वृत्त क्रमांक 833
मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 120 रुग्णांची तपासणी व औषधोपचार
नांदेड दि.१२ ऑगस्ट:– मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड आणि अभ्युदय लाईफ केअर हॉस्पिटल, साठे चौक नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने शिव मंदिर, चैतन्य नगर चौक येथे 10 ऑगस्ट रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शिबिरात प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. श्रीवल्लभ कार्लेकर व डॉ. संतोष मेकेवार यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टिमने 120 रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार केले.
यावेळी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत मुंडे, समाजसेवा अधीक्षक गजानन वानखेडे, लिपिक नारायण वाडेकर, शिव मंदिर ट्रस्टचे सचिव उदय तोरणेकर, पुजारी काशिनाथ मठपती उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी जितू कांबळे व इतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
००००


.jpeg)

No comments:
Post a Comment