Tuesday, April 30, 2024

 वृत्त क्र. 397

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 65 वा दिन उत्साहात साजरा

·         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण

·         उत्कृष्ठ कामगिरी बाबत कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव 

नांदेड दि. 1 :- महाराष्ट्र राष्ट्र स्थापनेच्या 65 व्या दिनाचा मुख्य शासकीय समारोह मोठ्या उत्साहात वजीराबाद येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर सकाळी 8 वाजता साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनी समस्त जिल्हावाशियांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे,  अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, श्रीमती किर्तीका अन्य वरिष्ठ अधिकारी आणि जेष्ठ सन्माननीय नागरिक तसेच स्वातंत्र सैनिक व त्यांचे कुटुंबियाची उपस्थिती होती. 

 

ध्वजारोहण व ध्वजवंदनानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून निवड झालेला आदर्श तलाठी पुरस्कार उमाकांत दत्तराम भांगे यांना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व 5 हजार रुपयाचा धनादेश आणि प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे जिल्हा अग्निशामक दलाचे अधिकारीकर्मचारी  ज्ञानेश्वर सुर्यवंशी व निलेश निवृत्ती काबंळे यांना उत्कृष्ठ कामगिरी केल्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला. 

 

जिल्हा पोलीस दलाच्या बँड पथकाने राष्ट्रगीतासह राज्यगीत सादर केले.  यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना व राष्ट्रगीतानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संचलन करणाऱ्या पथकाचे पोलीस वाहनातून निरीक्षक केले. परेड कमांडर संकेत सतीश गोसावी  सेकंड परेड कमांडर विजयकुमार धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलनात केंद्रीय राखीव पोलीस दल, सशस्त्र पोलीस पथक, सशस्त्र महिला पोलीस पथक, दंगा नियंत्रण पथक, गृहरक्षक दलाचे पुरूष व महिला पथक, राष्ट्रीय छात्रसेना,  पोलीस बॅन्ड पथक, डॉग स्काड,  मार्क्स मॅन वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथक, वज्र वाहन, बुलेट रायडर, मिनी रेस्क्यू फायर टेंडर, अग्नीशामक वाहन, 108 रुग्णवहिका यांचा पथसंचलनात सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले. तत्पूर्वी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय व मनपा आयुक्त कार्यालयात आज ध्वजारोहण संपन्न झाले.

 

तसेच पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडून जाहिर केलेले पुरस्कार पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना आज सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. दिलीप पुनमचंद जाधव, दहशतवाद विरोधी पथक नांदेड, पंढरीनाथ मुदीराज, वाचक शाखा, विक्रम बालाजीराव वाकडे, ग्रामीण पोलीस स्टेशन, संतोष विश्वनाथ सोनसळे, पोलीस मुख्यालय नांदेड, मो. असलम मो. हनिफ, एटीबी नांदेड, सिद्धार्थ पुरभाजी हटकर, नागरी हक्क संरक्षण नांदेड, दिनेश पारप्पा वसमतकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ  देवून सन्मानित करण्यात आले.

000000












वृत्त क्र. 396

 जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता,

नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

नांदेड दि. 30 :- जिल्ह्यात आज ३० एप्रिल  व उद्या 1 मे 2024 रोजी काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.  

उन्हाचा कडाका वाढल्याने प्रादेशिक हवामान विभागाकडून जिल्ह्यात आज ३० एप्रिल व उद्या 1 मे 2024 रोजी तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे उष्माघातासारख्या समस्या निर्माण होऊ शकतातहे लक्षात घेऊन नागरिकांनी काळजी व उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

उष्णतेच्या लाटेदरम्यान लहान मुलं व वृद्ध यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्याची काळजी घेताना या काळात सैलहलकेफिक्या रंगाचे आणि सुती कपडे परिधान करावेत. हलका आहार घ्यावाफळे आणि सलाद सारखे पचायला हलके असणारे अन्न खावे.  पुरेसे पाणी प्या. उन्हापासून बचाव करण्यासाठी गॉगल/छत्री/टोपी/बूट/चप्पल घालूनच घराबाहेर पडावे. प्रवास करताना पिण्याच्या पाण्याची बाटली आपल्याजवळ बाळगावी. शक्य असल्यास थंड पाण्याने आंघोळ करावी.  घराबाहेरील उपक्रम/मैदानी उपक्रमा दरम्यान थोड्या-थोड्या वेळाने विश्रांती घेत चला व विश्रांतीची वारंवारता वाढवावी.

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उष्माघाताची पुढील प्रमाणे लक्षणे आढळल्यास काळजी घ्यावी. डोकेदुखीतापउलट्याजास्त घाम येणे आणि बेशुध्द पडणेअशक्तपणा जाणवणेशरीरात पेटके येणेनाडी असामान्य होणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तीला सावलीच्या ठिकाणी झोपवाव्यक्तीचे कपडे सैल करा. त्याला द्रव पदार्थ जसे पाणीओ.आर.एस.फळांचा रस यापैकी एक पाजा. चहा किंवा कॉफी देण्याचे टाळा. तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवा. बाधित व्यक्तीला तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा आणि वैद्यकीय सल्ला घ्या. अतिकष्टाची कामे सकाळी किंवा संध्याकाळी करावीत. जेव्हा सूर्यप्रकाश प्रखर नसेल तेव्हाच अशी कामे करा. नागरिकांनी वरील काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे.

0000

वृत्त क्र. 395

 वाढत्या तापमानात उष्माघातापासून

बचावासाठी आरोग्याकडे लक्ष द्या : जिल्हा आरोग्य अधिकारी

नांदेड दि. 29 :- मागील काही दिवसांपासून उन्हाळ्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. राष्ट्रीय हवामान विभागाकडे ३ एप्रिल 2024 रोजी देशातील पश्चिम राजस्थानउत्तर पश्चिम मध्य प्रदेशविदर्भउत्तर गुजरात व मराठवाड्यात सर्वाधिक तापमानाची ४१ ते ४३°C नोंद झाल्याचे आढळून आले आहे. तसेच अकोला येथे ४४°C ही देशातील सर्वाधिक तापमाणाची नोंद करण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या पुढच्या पाच दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये सुध्दा तापमान वाढ कायम राहण्याचे संकेत आहेत. नागरिकांमध्ये तापमानवाढउष्णतेची लाट याबाबत जागरुकता निर्माण होणे गरजेचे असूनयासाठी सर्वसामान्य लोकांना संभाव्य तापमानवाढीचे संकेत लक्षात यावेत यासाठी कलर कोडींगचा वापर हवामान विभागाकडून केला जातो.

 उदा. पांढरा रंग सर्वसामान्य दिवस (नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा कमी तापमान)पिवळा अलर्ट उष्ण दिवस (जवळपास नेहमीच्या कमाल तापमानाएवढे तापमान)केशरी अलर्ट उष्णतेची मध्यम स्वरुपाची लाट (नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा 4 ते 5 डिग्री सेल्सियस जास्त तापमान)लाल अलर्ट अत्यंत उष्ण दिवस (नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा 6 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान) उष्माघात होऊ नये यासाठी प्रत्येकाने जागरूक राहीले पाहीजे. उन्हाळयामध्ये उष्माघाताने रुग्णांवर उपाययोजना करण्यासाठी व मृत्यू टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असूनआरोग्य संस्थांमध्ये उष्माघात उपचार कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेऊन उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एम. शिंदे यांनी केले आहे.

उष्माघात होण्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत :-

उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजूरीची कामे फार वेळ करणे, कारखान्याच्या वॉयलर रुममध्ये काम करणेकाच कारखान्यातील कामे करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपडयांचा वापर करणे, अशा प्रत्यक्ष उप्ततेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबध येण्याने उष्माघात होतो.

उष्माघातामध्ये पुढील लक्षणे दिसून येतात :-

थकवा येणेताप येणेत्वचा कोरडी पडणे, भुक न लागणेचक्करयेणेनिरुत्साही होणेडोके दुखणेपोटऱ्यात वेदना येणे अथवा पेटके येणे, रक्तदाब वाढणेमानसिक बैचैन व अस्वस्थताबेशुद्धावस्था इत्यादी.

उष्माघातामध्ये अतिजोखमीचे घटक खालील प्रमाणे आहेत :-

65 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती, 1 वर्षाखालील व 1 ते 5 वयोगटातील मुले, गरोदर माता, मधुमेह व हृदयविकार तसेच अल्कोहोलीक व्यक्ती, अतिउष्ण वात्तावरणामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती. 

उष्माघात होऊ नये या करीता काय करावे 

तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी प्यावे, हलकीपातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल्सछत्री/टोपीबुट व चपलांचा वापर करावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी, उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोकेमान व चेहरा झाकण्यात यावा, शरीरातील पाण्याचे प्रमाणे कमी होत असल्यास ओआरएसघरी बनविण्यात आलेली लस्सीतोरणीलिंबूपाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा. अशक्तपणास्थूलपणाडोकेदुखीसतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसल्याची चिन्हे ओळखावित व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरे थंड ठेवण्यासाठी पडदेशटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात, पंखेओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे, कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, सुर्य प्रकाशाचा थेट सबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे, पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा, गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घ्यावी, रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरीता शेड उभारावेत, जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी.

उष्माघात होऊ नये या करीता काय करु नये

लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये. दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडदघट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी.

प्रतिबंधक उपाय-

वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत. उष्णता शोषुन घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे) वापरु नयेतसैल पांढ-या रंगांचे कपडे वापरावेत. जलसंजीवनीचा वापर करावापाणी भरपूर प्यावे. सरबत प्यावे. अधुन मधुन उन्हामध्ये काम करणे टाळावे व सावलीत विश्रांती घ्यावी. वरील लक्षणे सुरु होताच ताबडतोब उन्हात काम करणे थांबवावे व उपचार सुरु करावा. उन्हात बाहेर जाताना गॉगल्सडोक्यावर टोपीटॉवेलफेटाउपकरणेयांचा वापर करावा.

तालुकास्तरावरील व प्रा.आ.केंद्रावरील उष्माघात नियंत्रण कक्ष:

जिल्हयात एकुण 14 ग्रामीण रुग्णालये व 6 उपजिल्हा रुग्णालय व तसेच जिल्हयात एकुण 68 प्राथमिक आरोग्य केंद्र असुन एकुण 379 उपकेंद्र आहेत. ग्रामीण रुग्णालयउपजिल्हा रुग्णालय व प्रा.आ.केंद्र स्तरावर उष्माघात नियत्रंण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.

उपचार-

रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावेखोलीत पंखेकुलर ठेवावे अथवा वातानुकूलित खोलीत ठेवावे. रुग्णांच्या शरीराचे तापमानात खाली आणण्याचा दृष्टीने प्रयत्न करावेत. रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी. रुग्णांच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवाव्यात.

0000

Monday, April 29, 2024

 वृत्त क्र. 394

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई 

·  ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 29 :- राष्ट्रीय कार्यक्रम,  महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदीसह नागरीकांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

 

दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे ध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये उल्लेख नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये. 

 

प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.

00000

 वृत्त क्र. 393

पोलीस मैदानावर महाराष्ट्र दिनाचा 1 मे रोजी सकाळी शासकीय समारंभ

नांदेड दि. 29 :- महाराष्ट्र राज्याचा 65 वा स्थापना दिवस समारंभ बुधवार मे 2024 रोजी वजीराबाद पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे सकाळी वाजता राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभ होणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याहस्ते ध्वजारोहण होणार आहे. या समारंभास उपस्थित रहावेअसे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालयसंस्थाआदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 7.15 पुर्वी किंवा वाजेनंतर आयोजित करावेत. सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरू होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कृपया बँग सोबत आणू नयेअसेही आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिनानिमित्त विविध कार्यक्रमसमारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमूद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाहीयाची दक्षता संबंधितानी घ्यावीअसेही आवाहनही केले आहे.

महाराष्ट्र राज्याचा 65 वा स्थापना दिवस समारंभ मे 2024 रोजी साजरा करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे 25 एप्रिल 2024 रोजी परिपत्रक निर्गमित झाले आहे. या परिपत्रकात नमूद केल्यानुसार सर्व विभाग प्रमुखांनी कार्यक्रमाचे आयोजन करावे. तसेच ध्वजारोहण व्यवस्थीतरित्या पार पाडण्यासाठी महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला रंगीत तालीम घ्यावी. तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या जानेवारी 2024 रोजीच्या पत्रान्वये महत्वाचे दिवस साजरा करण्यासंदर्भात आदर्श आचारसंहिते बाबत दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावेअसे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविले आहे.

00000

Saturday, April 27, 2024

वृत्त क्र. 392

 

23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ;

निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये

 

·    लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये 60.94 टक्के मतदान

·   तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था ; 24 तास इन कॅमेरा निगराणी

·    मतदार, शिक्षक, कर्मचारी, प्रतिनिधींचे जिल्हाधिकाऱ्यांकडून आभार

 

नांदेड दि. 27 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी काल 26 एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर सकाळपर्यंत 16-नांदेड लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा क्षेत्रातील मतयंत्र नांदेड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात स्ट्रॉगरूममध्ये पोहचले आहेत. निवडणूक निरीक्षक, जिल्हाधिकारी, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम सिलबंद करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणूक यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समस्त मतदार, शिक्षक, कर्मचारी, प्रतिनिधींचे आभार व्यक्त केले आहेत.

 

विदर्भातील पाच व मराठवाड्यातील तीन अशा आठ ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये काल २६ एप्रिल रोजी मतदान पार पडले. नांदेडमध्ये २३ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाकडून आलेल्या आकडेवारीनुसार नांदेडमधील मतदानाची टक्केवारी 60.94 टक्के आहे. सर्वाधिक मतदान भोकर विधानसभा क्षेत्रात झाले असून सर्वात कमी मतदान मुखेड विधानसभा क्षेत्रात झाले आहे. 4 जून रोजी नांदेडच्या खासदाराची निवड होणार आहे. नांदेड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये ही मतमोजणी होणार आहे.

 

स्ट्राँग रूमला कडक सुरक्षा

शासकीय तंत्रनिकेतन मध्ये ज्या ठिकाणी मतयंत्र ठेवलेली आहेत त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. या ठिकाणी कोणालाही प्रवेश नाही. तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी कार्यरत आहे. यामध्ये बाहेरील सुरक्षा व्यवस्था, स्थानिक पोलीस बघतात. मधल्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी आहेत. तर ज्या ठिकाणी मतपेट्या सीलबंद केल्या आहेत. त्या ठिकाणी केंद्रीय राखीव दलाचे सशस्त्र जवान 24 तास कडा पहारा ठेवून आहेत. ही सुरक्षा व्यवस्था 4 जून पर्यंत राहणार आहे. 3 जूनला मतमोजणीचे मॉक ड्रील होईल.  

 

आज निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र यांच्या मुख्य उपस्थितीत स्ट्राँग रूम सील करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यासाठी शासकीय तंत्रनिकेतन परिसरात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने, सहा विधानसभाक्षेत्राचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

लोकसभा निवडणुकीतील मतदान 

काल झालेल्या मतदानानंतर मतदानाची नेमकी टक्केवारी विधानसभाक्षेत्र निहाय पुढीलप्रमाणे आहे.

 

भोकर विधानसभा क्षेत्र एकूण मतदार २ लक्ष ९४ हजार ४०९ यापैकी १ लक्ष ९२ हजार ४४६ मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष मतदार 1 लक्ष 3 हजार 812,  स्त्री मतदार 88 हजार 633 व तृतीयपंथीयांची संख्या 1 आहे. एकूण टक्केवारी ६५.३७ अशी आहे.

 

नांदेड उत्तर मध्ये एकूण मतदार ३ लक्ष ४६ हजार ८८६ यापैकी २ लक्ष ३ हजार ४२ मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष मतदार 1 लक्ष 8 हजार 591, स्त्री मतदार  94 हजार 440 व  तृतीयपंथीयांची  संख्या 11 आहे. एकूण टक्केवारी ५८.५३ अशी आहे.

 

नांदेड दक्षिण मध्ये एकूण मतदार ३ लक्ष ८ हजार ७९० यापैकी १ लक्ष ८६ हजार १५७ मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष मतदार 1 लक्ष 357, स्त्री मतदार 85 हजार 799 व  तृतीयपंथीयांची  संख्या 1 आहे. एकूण टक्केवारी ६०.२९अशी आहे.

 

नायगाव मध्ये एकूण मतदार ३ लक्ष १ हजार २९९ यापैकी १ लक्ष ९६ हजार ८१८ मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष मतदार 1 लक्ष 5 हजार 725 स्त्री मतदार 91 हजार 91 व तृतीयपंथीची संख्या 2 आहे. एकूण टक्केवारी ६५.३२ अशी आहे.

 

देगलूर मध्ये एकूण मतदार ३ लक्ष ३ हजार ९४३ यापैकी १ लक्ष ८१ हजार ८०६ मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष मतदार 97 हजार 403, स्त्री मतदार 84 हजार 398 व  तृतीयपंथीयांची संख्या 5 आहे. एकूण टक्केवारी ५९.८२अशी आहे.

 

मुखेड मध्ये एकूण मतदार २ लक्ष ९६ हजार ५१६ यापैकी १ लक्ष ६८ हजार ३०१ मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष मतदार 90 हजार 600, स्त्री मतदार 77 हजार 701 व  तृतीयपंथीयांची संख्या शून्य. एकूण टक्केवारी ५६.७६ अशी आहे.

 

16-नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदार १८ लक्ष ५१ हजार ८४३ यापैकी ११ लक्ष २८ हजार ५७० मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष मतदार 6 लक्ष 6 हजार 488, स्त्री मतदार 5 लक्ष 22 हजार 62 व  तृतीयपंथीयांची  संख्या 20 आहे. एकूण टक्केवारी 60.94 अशी आहे.

 

30 व्हीव्हीपॅट बदलले

लोकसभेच्या मतदान प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाचे असणारे मतयंत्र अर्थात व्हीव्हीपॅट, बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट. जिल्ह्यामध्ये मतदान प्रक्रिया दरम्यान 4 हजार 136 बॅलेट युनिट वापरल्या गेले. त्यापैकी प्रक्रियेदरम्यान 20 बॅलेट युनिट बदलले गेले. 2 हजार 68 कंट्रोल युनिट वापरले गेले. त्यापैकी दहा कंट्रोल युनिट बदलले गेले. तर 2 हजार 68 व्हीव्हीपॅट पैकी 30 व्हीव्हीपॅट प्रक्रिया दरम्यान बदलले गेले. निवडणूक आयोगाने भेल कंपनीच्या 12 अभियंत्यांची जिल्ह्यात नियुक्ती केली होती. ज्या ठिकाणी प्रक्रिया दरम्यान यंत्र बिघडले त्या ठिकाणी ते बदलण्यात आले. मात्र यामुळे मतदान प्रक्रियेवर कोणताही बदल झाल्याची घटना नाही.

 

दोन गुन्ह्यांची नोंद

जिल्ह्यामध्ये देगलूर विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये एक गुन्हा रामतीर्थ पोलीस स्टेशन अंतर्गत नोंदविण्यात आला आहे. व्हीव्हीपॅट व बॅलेट युनिटची तोडफोड करणाऱ्या या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंट्रोल युनिटला काही डॅमेज झाले नाही. त्यामुळे मतदान प्रक्रियेवर कोणताही फरक पडला नाही. पोलिसांनी गुन्हेगाराला ताब्यात घेतले आहे. दुसरा गुन्हा देखील याच विधानसभा क्षेत्रात झाला आहे. देगलूर येथे विनापरवाना मोबाईलने शूटिंग करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केलेला आहे.

 

जिल्हाधिकाऱ्यांनी मानले आभार

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. ज्यांना या निवडणुकीत काही कारणास्तव मतदान करता आले नाही त्यांनी तातडीने आपल्या नावाची नोंद करावी. नोंदीची खातरजमा करावी, असे आवाहन केले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत सर्वांना सुलभपणे मतदान करता येईल यासाठी नोंदणी प्रक्रियेत लक्षपूर्वक सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय गेल्या 75 दिवसांपासून अखंडपणे काम करणाऱ्या आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. निवडणूक यंत्रणेत काम करणाऱ्या विशेषत: शिक्षकांचे त्यांनी विशेष आभार मानले असून प्रशिक्षणापासून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सक्रियेतेने सहभागी झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. विविध संघटना, संस्था, विद्यार्थी, मान्यवरांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नासाठी विशेष ऋणनिर्देश केले आहे. याशिवाय सर्व बिएलओ, क्षेत्रिय अधिकारी, पोलीस व अन्य सुरक्षा दलाचे अधिकारी-कर्मचारी, वीज मंडळाचे कर्मचारी, प्रसार माध्यमातील सर्व सहकारी तसेच ग्रामपातळीवर काम करणारे ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यासह सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांचेही आभार व्यक्त केले आहे.

0000







 

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...