महाराष्ट्र स्पर्धाक्षम
कृषि विकास प्रकल्पांतर्गत
राज्याबाहेर गुजरात येथे शेतकरी अभ्यास दौरा
संपन्न ;
जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यावसाय सुरु करण्यास वाव
Add caption |
नांदेड, दि. 12 :- जागतिक बँक अर्थसहाय्यीत
महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प (MACP) अंतर्गत स्थापित शेतकरी उत्पादक
कंपनी यांचा राज्याबाहेरील शेतकरी अभ्यास दौरा गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क
मार्केटिंग फेडरेशन,
(अमूल) आनंद, गुजरात येथे 6 ते 10 सप्टेंबर 2018 रोजी
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प
संचालक आर. बी. चलवदे व कृषि उपसंचालक श्रीमती एम. आर.
सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न
झाला.
आनंद हे
गाव अहमदाबाद पासुन 100
कि.मी. दुर असलेले एक छोटेसे शहर आहे. आनंद हे दुधाची राजधानी म्हणुन देशभरात प्रसिद्ध आहे. अमुल हे
देशातील सर्वात मोठी डेअरी असुन त्याची स्थापना 1946 साली झालेली आहे.
सन 1930 साली
पोलसन डेअरी द्वारे येथील शेतकऱ्यांचे दुध खरेदी करत होते. या डेअरीद्वारे देशातील
शेतकऱ्यांचे शोषन केले जायचे त्यामुळे राष्ट्रीय नेते सरदार
पटेल व काही प्रगतशिल शेतकऱ्यांनी मिळुन पोलसन डेअरी विरुद्ध असहकार अंदोलन सुरु केले. त्याची
फलनिशपत्ती म्हणुन 14
डिसेंबर, 1946 मध्ये अमूल इंडिया (आनंद
सहकारी दुग्ध उत्पादक संघ) ची स्थापना झाली. अमूलचे संस्थापक व्हर्गीज कुरियन
आहेत.
यामध्ये
750 कर्मचारी असुन 3.6
दशलक्ष दुग्ध उत्पादक शेतकरी सदस्य, 33 जिल्हे, 18 सदस्य
संघटना व 18 हजार 554 गावांची संख्या आहे. सरासरी प्रति दिवस 18 दशलक्ष लिटर दुध संकलन केले
जाते. एकुण दुध हाताळनी क्षमता प्रतिदिवस 32 दशलक्ष लिटर केले जाते.
त्यापासुन दुध, दही, पनिर, तुप, ताक आदी 350 दुग्धजन्य पदार्थाची
निर्मीती होते. विक्री व्यवस्थापनाकरीता देशभरामध्ये 56 कार्यालय
असुन यामध्ये 10 हजार
वितरक व 10 लाख किरकोळ विक्रेत्यामार्फत विक्री केली
जाते. या दौऱ्याचे महत्व पाहता नांदेड जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यावसाय सुरु करण्यास
खुप वाव आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक आत्मा नांदेड यांनी दिली आहे.
00000
No comments:
Post a Comment