Friday, November 1, 2024
वृत्त क्र. 1018
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत
निवडणूक खर्चाचे सोमवारी प्रशिक्षण
नांदेड, दि. 1 नोव्हेंबर : 16-नांदेड लोकसभा मतदारसंघ, 89-नायगाव विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचे खर्च निरीक्षक यांच्या समक्ष निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने प्रशिक्षणाचे आयोजन सोमवार 4 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 4 वा. तहसील कार्यालय नायगाव येथे करण्यात आले आहे.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 77 नुसार निवडणूकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वतः, ती स्वत: किंवा त्याच्या/तिच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे त्याला/तिला नामनिर्देशित करण्यात आले आहे त्या दिनांकापासून निवडणुकीच्या निकाल लागण्याच्या दिनांकापर्यंत दोन्ही दिनांक धरुन, त्याने किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे.
भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकांनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 च्याअनुषंगाने 89-नायगाव विधानसभा मतदार संघातील निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना/त्यांच्या खर्च प्रतिनिधींना उमेदवारांच्या निवडणूक खर्चाबाबतच्या भारत निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या तरतूदी अवगत करुन देण्यासाठी खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत सोमवार 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वा. तहसील कार्यालय नायगाव येथे प्रशिक्षण, बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी 89-नायगाव विधानसभा मतदारसंघ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0000
वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक 975 हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जनक्रांती व हुतात्मा संतराम कांगठीकर वाचनालयात भव्य ग्रंथप्रदर्शन नांदेड, दि. 17 सप्...