वृत्त क्रमांक 837
कृषीक्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे शेतकरी, संस्थेनी विविध कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावे
- जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत
नांदेड दि. 12 ऑगस्ट :- सन 2024 च्या विविध कृषि पुरस्कारासाठी शेतकरी, गट, संस्था यांनी आपले प्रस्ताव 3 प्रतीत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात मंगळवार 26 ऑगस्ट 2025 रोजी सायं 6 वा. पर्यंत सादर करावेत. परिपूर्ण प्रस्तावासोबत योग्य ती कागदपत्रे, केलेले उल्लेखनिय कार्य असे सर्व दस्ताऐवजासह मार्गदर्शक सुचानेप्रमाणे विहित वेळेतच संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावेत. मुदतीत प्रस्ताव सादर न केल्यास अथवा प्रस्ताव परिपूर्ण नसल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही याची आवेदकाने काळजी घ्यावी. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय किंवा सहायक कृषि अधिकारी (कृषि सहायक) किंवा उपकृषि अधिकारी (कृषि पर्यवेक्षक) किंवा मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. राज्य शासनातर्फे दरवर्षी कृषी क्षेत्रात संघटनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्ती, गट, संस्थेला पुरस्कार देण्यात येतो. उल्लेखनिय, अतिउल्लेखनिय कार्य करणारे तसेच राज्याला, जिल्ह्याला दिशादर्शक ठरणारे व्यक्ती, गट, संस्था यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. राज्यात दरवर्षी शेती, फलोत्पादन व पुरक क्षेत्रात अतिउल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिला शेतकरी तसेच पुरुष शेतकरी अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभुषण पुरस्कार, जिजामाता कृषीभुषण पुरस्कार, कृषीभुषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, उद्यानपंडीत पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार व वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार इत्यादी पुरस्कार राज्यपाल यांचे हस्ते प्रदान करुन सन्मानित करण्यात येते.
पुरस्काराचे स्वरुप
सन 2024 करीता संपूर्ण महाराष्ट्रातून देण्यात येणारे पुरस्कार, त्यांची संख्या व धनादेश रक्कम पुढीलप्रमाणे
आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार राज्य स्तरावर 1 पुरस्कार रक्कम 3 लाख रुपये, वसंतराव
नाईक कृषी भूषण
पुरस्कार प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे प्रत्येकी
8 पुरस्कार रक्कम 2 लाख, जिजामाता कृषी भूषण (केवळ महिला शेतकरी) पुरस्कार प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे प्रत्येकी 8 पुरस्कार रक्कम 2 लाख, सेंद्रीय
शेती कृषीभूषण
पुरस्कार प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे प्रत्येकी
8 पुरस्कार रक्कम 2 लाख,
वसंतराव नाईक शेतिमित्र पुरस्कार प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे प्रत्येकी 8 पुरस्कार रक्कम 1 लाख
20 हजार रुपये, उदयान पंडीत पुरस्कार प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे प्रत्येकी
8 पुरस्कार रक्कम 1 लाख, युवा शेतकरी पुरस्कार प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे प्रत्येकी 8 पुरस्कार रक्कम 1 लाख
20 हजार तर वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सर्वसाधारण गट-34 आणि आदिवासी गट 6 याप्रमाणे 40 पुरस्कार असून रक्कम
44 हजार रुपयाचा धनादेशाद्वारे दिला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी
दत्तकुमार कळसाईत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
00000
No comments:
Post a Comment