बालक, गरोदर मातांसाठी लसीकरणाची
जिल्हात विशेष मोहिम राबविण्यात येणार
- जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 30 :- लसीपासून
वंचित 0 ते 2 वर्ष वयोगटातील बालकांना व गरोदर मातांना आजारापासून संरक्षीत
करण्यासाठी "इंटेन्सीफाईड मिशन इंद्रधनुष्य" ही विशेष मोहिम ऑक्टोंबर
2017 ते जानेवारी 2018 या कालावधीत नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. ही
मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण
डोंगरे यांनी केले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की, ही मोहिम
यशस्वी करण्यासाठी संपुर्ण जिल्ह्यात ग्रामपातळीपासून ते महानगरपालिकेपर्यंत आशा,
अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य कर्मचारी, लिंक वर्कर यांच्यामार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण
करुन असंरक्षीत बालके व गरोदर माता यांच्या याद्या तयार करण्याबाबत सुचना देण्यात
आलेल्या आहेत. ज्या भागात असरंक्षीत लाभार्थी जास्त आहेत त्या भागात ऑक्टोंबर,
नोव्हेंबर, डिसेंबर 2017 या महिन्यात 7 ते 14 तारखेला व जानेवारी 2018 या महिन्यात
8 ते 15 तारखेपर्यंत जिल्ह्यात "इंटेन्सीफाईड मिशन इंद्रधनुष्य" मिशन
राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावरुन
जिल्हास्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक व तालुकास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक
जिल्ह्यातील लसीकरणाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी व पर्यवेक्षण करणार आहेत. लसीकरणासाठी
लसीचा पुरेशा साठा जिल्हास्तरावर वरिष्ठ कार्यालयामार्फत प्राप्त होणार असून सर्व
संस्थांना लस पुरवठा जिल्हास्तरावरुन करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने
जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांचे आई-वडील, पालक, शासकीय अधिकारी, स्वयंसेवी
संस्थांचे पदाधिकारी, खासगी वैद्यकीय व्यवसायीक व सामाजिक संस्था, कार्यकर्ते
यांचे या मोहिमेत योगदान घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात असंरक्षीत मात व बालकांना त्यांच्या
वयोगटानुसार लसीकरण करुन या मोहिमेत लसीकरणाद्वारे जिल्ह्यामध्ये 90 टक्केच्यावर
लाभार्थ्यांना संरक्षीत करण्यात येणार आहे. म्हणुन या मोहिमेस सर्वांनी सक्रीय सहकार्य
करावे, असे आवाहनही श्री. डोंगरे यांनी केले आहे.
जिल्ह्यात लसीकरणाचे काम कमी असणारे भाग, जोखीमग्रस्त भाग
(घटसर्प, गोवर, धनुर्वात, उद्रेक झालेला भाग) अतिदुग्रम भाग, डोंगराळ भाग, सलग तीन
सत्रे रद्द झालेले गावे , विभाग, ए.एन.एम.ची पदे रिक्त असलेल्या उपकेंद्रांची
गावे, शहरी भागातील झोपडपट्टी, पल्स पोलीओ कार्यक्रमात असलेले जोखीमग्रस्त भाग,
विटभट्टी, बांधकामे, स्थलांतरीत वस्त्या, ऊस तोडणी वस्त्या, इतर (पेरिअर्बन एरिया)
या भागामध्ये ही मोहिम प्राधान्याने राबविण्यात येणार आहे. शुन्य ते 2 वर्ष
वयोगटातील बालकांना बी.सी.जी., पोलीओ, आय.पी.व्ही., इंजे. पेंटाव्हॅलेंट,
डी.पी.टी. व गोवर या लसी, अ जीवनसत्वाच्या मात्रा तसेच गरोदर मातांना धनुर्वाताची
मात्रा व लोहाच्या गोळ्या देण्यात येणार आहेत. तसेच बालकांना क्षयरोग, घटसर्प,
डांग्या खोकला, धनुर्वात, मेंदुज्वर, कावीळ या आजारासाठी रोग प्रतिबंधक लसी
देण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी नांदेड जिल्ह्यात "इंटेन्सीफाईड मिशन
इंद्रधनुष्य" ही मोहिम राबविण्यासंबंधी सादरीकरणातून माहिती देण्यात आली.
000000
No comments:
Post a Comment