Tuesday, June 24, 2025

वृत्त क्र. 654

1 जुलै रोजी जिल्हा परिषदेत कृषी दिनाचे आयोजन

नांदेड दि. 24 जून :- माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषिक्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल 1 जुलै हा दिवस त्यांचा वाढदिवस राज्यात कृषिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी 1 जुलै 2025 रोजी जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत कृषिदिन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या अध्यक्षतेखाली कै. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, नांदेड येथे साजरा करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, विद्यापीठ शास्त्रज्ञ, जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी, कृषी विभाग महाराष्ट्र शासन, आत्मा नांदेडचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्ह्यातील राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी, शेती क्षेत्रात उल्लेखनिय काम करणारे शेतकरी व महिला, शेंद्रीय शेती करणारे शेतकरी, माध्यम प्रतिनिधी यांची उपस्थिती राहणार आहे, असे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...