Wednesday, July 31, 2019


भारतीय डाक विभागाकडून

 राष्ट्रीय स्तरावर पत्र लेखन स्पर्धा

नांदेड, दि. 31 :- भारतीय डाक विभागाकडून राष्ट्रीय स्तरावर पत्र लेखन स्पर्धा  ढाई आखर या शीर्षकाखाली आयोजित केली आहे. पत्राचा विषय Dear Bapu ,You are Immortal/ प्रिय बापू आप अमर है या विषयावर लिहावयाचे असून पत्र कोणत्याही भाषेमधून लिहिता येते.

ही पत्र लेखन स्पर्धा वय वर्षे 18 पर्यंत एक गट व वय वर्षें 18 च्या वर दुसरा गट अशा दोन गटात विभागलेली आहे. स्पर्धकानी स्वत:चे वय दिनांक 1 जानेवारी 2019 रोजी 18 पेक्षा कमी किंवा जास्त आहे असा स्पष्ट उल्लेख करुन स्वत:चे नाव पत्ता व वयाचा उल्लेख असावा.

हे पत्र मुख्य पोस्टमास्तर जनरल मुंबई यांच्या नावाने लिहून डाकघरामार्फत लावलेल्या विशेष टपाल पेटीत टाकावयाचे आहे. पाकिटातून पत्र पाठवण्याची शब्द मर्यादा 1 हजार व अंतर्देशीय पत्रासाठी 500 शब्दाची आहे. पत्र पाठविण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2019 ही आहे. मुदती नंतर पाठवलेल्या पत्राचा पत्र लेखन स्पर्धेत समावेश करण्यात येणार नाही.

राज्य स्तरावर  उत्कृष्ट पत्रासाठी अनुक्रमे रुपये 25 हजार, 10 हजार व 5 हजार रुपये पारितोषक दिले जाईल. राज्य स्तरावर  निवडलेल्या प्रत्येक गटातून निवडलेल्या तीन उत्कृष्ट पत्राला राष्ट्रीय स्तरावर पाठवण्यात येईल. राष्ट्रीय स्तरावर निवडलेल्या उत्कृष्ट पत्रासाठी अनुक्रमे 50 हजार, 25 हजार व 10 हजार रुपये पारितोषक देण्यात येईल. जास्तीतजास्त संख्येने नागरिकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन नांदेड डाक अधिक्षक एस बी लिंगायत यांनी केले आहे.

00000



मंडल / पेडॉल तपासणी
सनियंत्रण समितीची पूर्नरचना
नांदेड, दि. 31 :- महानगरपालिका क्षेत्रासाठी मंडल / पेडॉल तपासणी सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली होती. जिल्हाधिकारी नांदेड यांनी या समितीची पूर्नरचना केली आहे. या समितीत नांदेड उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण हे अध्यक्ष असून नांदेड मनपाचे प्रभारी उपआयुक्त अजितपालसिंघ संधू व नांदेडचे प्रभारी पोलीस उपअधिक्षक (गृह) विजय जोंधळे यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले.
मंडल / पेडॉल तपासणी सनियंत्रण या समितीकडे सोपविण्यात आलेली कार्यवाही करताना मा. उच्च न्यायालयांचे निर्देशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी व न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांनी काढले आहेत.
00000


दारु दुकाने बंद
नांदेड, दि. 31 :- जिल्ह्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 99 वी जयंती गुरुवार 1 ऑगस्ट 2019 रोजी साजरी करण्यात येणार आहे. या कालावधीत शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व दारु विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांनी निर्गमीत केले आहेत.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्धभवून अनुचित प्रकार घडणार नाही. त्यासाठी जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टिने मुंबई दारुबंदी कायदा 149 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी 1 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त नांदेड वाघाळा महानगरपालिका हद्दीतील सर्व सीएल-3, एफएल-4, एफएल-3, एफएल-2, एफएल / बीआर-2, ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.
या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, यांची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.
00000


सैनिकी मुलांचे वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु
नांदेड दि. 31 :- विष्णूपुरी येथील सैनिकी मुलांचे वसतीगृह जिल्हा सैनिक कार्यालयांतर्गत चालविण्यात येते.  दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्ष 2019-20 करिता माजी सैनिक, विधवा व इतर नागरिकांच्या पाल्यांसाठी अत्यल्प दरात सर्व सोयीयुक्त सैनिकी मुलांच्या वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.
जिल्हयातील सर्व माजी सैनिक/विधवांनी याचा लाभ घ्यावा. प्रवेश फक्त सैनिक/ माजी सैनिकांच्या पाल्यांना उपलब्ध आहे.  प्रवेशासाठी प्रवेश अर्ज सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णुपुरी येथे विक्रीस उपलब्ध आहेत. वसतीगृह अधिक्षक मो. 8855022908 असून अधिक माहितीसाठी नांदेड जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड यांनी केले आहे.
00000




जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 27.30 मि.मी. पाऊस
नांदेड, दि. 31 :- जिल्ह्यात बुधवार 31 जुलै 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 27.30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 436.74 पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 296.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 30.90 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 31 जुलै 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 18.13 (254.04), मुदखेड- 18.67 (336.01), अर्धापूर- 41.67 (271.98), भोकर- 28.75 (309.20), उमरी-14.00 (298.44), कंधार- 32.50 (268.83), लोहा- 16.03 (225.73), किनवट- 42.86 (408.39), माहूर- 68.00 (427.34), हदगाव- 36.43 (283.43), हिमायतनगर- 42.00 (322.02), देगलूर- 6.33 (180.65), बिलोली- 15.40 (342.40), धर्माबाद- 19.00 (266.99), नायगाव- 21.40 (305.40), मुखेड- 15.57 (241.55). आज अखेर पावसाची सरासरी 296.40 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 4742.40) मिलीमीटर आहे.
00000


जिल्ह्यातील आर्थिक गणना होणार पेपरलेस
माहिती अचूक होण्यासाठी
नागरिकांनी सहकार्य करावे
-         जिल्हाधिकारी अरुण डोंगरे 
नांदेड दि. 31 :- केंद्र शासनाकडून राष्ट्रव्यापी सातवी आर्थिक गणना जिल्ह्यात येत्या ऑगस्ट पासून घेण्यात येणार असून या गणनेच्या माध्यमातून संकलत होणारी माहिती अचूक होण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी प्रगणकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
या गणनेच्या माध्यमातून संकलत होणारी माहिती अचूक होण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात आज घेण्यात आली. 
या बैठकीस जिल्हयातील प्रमुख अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, उपायुक्त (प्रशासन) महानगरपालिका, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, राष्ट्रीय नमुना पाहणी कार्यालयाचे वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी तसेच जिल्हातील सर्व नगरपालिका / नगरपंचायतचे मुख्याधिकारी कॉमन सर्विस सेंटरचे (CSC) अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, आर्थिक गणनेच्या माहितीचा केंद्र राज्य शासनास नियोजन तसेच धोरण आखण्यासाठी उपयोग होतो. जिल्ह्यातील सर्व शहर गावात गणनेचे काम प्रभावीपणे होण्यासाठी संबंधीत अधिकाऱ्यांनी गणना कामी नेमणूक केलेल्या प्रगणक पर्यवेक्षकांना सर्वोतोपरी सहकार्य करावे. या गणनेविषयी जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करुन याकामी येणाऱ्या अडचणी सोडवण्याचे निर्देश यावेळी दिले.
प्रास्ताविकात आर्थिक गणनेबाबत माहिती देताना जिल्हा सांख्यिकी अधिकारी निखिल बासटवार म्हणाले, ही गणना प्रथमच मोबाईल पव्दारे होणार असून गणना पेपरलेस होणार आहे. यामध्ये व्यवसाय, द्यो, वस्तु सेवा वितरणामध्ये सहभागी आस्थापना, रोजगार, कामगारांची संख्या, स्वयंरोजगार, कामगार पणन संस्था इ. घटकांची गणना केली जाणार आहे.
आर्थिक गणनेचे क्षेत्रकाम कॉमन सर्विस सेंटरचे (CSC) ई-गव्हर्नन्स यांचेकडून नेमण्यात आलेल्या 1 हजार 180 प्रगणक 897 पर्यवेक्षककडून केले जाणार आहे. नियुक्त प्रगणक प्रत्यक्ष घरोघरी भेट देवून कुंटुंबाची माहिती संकलित करणार आहेत. तसेच प्रगणकांनी केलेल्या कामाचे तपासणी पर्यवेक्षक करतील. हे काम ऑगस्ट 2019 मध्ये सुरू होणार आहे, अशी माहिती यावेळी जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री. बासटवार यांनी दिली.   
00000


अन्न व नागरी पुरवठा मंत्री
संभाजी पाटील निलंगेकर यांचा दौरा
नांदेड दि. 31 :- राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
गुरुवार 1 ऑगस्ट 2019 रोजी सोईनुसार अमरावती येथून कारंजा-वाशिम-हिंगोली-नांदेड-अहमदपूर-चाकूर-निळेगाव-निटून मार्गे निलंगा निवासस्थानकडे प्रयाण करतील.
00000

Tuesday, July 30, 2019


प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी
होण्यासाठी आज 31 जुलैची मुदतवाढ
लातूर, दि. 30 :- शासनाने खरीप हंगाम 2019 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्हयांत राबविण्याचा निर्णय घेतलेला असून या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत दिनांक 29 जुलै, 2019 अशी होती. तथापि, दिनांक  29 जुलै, 2019 चे शासन निर्णयानुसार खरीप हंगाम 2019 करिता योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची मुदत वाढवून ती दिनांक 29 जुलै, 2019 अशी करण्यात आली होती.
तथापि, शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेता त्यांना पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019 मध्ये शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी 29 जुलै, 2019 पासून दिनांक 31 जुलै, 2019 पर्यंत मुदतवाढ   देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.  
         योजनेत सहभागी होण्यासाठी  बँक व `आपले सरकार सेवा केंद्र` (डिजीटल सेवा केंद्र) यांचे मार्फत बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा अर्ज स्विकारण्यात येत आहेत. तरी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळणेस्तव विहित मुदतीपुर्वी नजिकचे बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर पीक विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा.
अधिक माहितीसाठी तात्काळ नजीकच्या विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजीकच्या बँक, आपले सरकार सेवा केंद्र (डिजीटल सेवा केंद्र) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सह संचालक लातूर विभाग लातूर यांनी  केले आहे.
                                                ****


लेंडी प्रकल्पाचे कामे जुन 2021 पर्यंत
पुर्ण करण्याचे नियोजन - जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 30 :- लेंडी प्रकल्पांतर्गत पुनर्वसन करावयाच्या 12 गावठाणाबाबत गावठाणनिहाय चर्चा करुन जुन 2021 पर्यंत प्रकल्पाचे काम पुर्ण करण्याचे नियोजन असून प्रकल्पाचे काम लवकरच सुरु करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.  
येथील जिल्हाधिकारी यांचे निजी कक्षात तेलंगणा राज्याचे सल्लागार अशोक टंकसाला व जिल्हाधिकारी डोंगरे यांच्या समवेत लेंडी प्रकल्प सुरु करण्याबाबत आज बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.  
तेलंगाणा राज्याचे सल्लागार अशोक टंकसाला यांनी प्रकल्पाचे काम सुरु झाल्यानंतर दोन महिन्यांनी पुनश्च आढावा बैठक आयोजित करावी सांगितले. बैठकीस उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता स.को.सब्बीनवार, देगलूर लेंडी प्रकल्प विभाग कार्यकारी अभियंता रा.मा.देशमुख, उपकार्यकारी अभियंता शे.मा.पाटील,उपविभागीय अभियंता सु.अ. क्षीरसागर, तेलंगणाचे कार्यकारी अभियंता ई. आत्माराम, उपविभागीय अभियंता श्री. बलराम व श्री. भुजेंदर आदि संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
00000


नांदेड जिल्ह्यात 269 मि.मी. पाऊस
मराठवाड्यात मोठ्या पावसाची प्रतिक्षा
औरंगाबाद,दि. 30 (विमाका) :- मराठवाडा विभागात आजपर्यंत 201.21 मि.मी. पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीनुसार 25.8 टक्के पाऊस झाला आहे. विभागात सर्वाधिक पाऊस नांदेड जिल्ह्यात झाला आहे. आजपर्यंत या जिल्ह्यात 269.12 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. विभागात सर्वत्र ढगाळ वातावरण असले तरी पाऊस अत्यल्प प्रमाणात पडत आहे.
जिल्हानिहाय  आजपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. नांदेड 269.12 मि.मी, औरंगाबाद- 235.74 मि.मी, हिंगोली -235.25 मि.मी, जालना - 212.95 मि.मी, परभणी -181.87 मि.मी, लातूर 177.69 मि.मी, उस्मानाबाद 165.99 मि.मी. आणि बीड 131.11 मि.मी.
तालुकानिहाय आज सकाळपर्यंत मागील चोवीस तासात पडलेला पाऊस आणि कंसात आजपर्यंत एकुण नोंदल्या गेलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.
औरंगाबाद जिल्हा- औरंगाबाद 1.60 (201.60), फुलंब्री 1.00 (277.75), पैठण 0.80 (154.94), सिल्लोड 4.88 (320.81), सोयगाव 5.67 (334.00), वैजापूर 2.10 (206.00), गंगापूर 2.11 (188.00), कन्नड 3.88 (246.88), खुलताबाद 3.67 (191.67). जिल्ह्यात एकूण 235.74 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जालना जिल्हा- जालना 0.88 (175.44), बदनापूर 1.40 (214.80), भोकरदन 4.25 (310.13), जाफ्राबाद 3.60 (242.00), परतूर 2.40 (192.68), मंठा 2.75 (202.25), अंबड 0.00 (189.14), घनसावंगी 4.71 (177.14), जिल्ह्यात एकूण 212.95 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
परभणी जिल्हा- परभणी 2.51 (159.92), पालम 4.67 (148.17), पूर्णा 3.20 (205.60), गंगाखेड 5.75 (171.50), सोनपेठ 4.00 (189.00), सेलू 2.00 (158.80), पाथरी 2.33 (176.67), जिंतूर 1.17 (193.50), मानवत 3.67 (233.67), जिल्ह्यात एकूण पावसाची नोंद 181.87 मि.मी. झाली आहे.
हिंगोली जिल्हा- हिंगोली 14.71 (228.29), कळमनुरी 22.50 (281.25), सेनगाव 6.00 (224.50), वसमत 6.43 (142.71), औंढा नागनाथ 7.25 (299.50). जिल्ह्यात एकूण 235.25 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
नांदेड जिल्हा- नांदेड 9.13 (235.88), मुदखेड 22.33 (317.33), अर्धापूर 9.00 (230.32), भोकर 29.00 (280.75), उमरी 23.67 (284.46), कंधार 12.50 (232.83), लोहा 10.50 (207.53), किनवट 79.00 (357.19), माहूर 60.50 (368.94), हदगाव 21.86 (244.42), हिमायत नगर 34.33 (286.99), देगलूर 21.17 (174.33), बिलोली 25.00 (327.00), धर्माबाद 29.33 (248.00), नायगाव 22.40 (284.00), मुखेड 19.71 (226.00), जिल्ह्यात एकूण 269.12 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
बीड जिल्हा- बीड 2.91 (120.55), पाटोदा 6.25 (153.25), आष्टी 7.29 (139.43), गेवराई 1.90 (104.90), शिरुर कासार 0.00 (94.33), वडवणी 2.50 (113.00), अंबाजोगाई 10.20 (125.20), माजलगाव 2.33 (183.07), केज 7.14 (134.71), धारुर 2.67 (116.00), परळी 5.80 (157.82), जिल्ह्यात एकूण 131.11 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
लातूर जिल्हा- लातूर 11.25 (127.13), औसा 15.00 (105.57), रेणापूर 11.00 (157.25), उदगीर 15.43 (195.71), अहमदपूर 9.17 (237.33), चाकुर 17.80 (155.40), जळकोट 16.00 (239.50), निलंगा 12.88 (170.13), देवणी 15.67 (202.17), शिरुर अनंतपाळ 16.33 (186.67), जिल्ह्यात एकूण 177.69 मि.मी. पाऊस झाला आहे.
उस्मानाबाद जिल्हा- उस्मानाबाद 11.75 (156.25), तुळजापूर 8.71 (199.29), उमरगा 10.80 (197.20), लोहारा 11.00 (201.00), कळंब 6.33 (139.00), भूम 8.40 (178.50), वाशी 8.33 (156.67), परंडा 9.20 (100.00), जिल्ह्यात एकूण 165.99 मि.मी. पाऊस झाला आहे.
******

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...