वृत्त क्रमांक 846
गायरान जमिनीच्या जीईओ फेनसिंगबाबत कार्यशाळा संपन्न
नांदेड दि. 13 ऑगस्ट :- जिल्ह्यात वाटप करावयाच्या शिल्लक असणाऱ्या गायरान जमिनीबाबत गुगल अर्थ प्रणालीचा वापर करून शासकीय जमिनीचे जीईओ फेनसिंगबाबत कार्यशाळा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आयोजीत करण्यात आली होती. या कार्यशाळेत जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार व ग्राममहसूल अधिकारी, मंडळ अधिकारी आदींची उपस्थिती होती.
शासकीय जमिनीचा एकत्रित डाटा बँक तयार व्हावा व त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पेतून वरील कार्यशाळा घेण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या मिशन 150 दिवस अंतर्गत शासकीय कामामध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यात सदर प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या कार्यशाळेस जालना येथून विशेष उपस्थित राहिलेले ग्राम महसूल अधिकारी दुर्गेश गिरी यांनी मार्गदर्शन केले.
0000
No comments:
Post a Comment