्प लातूरचे श्री शेलार आदींची उपस्थिती होती. 

सर्वप्रथम मॅग्नेट प्रकल्पाने केळी पिकाचा कार्यक्रम अर्धापूर येथे घेतल्याबद्दल प्रकल्पाचे धर्मराज देशमुख यांनी आभार मानले. नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात भाव मिळावा अशी इच्छा व्यक्त केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निर्यातक्षम केळी पिकाचे उत्पादन घ्यावे, असे आवाहन केले. 

डॉ. शिवाजी शिंदे यांनी नांदेड जिल्ह्यातील केळी पीक संशोधन केंद्राचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचा आवाहन केले. तसेच उत्तम प्रतीच्या केळीच्या घडांची निर्मिती याविषयी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी देवकांबळे यांनी केळी पिकासाठी विविध शासनाच्या योजना विषयी माहिती दिली. डॉ. नरहरी कुलकर्णी यांनी केळी पीक उत्पादनातील संधी व आव्हाने यावर मार्गदर्शन केले. तसेच केळी उत्तम कृषी पद्धती यामधील बारकावे समजून सांगितले. 

निर्यात क्षम केळी रोपांची निर्मिती यामधील बारकावे रत्नाकर देशमुख यांनी समजून सांगितले. केळीचे मार्केटिंग तंत्रज्ञान व रोपवाटिकेमधील योग्य रोपांची निवड यावर हेमंत कदम यांनी मार्गदर्शन केले. लिंग समावेशन व सामाजिक समानता याविषयी अक्षय हातागळे यांनी मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी किशोर देशमुख यांनी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केळी पिकासाठी असलेली संधीचे महत्त्व विशद करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शीत साखळी तंत्रज्ञानाचा वापर करावा असे सांगितले. निर्यादक्षम केळी पिकाचे धोरण शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांनी आवाहन केले.   

प्रास्ताविकात हेमंत जगताप यांनी महामंडळाला नांदेड जिल्ह्याकेळी पीक कार्यशाळा घेण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मॅग्नेट प्रकल्पाचे आभार मानले. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये दोनशेहून अधिक शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला. सूत्रसंचालन हेमंत जगताप यांनी केले तर आभार गजेंद्र नवघरे यांनी मानले. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कृषी विभाग अर्धापूर व हिरकणी बायोटेक अर्धापूर यांच्या सर्व टीमचे सहकार्य लाभले.

00000





 वृत्त क्रमांक 977 

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा नांदेड दौरा 

 नांदेड, दि. 18 सप्टेंबर :- राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे शनिवार 20 सप्टेंबर 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

शनिवार 20 सप्टेंबर रोजी अकोला येथून मोटारीने सायं. 5 वा. श्री गुरूगोविंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. सायं. 6.25 वा. श्री गुरूगोविंदसिंघजी विमानतळ येथून विमानाने लोहगाव विमानतळ पुणेकडे प्रयाण करतील.

00000    

 वृत्त क्रमांक 976   

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा नांदेड दौरा 

 नांदेड, दि. 18 सप्टेंबर :- राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील हे 19 व 20 सप्टेंबर रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील राहील. 

शुक्रवार 19 सप्टेंबर रोजी पुणे विमानतळ येथून सायं 6 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सायं. 6.10 वा. नांदेड विमानतळ येथून वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सायं. 6.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन, राखीव व मुक्काम. 

शनिवार 20 सप्टेंबर रोजी सकाळी 9.15 वा. तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरूद्वाराकडे प्रयाण. सकाळी 9.30 वा. तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरूद्वारा येथे आगमन व राखीव. सकाळी 10.05 वा. वाहनाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडकडे प्रयाण. सकाळी 10.25 वा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या 28 व्या दीक्षान्त समारंभास उपस्थिती. दुपारी 12.30 वा. राखीव. दुपारी 1.30 वा. स्टार्टअप उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती स्थळ-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. दुपारी 3 वा. वाहनाने श्रीमती कुसुमताई चव्हाण सभागृहाकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. श्रीमती कुसुमताई चव्हाण सभागृह येथे आगमन व बुद्धीजीवी संमेलनास उपस्थिती. सायं. 5 वा. वाहनाने नांदेड विमातनळ येथे आगमन व राखीव. सायं. 6.25 वा. नांदेड विमानतळ येथून विमानाने पुणेकडे प्रयाण करतील.

00000

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...