किसान क्रेडीट कार्डचा लाभ
मत्स्यकास्तकार, मच्छिमारांनी घ्यावा
सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांचे आवाहन
नांदेड,
दि. 26 :- मच्छिमार, मत्स्यव्यवसायीक,
मत्स्यकास्तकार आणि मत्स्यव्यवसायाशी निगडीत
व्यक्तिंनी आणि मत्स्यव्यवसाय
सहकारी संस्थांनी किसान
क्रेडीट कार्ड योजनेचा लाभ
घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त
मत्स्यव्यवसाय नांदेड यांनी
केले आहे.
बॅंकेशी
संपर्क साधुन किसान क्रेडीट
कार्डसाठी अर्ज करावा. बॅंक खात्याच्या त्याचप्रमाणे आधारकार्डच्या
तपशिलासह किसान क्रेडीट कार्ड
योजनेच्या अर्जाची एक प्रत
आणि मच्छिमार सहकारी संस्थेमार्फत
विहीत नमुन्यातील विवरणपत्रात सभासदांची
तपशिलवार माहिती सहाय्यक आयुक्त
मत्स्यव्यवसाय, देवाशीष कॉम्प्लेक्स, डॉक्टर लेन, स्टेट
बॅक ऑफ इडिया समोर, घामोडीया
फॅक्टरी कंपाउड, नांदेड येथे
सादर करावा. जेणेकरुन
मत्स्यव्यवसाय विभागामार्फत ही संबंधित
बॅकेला आपणास किसान क्रेडीट
कार्ड योजनेचा लाभ देण्याविषयी
शिफारस करता येईल.
किसान क्रेडीट
कार्ड ही योजना
राष्ट्रीय कृषी व ग्रामिण
विकास बॅक (नाबार्ड) यांच्यामार्फत
कार्यान्वीत झाली
आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी मुदतीची
कर्ज सुविधा उपलब्ध करुन
देण्यात येते. जेणेकरुन शेतकऱ्यांना वेळेत सहज
व सोप्या पध्दतीने अर्थसहाय्य कर्जस्वरुपात
प्राप्त होईल त्यांना त्यांच्या
सवडी व निवडीप्रमाणे शेती
विषयक कामे पुर्ण करता
येतील.
पीक काढणी पश्चात
विपणन व्यवस्था करण्यासाठी किसान
क्रेडीट कार्ड (KCC) योजनेअंतर्गत लाभ
मिळु शकतो. या सर्व
बाबींचा विचार करुन तसेच
किसान क्रेडीट कार्ड योजनेची
सकारात्मक व उत्साहवर्धक फलनिष्पत्ती
पाहुन सन 2018-19 च्या
अर्थसंकल्पामध्ये किसान क्रेडीट कार्डचा
लाभ शेतकऱ्यांव्यतिरिक्त
मच्छिमार, मत्स्यकास्तकार, पशुसंवर्धक इत्यादींनाही मिळणार असल्याची घोषणा
केंद्र सरकार मार्फत करण्यात
आली आहे. केंद्र सरकारच्या
घोषणेच्या अनुषंगाने भारतीय रिझर्व
बॅकेने 4 फेब्रुवारी 2019 रोजीच्या पत्रान्वये
किसान क्रेडीट कार्डची व्याप्ती
वाढवुन मत्स्यकास्तकार, मच्छिमार, मत्स्यव्यवसायीक,
पशुसंवर्धक, दुग्धव्यवसायीक, कुकुटपालक इत्यादींनाही
सामावुन घेऊन लाभ देण्याविषयी
मार्गदर्शन सुचना निगर्मित केलेल्या
आहेत.
राज्यातील मत्स्यकास्तकार,
मत्स्यव्यावसायीक, मत्स्यसंवर्धक व मच्छिमारांना
मत्स्यव्यवसाय संबंधित दैनंदिन कामे
करण्यासाठी आर्थीक मदतीची गरज
असते. सागरी भागात नौका
मासेमारीसाठी समुद्रात जाण्याआधी त्याकरीता
लागणारे डिझेल, किराणा, बर्फ यासाठी
मच्छिमारांस किमान एक ते दोन
लाख इतक्या रक्कमेची आवश्यकता
असते. त्याकरीता मच्छिमारास सावकार
अथवा खाजगी आर्थिक सहाय्य
करणा-या संस्था यांचेकडुन कर्जरुपाने
मदत घ्यावी लागते. मच्छिमारांस
यापोटी मोठया प्रमाणात व्याज
भरणा करावे लागते. त्याचप्रमाणे
मत्स्यव्यवसायाशी निगडीत इतर कामे
पुर्ण करण्यासाठी जसे कोळंबी, मत्स्यबीज, खाद्य, औषधे, खते, तलावांचे नुतनीकरण, मत्स्यबीज / कोळंबी बीज
उत्पादन केंद्रासाठी आवर्ती
खर्च मासळी विक्रीसाठी खेळते
भांडवल, मच्छिमार नौकेवरील साहित्य, जाळेखरेदी, तलाव ठेक्याने
घेताना भाडेपटटीच्या पुर्ततेसाठी,
शितपेटी खरेदी, इत्यादी करीता
प्राथमिक भांडवलाची गरज भागविण्यासाठी
मच्छिमारांस अर्थसहाय्याची आवश्यकता
असते. जर मच्छिमारांस वरील
भांडवल उभे करण्यासाठी सहज, सोपे
व लवचिकतेप्रमाणे अर्थसहाय्य उपलब्ध झाल्यास
त्यास खुप मदत होऊ
शकते.
यासर्व बाबींचा
सकारात्मक विचार करुन शासनाने
मच्छिमारांची प्राथमिक भांडवलाची गरज
भागविण्यासाठी किसान क्रेडीट कार्ड
योजनेत मच्छिमारांचाही समावेश
केला आहे. किसान क्रेडीट
कार्ड मुळे मच्छिमारांस पुढीलप्रमाणे लाभ मिळु शकतो. सहज, सोप्या व लवचिक
पध्दतीने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. प्रत्येक कामाच्या कर्जाकरीता
स्वतंत्र अर्ज, प्रस्ताव सादर
करण्याची गरज पडणार नाही. मच्छिमारांना खाजगी सावकार/खाजगी
पत पुरवठा संस्थेच्या तुलनेत
व्याजाचा भार कमी होईल. कोणत्याही वेळी खात्रीलायक
कर्ज मिळण्याची हमी. मच्छिमारांच्या सवडी आणि निवडीप्रमाणे
मत्स्यबीज, मत्स्यखादय, इतर साहित्य खरेदी
करण्यास मदत होईल.कर्ज सुविधेसाठी
हंगामी मुल्यांकनाची गरज
नाही. जास्तीत जास्त
कर्जाची मर्यादा (सिमा) मत्स्योत्पादनावर आधारीत. कितीही वेळा
बॅक रक्कम काढु शकता. परतफेड बॅकेच्या विहीत
नियमावली नुसार मत्स्यव्यवसायासाठी घेतलेल्या आगावु रकमेवरच व्याज
आकारणी. किसान क्रेडीट
कार्डची वैधता पाच वर्षाची
राहील.
किसान क्रेडीट कार्ड योजनेसाठी पात्रतेचे निकष
पुढील प्रमाणे आहेत. लाभार्थी
हा मत्स्यव्यवसायाशी निगडीत
क्षेत्रातील असावा उदा.मच्छिमार, मत्स्यविक्रेता, मत्स्यसंवर्धक इत्यादी.
मच्छिमार/ मच्छिमार संस्थेकडे तलाव
ठेक्याने घेतलेला असावा. मच्छिमारांची
संस्था, मच्छिमारांचे स्वयं सहाय्यता गट, अथवा
महिला मच्छिमार/मत्स्यविक्रेते यांचे
स्वयं सहाय्यता गट.
किसान क्रेडीट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे - विहीत नमुन्यातील
अर्ज. छायाचित्र असलेले
ओळखपत्र जसे आधार कार्ड, पॅनकार्ड, निवडणुक
आयोगाने दिलेले मतदान ओळखपत्र, वाहन
परवाना इत्यादी पैकी एकाची
स्वसाक्षांकित छायाप्रत. रहिवासी
पुरावा आधारकार्ड, निवडणुक आयोगाने
दिलेले मतदान ओळखपत्र, वाहन परवाना
इत्यादी पैकी एकाची छायाप्रत. मत्स्यव्यवसायाशी निगडीत
क्षेत्रात असल्याचा पुरावा उदा.
मत्स्यविक्रेत्यासाठी शॉप ॲक्ट परवाना, तलाव ठेका
आदेश, खाजगी मत्स्यसंवर्धकासाठी तलाव
खोदकाम केलेल्या जमीनीचा मालकी, भाडे करार पुरावा, क्रियाशील
मच्छिमारांसाठी संस्थेचे ओळखपत्र व शिफारसपत्र. पासपोर्ट साईज छायाचित्र, पुर्व दिनांकित धनादेश आवश्यक आहे, असेही आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय नांदेड यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment