Wednesday, September 6, 2017

गट शेतीस चालना देणे योजनेसाठी प्रकल्प
अहवाल सादर करण्यास 20 सप्टेंबरची मुदत    
नांदेड, दि. 6 :- गट शेतीस प्रोत्साहन सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे ही  योजना सन 2017-18 सन 2018-19 या दोन वर्षाच्या कालावधीत पथदर्शी प्रकल्प म्हणु राबविण्यास मान्यता दिली आहे. शेतकरी गटांनी शेतीचे प्रकल्प अहवाल बुधवार 20 सप्टेबर 2017 पर्यंत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, प्रकल्प संचालक, आत्मा, यांच्याकडे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
या योजनेसाठी अटी शर्ती पुढील प्रमाणे राहतील. या योजनेंतर्गत किमान 20 शेतकरी समुहाच्या माध्यमातुन किमान शंभर  एकर क्षेत्रावर शेतकरी गटामार्फत विविध कृषि कृषि पुरक उपक्रम प्रकल्प स्वरुपात राबविण्यात यावा. समुह शेतीचा प्रयोग हा एका शिवारातील संलग्न भातीक क्षेत्रामध्ये सामुहकरत्या नियोजनबद्ध शेती करणारा असावा. सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची आत्मा संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1890 अथवा कंपनी अधिनियम 1958 च्या तरतुदी अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी / गट म्हणुन नोंदणीकरणे आवश्यक राहील. सामुहिक सिंचन सुविधा, सामुहिक पध्दतीने यांत्रीकीकरणाद्वारे मशागत करणे शक्य असल्याने सामुहिक शेतीस प्राधान्य देण्यात येईल. गटशेती या योजनेअंतर्गत प्रकल्प स्वरुपात उपक्रम राबविण्यात येईल. या योजनेत गठ झालेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण मार्गदर्शन देण्यात येईल. शेतकऱ्यांच्या गटाना प्रगतीशी शेतीचे तंत्रज्ञान देण्यासाठी शेती विषयक तांत्रीक सल्लागाराची सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
शेतीपुरक जोडधंदा जसे सामुह गोठा, दुग्ध प्रक्रिया औजारे, मत्सपालन, मधुमक्षीका पालन, रेशीम उद्योग, कुक्कुट पालन तसेच मागेल त्याला शेततळे, जलसंपदा विभागाकडील कामे इत्यादी कार्यक्रम संबधीत कृषि संलग्न विभागाकडुन त्या विभागाच्या प्रचलित निकषा प्रमाणे समुह गटास प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात येतील. बँकेत प्रकल्प आराखडा सादर केलेल्या, करणा-या गटास प्राधान्य देण्यात येईल. ज्या तालुक्यात ग्रामीण स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प (एम.ए.सी.पी.) किंवा अन्य योजना, प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झालेल्या नाहीत अशा तालुक्यास या योजनेत प्राधान्य देण्यात येईल.  ज्यगटाचे प्रकल्प आराखडे सर्व अटी शर्तीची पुर्तता करतील अशा गटांना प्राधान्य देण्यात येईल. इच्छुक गटाने, शेतकरी उत्पादक कंपन्या यांनी कृषि विभागच्या तालुका कृषि अधिकारी यांचेकडे संपर्क  साधावा, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा नांदेड यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...