Wednesday, July 30, 2025

#रस्तासुरक्षामोहिम

वृत्त क्र. 782

जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन साजरा

नांदेड ३० जुलै :- जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त,महिला व बाल विकास विभाग जिल्हा बाल संरक्षण कक्ष चाईल्ड लाईन  व जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान याच्या संयुक्त  विद्यमानाने नांदेड जिल्हामध्ये एक अभिसरण कार्यक्रम आज घेण्यात आला. ज्यामध्ये बाल संरक्षण आणि बाल हक्क परिसंस्थेतील प्रमुख ,सर्व विभाग एकत्र आले होते. बाल तस्करीशी लढण्यासाठी समन्वित, आंतर-एजन्सी कृती आवश्यक आहे हे एकत्रितपणे ओळखून संवादात सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमात भाग घेतला. जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान नांदेड ही जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन मुलांचे संरक्षण, सुटका आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी नांदेड जिल्हामध्ये सक्रियपणे काम करत आहे. जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन, यांनी बाल तस्करी रोखण्यासाठी कायदा अंमलबजावणी संस्थांना येणाऱ्या आव्हानांवर चर्चा करताना, कार्यक्रमात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी विद्यमान कायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याची, तस्करी नेटवर्कबद्दल समुदायांना संवेदनशील करण्याची आणि सुटका केलेल्या मुलांचे वेळेवर न्याय आणि प्रभावी पुनर्वसन सुनिश्चित करण्यासाठी सर्व एजन्सींमध्ये समन्वय मजबूत करण्याची तातडीची गरज यावर एकमताने सहमती दर्शविली. 

या कार्यक्रमास जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनी बालकाच्या संदर्भात काम करत असताना समन्वयाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असून नांदेड येथील रेल्वेस्थानक व बसस्थानक येथून बालकांची तस्करी होत असल्यास सदरील हालचालींवर लक्ष ठेवून सर्व यंत्रणेला तात्काळ कार्यान्वित करण्याचे मार्गदर्शन केले.

सर्वांनी आपले महत्वाचे योगदान द्यावे. तसेच मानवी तस्करी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक ए जी मोरे. आर पी एफ चे श्री मीना. जीआरपीएफचे श्रीमती स्वाती ठाकूर जनसेवा प्रतिष्ठानचे जगदीश राऊत व जिल्हा समन्वयक निलेश कुलकर्णी व आशा सूर्यवंशी, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कल्पना राठोड, चाईल्ड लाईनच्या ऐश्वर्या व दिपाली हिंगोल, रेल्वे स्थानकातील टी.सी फेरीवाले सदरील रेल्वे स्थानक परिसरात  प्रवाशांना चाईल्ड लाईन 1098 ची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली.

०००००



वृत्त क्र. 781

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

नांदेड दि. 30 जुलै : नांदेड जिल्ह्यात  31 जुलैच्या सकाळी 6 वाजेपासून ते 14 ऑगस्ट 2025 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात  31 जुलैच्या सकाळी 6 वाजेपासून ते 14 ऑगस्ट 2025 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल.  

त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

0000

 वृत्त क्र. 780

नांदेड जिल्हा निर्यातक्षम फुल पिके उत्पादक शेतकऱ्यांचा हब होण्यासाठी मदत करणार 

- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले  

मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत फुल पिके उत्तम कृषीपद्धती या विषयावर प्रशिक्षण संपन्न

नांदेड दि. 30 जुलै :- अलिकडच्या काळात शेतकऱ्यांनी इतर पिकांबरोबर निर्यातक्षम फुल पिके  उत्पादकतेवर भर द्यावा. भविष्यात नांदेड जिल्हा निर्यातक्षम फुल पिके उत्पादक शेतकऱ्यांचा हब होण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन भवनात आज सहकार व पणन विभाग अंतर्गत आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र ऍग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, कृषी व आत्मा विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने फुल पिके  उत्तम कृषी पद्धती या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. 

कार्यक्रमास नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय लहानकर, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे प्रशिक्षण विभाग प्रमुख दिगंबर साबळे, मॅग्नेट प्रकल्प लातूर विभागीय प्रकल्प उपसंचालक महादेव बरडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा दत्तकुमार कळसाईत, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणेचे मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप, प्रकल्प उपसंचालक मॅग्नेट लातूर महादेव बरडे,  विभागीय प्रकल्प अधिकारी मॅग्नेट,  भारतीय पुष्प अनुसंधान पुण्याचे शास्त्रज्ञ डॉ. गणेश कदम, केएफ बायो प्लांट्स पुणेचे तांत्रिक अधिकारी राजन निफाडकर, न्यू लीफ डायनामिक टेक्नॉलॉजीचे तांत्रिक अधिकारी विवेक वीर  , शितलादेवी शेतकरी उत्पादक कंपनी, बारडचे अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर, हिरकणी बायोटेकचे रत्नाकर देशमुख, मॅग्नेट प्रकल्पाचे गजेंद्र नवघरे आदी उपस्थित होते. 

नांदेड जिल्ह्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन बाजारपेठेचा अभ्यास, प्रक्रिया युक्त फुलपिकांच्या बाबी यासाठी संघटित होऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. तसेच शेतीसह शेतमाल प्रक्रिया उद्योगाकडे वळावे. उत्पादित केलेला पक्का शेतमाल निर्यात करण्याकडे भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले. 

अशा प्रकारचा प्रशिक्षण कार्यक्रम नांदेड जिल्ह्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबविल्याबद्दल मॅग्नेट प्रकल्पाचे सभापती संजय लहानकर यांनी आभार मानले. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी आवश्यक ती मदत केली जाईल असेही त्यांनी सांगितले. 

मॅग्नेट प्रकल्प अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी  फुल पिके  निर्यातीसाठी  मॅग्नेट प्रकल्पांतर्गत आवश्यक ती सर्व मदत केली जाईल असे विभागीय प्रकल्प उपसंचालक महादेव बरडे यांनी आश्वासित केले. फुल पिके  निर्यातीसाठी आवश्यक ती सर्व मदत त्यासाठी लागणारी ऑनलाइन नोंदणी याविषयी कृषी विभाग मार्गदर्शन व मदत करेल असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार  कळसाईत यांनी सांगितले. 

फुल पीक तंत्रज्ञानातील वाव व संधी याविषयी प्रशिक्षण विभाग प्रमुख दिगंबर साबळे यांनी मार्गदर्शन केले. 

एमसीडीसीला लातूर विभागामध्ये फुल पिके प्रशिक्षण घेण्यासाठी मॅग्नेट प्रकल्पाने संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रकल्पाचे आभार मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप यांनी मानले. खुल्या वातावरणातील फुलशेती लागवड तंत्रज्ञानातील विविध बारकावे पुण्याचे शास्त्रज्ञ डॉ.गणेश कदम  यांनी समजून सांगितले. संरक्षित शेती वातावरणातील फुल पिके तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती तांत्रिक अधिकारी राजन निफाडकर दिली. बायोमास आधारित शीत साठवणूक तंत्रज्ञान यासंबंधी मार्गदर्शन तांत्रिक अधिकारी विवेक वीर यांनी केले. या कार्यक्रमासाठी नांदेड जिल्ह्यातील ३५० हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.

00000





वृत्त क्र. 779

राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांचा दौरा

नांदेड दि. 30 जुलै :-राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

सोमवार 4 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई येथून सकाळी 9 वा. नांदेड येथे आगमन व शासकीय विश्रामगृह कडे रवाना. सकाळी 11.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे अप्पर जिल्हाधिकारी तथा जिल्हा तक्रार निवारण अधिकारी यांचे समवेत एईपीडीएस अंतर्गत नियतन, उचल व वाटपाचा आढावा. दुपारी 12 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिक्षणाधिकारी प्राथमिक व प्रशासकीय अधिकारी शा.पो.आ यांचे समवेत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत नियतन, उचल व वाटपाचा आढावा. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा बाल रोग तज्ञ व मनपा बाल रोग यांचेसमवेत कुपोषीत बालकांबाबत आढावा. तसेच एनआरसीमध्ये गत 2 वर्षात दाखल बालकांबाबतचा अहवाल. दुपारी 1 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा कार्यक्रम अधिकारी व प्रकल्प अधिकारी शहरी व ग्रामीण यांचे समवेत महिला व बाल विकास सेवा योजनेअंतर्गत नियतन, उचल व वाटपाचा आढावा. दुपारी 2.30 वा. जिल्ह्यातील तृतीयपंथी संघटना, भीकमुक्ती संदर्भीय काम करणाऱ्या संघटना, वेश्याव्यावसायिक यांच्याशी संलग्न संघटना, आदिवासी तालुक्यांना भेटी, शा. पो.आ.अंतर्गत बचतगट आयसीडीसी अंतर्गत बचतगट, गलीच्छवस्तींना भेटी, शासकीय धान्य गोदाम, शालेय पोषण आहार पुरवठादार गोदामे, महिला व बाल विकास सेवा योजना पुरवठादार गोदामांना भेटी तसेच केंद्रीय स्वयंपाकगृह, शाळा, अंगणवाडी, स्वच्छ धान्य दुकानांना भेटी. सायंकाळी 6 वा. शासकीय विश्रामगृहाकडे रवाना व मुक्काम. 

मंगळवार 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते 6 पर्यत आदिवासी तालुक्यांना  भेटी, शासकीय धान्य गोदामे, महिला व बाल विकास सेवा योजना पुरवठादार गोदामांना भेटी, शा.पो.आ व आयसीडीएस अंतर्गत बचतगट यांना भेटी तसेच केंद्रीय स्वयंपाकगृह शाळा, अंगणवाडी, स्वस्त धान्य दुकानांना भेटी.

बुधवार 6 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.30 ते 6 पर्यत आदिवासी तालुक्यांना भेटी, शासकीय धान्य गोदाम, शालेय पोषण आहार पुरवठादार गोदामे, महिला व बाल विकास सेवा योजना पुरवठादार गोदामांना भेटी, शा.पो.आ. व आयसीडीएस अंतर्गत बचतगट यांना भेटी तसेच केंद्रीय स्वयंपाकगृह शाळा, अंगणवाडी, स्वस्त धान्य दुकानांना भेटी . सायंकाळी 7 वा. वाहनाने नांदेड येथून मुंबईकडे प्रयाण करतील. 

00000

 वृत्त क्र. 778

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा दौरा कार्यक्रम

नांदेड दि. 30 जुलै :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे दोन दिवसाच्या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

गुरुवार 31 जुलै 2025 रोजी देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.50 वा. हुजुर साहेब नांदेड येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण करतील. सकाळी 9.10 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 2.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून भारतीय जनता पार्टी महानगर कार्यालय शिवाजीनगर औद्योगिक वसाहत प्लाझा नाना नानी पार्कच्या समोर नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3 ते सायं 5 वाजेपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक स्थळ- भारतीय जनता पार्टी महानगर कार्यालय शिवाजीनगर नाना नानी पार्कच्या समोर नांदेड. सायं 5 वा. भारतीय जनता पार्टी महानगर कार्यालय शिवाजीनगर नांदेड येथून कुसुम गोकुळनगर पिपल्स हायस्कुल समोर कुसूम बाळ रुग्णालय नांदेडकडे प्रयाण. सायं 5.10 वा. डॉ. सुधीर कोकरे कार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची सदिच्छा भेट. स्थळ- कुसूम गोकुळनगर कुसूम बाळ रुग्णालय नांदेड. सायं 5.30 वा. गोकुळनगर येथून शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सायं. 5.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम. 

शुक्रवार 1 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक. स्थळ- बैठक कक्ष मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृह स्नेहनगर नांदेड. दुपारी 12.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून सचखंड गुरूद्वारा गुरूद्वारा रोड यात्री निवास रोड नांदेडकडे प्रयाण. दुपारी 12.35 वा. सचखंड गुरूद्वारा नांदेड येथे भेट. दुपारी 12.55 वा. सचखंड गुरूद्वारा गुरूद्वारा रोड नांदेड येथून शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन. दुपारी 1 ते  सायं 5 वाजेपर्यंत राखीव. सायं 5 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून श्री गुरू गोबिंद सिंघजी विमानतळ नांदेडकडे प्रयाण. सायं. 5.15 वा. श्री गुरू गोबिंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. सायं 6.10 वा. श्री गुरुगोबिंद सिंघजी विमानतळ नांदेड येथून विमानाने पुणेकडे प्रयाण करतील.

0000

वृत्त क्र. 777

शुक्रवारचा आठवडी बाजार बंद

शुक्रवार ऐवजी शनिवारी भरणार आठवडी बाजार

नांदेड दि. 30 जुलै :- नांदेड जिल्ह्यात व शहरात 1 ऑगस्ट 2025 रोजी दरवर्षीप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. यादिवशी शुक्रवार येत असल्याने यादिवशी नांदेड शहरात भरणारा आठवडी बाजार शुक्रवार ऐवजी शनिवारी भरण्यात येणार आहे, कृपया शेतकरी, ग्राहक, व्यापारी यांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

दर शुक्रवारी साठे चौक परिसर, व्हिआयपी रोड, महादेव दाल मिल ते आनंद नगर चौरस्ता रोड नं. 26 हमालपुरा, ईश्वरनगरकडे जाणारे रोडवर गोकुळनगर इत्यादी परिसरात मोठया प्रमाणात आठवडी बाजार भरत असतो व बाजारचे दिवशी मोठी वर्दळ असते. या शुक्रवारी भरणाऱ्या बाजारामुळे जयंती सोहळयास, मिरवणूका यांना अडथळा निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी मार्केट अँड फेअर अँक्ट 1862 चे कलम 5 अन्वये 1 ऑगस्ट रोजी शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत. 

00000

 #मुख्यमंत्रीरोजगारनिर्मितीयोजना

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...