Tuesday, July 5, 2022

 अपघातात मदतीसाठी पुढे सरसावणाऱ्या

व्यक्तींचा होणार सन्मान

 

·   माहिती सादर करण्याचे नागरिकांना आवाहन  

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने रस्त्यावर वाहन चालवितांना अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना दवाखाण्यात नेणे व त्यांना मदत करणाऱ्या नागरिकांना सन्मानित करण्यात येणार आहे. वाहन अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना आपण मदत केली असल्यास त्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक किंवा पोलीस विभागाकडून निर्गमीत करण्यात आलेले प्रमाणपत्र किंवा वर्तमानपत्रात आलेल्या बातमीसह आपली माहिती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयास शनिवार 9 जुलै 2022 पर्यंत सादर करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केली आहे.

00000

 आषाढी एकादशी व बकरी ईद परस्पर स्नेहाने जपत साजरी करू

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

▪️शांतता समितीच्या बैठकीत सर्व धर्मीयांचा निर्धार

नांदेड (जिमाका) दि. 5 :- येत्या 10 जुलै रोजी घराघरात श्रद्धेने जपली जाणारी आषाढी एकादशी व मुस्लीम धर्मात कर्तव्य म्हणून साजरी होणारी बकरी ईद लक्षात घेता एकमेकांच्या श्रद्धेचा आदर बाळगून नांदेड जिल्ह्यात दोन्ही सण शांततेत साजरा करण्याचा निर्धार आज सर्व धर्माच्या प्रमुखांकडून घेण्यात आला. नांदेड जिल्ह्यात परस्पर स्नेह व शांतता याला नांदेड जिल्हावासियांनी आजवर प्राधान्य दिले आहे. एखादा अनुचित प्रकार गैरसमजातून झाल्याचे तर काही ठराविक एक, दोघांकडून झालेल्या चुकीमुळे आढळून आले. हा जिल्हा शांतताप्रिय असून याला कोणत्याही परिस्थितीत गालबोट न लागू देता सामाजिक शांततेवर अधिक भर देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अतुल कानडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकर, शांतता समितीचे सन्माननिय सदस्य, हॅपी क्लबचे पदाधिकारी, धर्मगुरू आदी उपस्थित होते. 

विविध धार्मिक सण, उत्सव साजरे करतांना कायद्याने आखून दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे. उत्साहाच्या भरात कायद्याचे कोणाकडून उल्लंघन होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. जिथे कुठे कोणी कायद्याचे पालन करणार नसेल तर तात्काळ संबंधिता विरुद्ध पोलीस विभागातर्फे कारवाई केली जाईल. सण, उत्सव हे आनंदासाठी असतात. आपण सर्वधर्मीय एकमेंकांच्या आनंदासाठी कटिबद्ध होऊन कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी केले. यावेळी श्रीमती साखरकर, मौलाना अय्युब कासमी, भदन्त पय्या बोधी व इतर मान्यवर उपस्थित होते.
00000





 नांदेड जिल्ह्यात 7 व्यक्ती कोरोना बाधित 

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  170 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणी द्वारे 6 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल कोरोना बाधित आला आहे. यात आरटीपीसीआर तपासणीत नांदेड मनपा 4, कंधार तालुक्याअंतर्गत 1, परभणी 1 तर अँटिजेन तपासणीत अर्धापूर तालुक्याअंतर्गत 1 बाधित आढळला आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील 7, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरणातील 2 बाधितांना उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 927 एवढी झाली असून यातील 1 लाख 201 बाधितांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.   

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 2नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील 23, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरणात 9 असे एकुण 34 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती. 

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 8 हजार 864

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 88 हजार 602

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 927

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 201

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.35 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-34

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.

 0000

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 16.40 मि.मी. पाऊस 


नांदेड (जिमाका) दि. :- जिल्ह्यात मंगळवार 5 जुलै  रोजी सकाळी  10 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 16.40  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 216.20 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यात मंगळवार 5 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 35.50 (215.40), बिलोली- 4.80 (160.60), मुखेड- 14.80 (265.40), कंधार-12.70 (299.40), लोहा-14.10 (220.30), हदगाव-12.20 (173.30), भोकर- 22 (156.10), देगलूर-6.50 (261), किनवट- 19.60 (240.50), मुदखेड- 33.30 (265.70), हिमायतनगर-15.60 (298), माहूर- 21.60 (166.40), धर्माबाद- 7.80 (164.60), उमरी- 14.50 (201.40), अर्धापूर- 23.40 (163.30), नायगाव- 7.20 (138.60) मिलीमीटर आहे.

0000

अवयवदान चळवळीत महाराष्ट्राचा पुढाकार... अवयवदान पंधरवडा : दि. ३ ते १५ ऑगस्ट २०२५ मरणोत्तर सेवा ही जीवनोत्तर प्रतिष्ठा आहे! https://notto.abd...