Tuesday, November 4, 2025

वृत्त क्रमांक 1160  

हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

 प्रत्यक्ष खरेदी 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार 

नांदेड दि. 4 नोव्हेंबर :- केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी अंतर्गत नाफेडच्यावतीने नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम 2025-26 मध्ये हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी 30 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी एकूण 13 खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात सोयाबीन खरेदी शनिवार 15 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. 

मुखेड तालुका खरेदी विक्री संघ मुखेड, हदगाव तालुका खरेदी विक्री संघ हदगाव, कुंडलवाडी विविध कार्यकारी से. सह. सो. कुंडलवाडी, नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सह.संस्था (अर्धापुर), तालुका खरेदी विक्री संघ बिलोली (कासराळी), पंडित दीनदयाल उपाध्याय अभिनव सह. संस्था देगलूर, बळीराम पाटील फळे व भाजीपाला सह.ख.वि.संस्था (बेरळी), मुखेड फळे व भाजीपाला सह.ख.वि. संस्था (उमरदरी), किनवट तालुका कृषिमाल प्रक्रिया सह. संस्था गणेशपूर (ता. किनवट), जय महाराष्ट्र शेतीमाल खरेदी विक्री सह.संस्था (कौठा), स्वामी विवेकानंद अभिनव सह. संस्था (शेळगाव थडी) ता. धर्माबाद, अष्टविनायक शेतीमाल खरेदी विक्री सह. संस्था मानवाडी फाटा (ता. हदगाव), महात्मा बसवेश्वर ग्रामीण विकास मंडळ बापशेटवाडी (मुक्रामाबाद) या ठिकाणी मार्केटिंग फेडरेशन मार्फत मूग, उडीद, सोयाबीन ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू झाली आहे. 

शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी चालू हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचा ई- पिक पाहणी अहवाल नोंद असलेला सात/बारा उतारा, आधारकार्ड व बँक पासबूक इत्यादी कागदपत्रे संबंधित तालुक्यातील खरेदी केंद्रावर देऊन नोंदणी करावी. सदरील नोंदणी ही ऑनलाईन पध्दतीने POS मशीनद्वारे करण्यात येणार असल्याने नोंदणीसाठी प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे.

000000

 


No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...