Thursday, December 4, 2025

 वृत्त क्रमांक 1275

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालतीचे आयोजन

 

नांदेड दि. 4 डिसेंबर :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेतअसे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 1274

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून प्रशिक्षणार्थी निवड करताना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये

 

नांदेडदि. डिसेंबर :- जिल्हयातील सर्व शासकियनिमशासकिय तसेच खाजगी आस्थापनांनी त्यांचे आस्थापनेवर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून प्रशिक्षणार्थी घेताना किंवा निवड करताना त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्कफीरक्कम आकारण्यात येवू नये. असे निर्दशनास आल्यास संबंधीत आस्थापनेवर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईलअसे आवाहन जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. रा.म. कोल्हे यांनी केले आहे.

 

राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता विभागाच्या जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्राचे रहीवाशी असलेल्या 18 ते 35 वर्ष वयोगटातील युवकांना शासकियनिमशासकियखाजगी आस्थापनात 11 महिन्यासाठी कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.


त्यास अनुसरुन नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकियनिमशासकिय तसेच खाजगी आस्थापनांना याद्वारे कळविण्यात येते की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत संबंधीत आस्थापनेत प्रशिक्षणार्थी घेण्याबाबतची प्रक्रिया ही निःशुल्क असून कोणत्याही प्रकारची शुल्कफीरक्कम शासनामार्फत आकारण्यात येत नाहीअशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी दिली आहे.

0000


वृत्त क्रमांक 1273

साफसफाई, आरोग्यास धोकादायकक्षेत्रात काम करणाऱ्या

पालकांच्या पाल्यासाठी भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना 

नांदेड, दि. 4 डिसेंबर :-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात साफसफाई व आरोग्यास धोकादायकक्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांसाठी भारत सरकार मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेचा संबंधित पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे. 

हाताने मेहतर काम करणाऱ्या/ मानवी विष्ठाचे व्यक्तीचे वहन करणाऱ्या व्यक्ती. बंदिस्त व उघड्या गटाराची साफसफाई करणाऱ्या व्यक्ती. मेलेल्या जनावरांची कातडी कमावणारे आणि कातडी सोलणारे. कचरा गोळा करणारे, उचलणारे. मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स ऍक्ट 2013 मधील सेक्शन 2(1)(d) नुसार धोकादायक सफाई व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते.       

या योजनेअंतर्गत इयत्ता 1 ली ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या अनिवासी, स्थानिक विद्यार्थ्यांसाठी वार्षिक रुपये 3 हजार 500 तसेच इयत्ता 3 री ते 10 वीमध्ये शिकणाऱ्या निवासी (शिक्षणासाठी बाहेरगावी राहात असलेले) विद्यार्थ्यांना वार्षिक रुपये 8 हजार रुपये  शिष्यवृत्ती रक्कम अदा करण्यात येते. 

या योजनेसाठी पालक हे उपरोक्त नमूद अस्वच्छ, साफसफाई क्षेत्रात व्यवसाय करीत असल्याबाबत पुढील प्रमाणे सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत क्षेत्र:- ग्रामसेवक व सरपंच. नगरपालिका / नगरपंचायत क्षेत्र:- मुख्याधिकारी. महानगरपालिका क्षेत्र:- आयुक्त / उपायुक्त. सदरील प्रमाणपत्राचा विहित नमुना सर्व नगरपालिका व गटशिक्षणाधिकारी,गट साधन केंद्र यांचे कार्यालयात उपलब्ध आहे. 

अर्ज करण्याची पद्धत

सदरील योजनेसाठी अर्ज करण्याकरिता विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी महाडीबीटी पोर्टल प्रणालीच्या www.prematric.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरावयाचे आहे. सदर ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुख्याध्यापक यांनी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र व पालकाचे हमीपत्र पोर्टलवर अपलोड करावयाचे आहे. सदर योजना स्वयं अर्थसहाय्यित शाळेसाठी  लागू नाही. तसेच विद्यार्थ्याला फक्त एकाच मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येईल. 

सदरील योजना सर्व जाती धर्माच्या व्यक्तींसाठी लागू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही उत्पन्नाची अट नाही. विद्यार्थ्यांची शालेय उपस्थिती किमान 75 टक्के असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या शिष्यवृत्ती च्या लाभची रक्कम  पालकांच्या आधार संलग्नीत बँक खात्यावर दोन हप्त्यामध्ये जमा करण्यात येते. साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यासाठी भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ही योजना राबविण्यात येते, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी दिली.

00000

 वृत्त क्रमांक 1272

शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पांतर्गत  रब्बी हंगामासाठी पाणी पाळ्याचे वेळापत्रक निश्चित

 पाण्यासाठी मागणी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड, दि. 4 डिसेंबर :- शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये प्रकल्पावरील सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने रब्बी हंगामी, पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, मंजूर उपसा, मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी, नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहीत नमुन्यात बुधवार 10 डिसेंबर 2025 पूर्वी संबंधित शाखा कार्यालयात माहिती भरून सादर करावी, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे. 

यावर्षी प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीची बैठक अद्याप झाली नसल्याने आगामी कालवा सल्लागार समितीच्या बैठकित होणाऱ्या निर्णयाच्या अधीन राहुन 15 ऑक्टोंबर 2025 रोजीच्या शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पातील (80.79 दलघमी) 100 टक्के इतक्या जिवंत पाणीसाठ्यावर आधारीत उपलब्ध पाणीसाठ्यातून पिण्यासाठीचे पाणी राखीव ठेऊन रब्बी हंगामात दोन (2) पाणीपाळ्या देण्याचे नियोजित आहे. 

प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील लाभधारकांना अधिसुचित नदी-नाल्यावरील तसेच मुख्य कालव्यावरील प्रवाही व कालवा उपसा सिंचन योजना धारकांनी रब्बी हंगामातील उभी पिके व चारा पिके या पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, कालव्यावरील उपसा, नदी-नाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यायचे असल्यास मागणी अर्ज नमुना 7-7अ मध्ये भरुन सोबत थकीत पाणीपट्टी व चालू हंगामाची अग्रीम रक्कम भरण्यात यावी तरच पाणी अर्ज मंजूर करण्यात येईल अन्यथा पाणी अर्ज नामंजूर झालेल्या अर्जदारांना पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. बुधवार 10 डिसेंबर 2025 पुर्वी संबधित शाखा कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील. सिंचनासाठी पाण्याची गरज तसेच विहीत नमुन्यात प्राप्त मागणी अर्ज संख्या विचारात घेऊनच प्रत्यक्ष सिंचनासाठी पहिली पाणीपाळी दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी सुरु करण्याचे अपेक्षित नियोजन आहे. 

शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पांतर्गत व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावीत कार्यक्रमानुसार प्राप्त मागणीनुसार सिंचनासाठी सोडण्यात येईल. 

रब्बी हंगाम सन 2025-26 मधील पाणीपाळीच्या प्रस्तावित कार्यक्रम

आवर्तन क्र. 1 दि. 15 डिसेंबर 2025 ते 14 जानेवारी 2026 पर्यंत कालावधी 30 दिवस आहे. तर आवर्तन क्र. 2 दि. 25 जानेवारी 2026 ते 24 फेब्रुवारी 2026 कालावधी 30 दिवस पर्यंत राहील.  पाऊस व आकस्मिक कारणामुळे पाणीपाळी संख्या, कालावधी व तारखांमध्ये बदल होऊ शकतो. 

शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचे पंप व उध्दरण नलिका यांना बसवून 35 वर्षाचा कालावधी झालेला असून त्यांचे आर्युमान संपलेले आहे. त्यामुळे चालू पाणी पाळीमध्ये पंप व उद्धरण नलिकाच्या खराब स्थितीमुळे व्यत्यय आल्यास पाणीपाळी खंडित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. कार्यक्षेत्रातील शेतक-यांनी ही बाब विचारत घेऊनच पिक पेरणी करावी.नमुना नं. 7,7-अ प्राप्त झालेल्या पाणी अर्जात खालील अटी व शर्तीचे अधीन राहुन मंजुरी देण्यात येईल. 

रब्बी हंगामी, पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, मंजूर उपसा, मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी, नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहीत नमुन्यात दि.10 डिसेंबर 2025 पूर्वी संबंधित शाखा कार्यालयात माहिती भरून सादर करावेत. लाभधारकांना त्याच्याकडील संपुर्ण थकबाकी पाणीपट्टी भरावी लागेल. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आरच्या पटीत असावे. कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक राहील. पाणीपट्टी न भरणाऱ्या व पाणी अर्ज नामंजूर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयास बंधनकारक राहणार नाही. 

काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रिक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976,कालवे नियम 1934,म.सिं.प.शे.व्य.कायदा 2005 तसेच महाराष्ट्र जलसंपदा विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या तरतुदीनुसार सर्व शर्ती व अटी बंधनकारक राहतील याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी. लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामुळे पाणी नदीनाल्यास वाया जाऊन ठराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. 

शासन निर्णयाप्रमाणे विहीत दरानुसार पाणीपट्टीचे दर आकारण्यात येतील. थकीत व चालू पाणीपट्टी वेळेत भरून सहकार्य करावे. शेतचारी स्वच्छ व दुरुस्त ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकांची राहील. उडाप्याच्या अंतिम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. पाणी पाळी सुरू असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टर द्वारे पाणी उपसा केल्यास अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. सबंधीत प्रकल्पाच्या विभागामार्फत सर्व लाभधारकांना पाणी मिळेल या दृष्टीने पुरेपुर प्रयत्न करण्यात येत आहेत. याची संबधित लाभधारकांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर)चे उपकार्यकारी अभियंता बी.जे.परदेशी  यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 1271

आयटीएम कॉलेजमध्ये एचआयव्ही विषयावर शिबिर संपन्न  

नांदेड, दि. 4 डिसेंबर :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व आरोग्य विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयटीएम कॉलेज येथे आज एचआयव्ही विषयावर शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव शरद देशपांडे होते. 

कोणताही रोग होण्याआगोदरच त्याचा प्रतिबंध करणे काळाची गरज आहे ही महत्वपूर्ण बाब जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव शरद देशपांडे यांनी नमूद केली. एचआयव्ही संदर्भात विविध कॉलेजमध्ये जनजागृती करण्यासाठी रेड रिबेन क्लबची स्थापना करण्यात येत आहे. एचआयव्ही झाल्याने मानवाच्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे आपण वारंवार आजारी पडतो, शरीर कमकुवत होते अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप अंकुशे यांनी दिली. 

एचआयव्ही रोग होण्याचे प्रमुख कारणे

• अनैतिक संबंध (एच.आय.व्ही.ग्रस्त सोबत)

• वैद्यकिय उपकरणे (एच.आय.व्ही. विषाणु असलेले)

• रक्त आणि रक्त घटक (एच.आय.व्ही. विषाणू असलेले रक्त)

• गर्भवती आई पासुन बाळाला(एच.आय.व्ही.गृस्त आई)

जिल्हयात एप्रिल 2025 पासून 4 डिसेंबर पर्यंत 27 गर्भवती एचआयव्हीग्रस्त मातेच्या बाळांना एचआयव्ही रोग होण्यापासून बचाव करण्यात यशस्वीरित्या कार्य पुर्ण केले आहे. एचआयव्ही संदर्भात माहितीसाठी टोल फ्रि क्रमांक 1097 बदल असल्याची माहिती यावेळी दिली. आय.सी.टी.सी.केंद्र समुपदेशक माधव सुगावकर यांनी एचआयव्ही विषयावर मार्गदर्शन केले. मुलांना जनजागृती करण्याचे आवाहन केले व रेडरिबेन क्लब बद्दल माहिती दिली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन आयटीएम कॉलेजचे डॉ. महेश राजुरकर यांनी तर डॉ. पी. पी. कदम यांनी आभार मानले. या कार्यक्रमास जवळपास 198 विद्यार्थी उपस्थित होते.

00000



 वृत्त क्रमांक 1270

जिल्ह्यात कुष्ठ रुग्ण शोध अभियान यशस्वी; 

९६ टक्के लोकसंख्येची तपासणी, ७ नवीन रुग्णांचे निदान

नांदेड, दि. ४ डिसेंबर : नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेले कुष्ठ रुग्ण शोध अभियान (LCDC) अत्यंत यशस्वी ठरले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान नियोजित क्षेत्रांमध्ये प्रभावीपणे पूर्ण करण्यात आले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या समन्वयातून मोहिमेची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात आली.

अभियानातील महत्त्वाचे निष्कर्ष :

तपासणीचे प्रमाण :

१४ दिवसांच्या कालावधीत एकूण ५३,८६६ नागरिकांची तपासणी करण्यात आली, जे लक्षित लोकसंख्येच्या ९६ टक्के इतके आहे.

संशयित रुग्णांची नोंद :

प्राथमिक लक्षणे किंवा कुटुंबातील संपर्क असलेल्या १,०६५ व्यक्तींची नोंद करण्यात आली. यापैकी ९९९ जणांची सखोल वैद्यकीय तपासणी आरोग्य पथकांकडून करण्यात आली.

नवीन निदान :

तपासणी दरम्यान जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ७ नवीन कुष्ठरुग्णांचे निदान करण्यात आले.

तात्काळ उपचार :

निदान झालेल्या सर्व रुग्णांवर त्वरित बहु-औषधी उपचार (MDT) सुरू करण्यात आले आहेत.

जिल्हा प्रशासनाचा ठोस पाठिंबा, आरोग्य विभागाचे सघन नियोजन आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग यामुळे हे अभियान उल्लेखनीयरीत्या यशस्वी झाले आहे. जिल्ह्यात कुष्ठरोगाचे लवकर निदान, व्यापक तपासणी आणि त्वरित उपचार सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे.

०००००

 वृत्त क्रमांक 1269

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाह रोखण्यात आले यश

बाल विवाहाबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा

 नांदेड दि.4 नोव्हेंबर - नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली बाल विवाह मुक्त भारत 100 दिवस अभियान सुरु आहे. जिल्ह्यातील एका 17 वर्षीय बालिकेचा बाल विवाह होणार असले बाबत गोपनीय माहिती चाईल्ड लाईन 1098 ला प्राप्त झाली. सदरील तक्रार 1098 वर प्राप्त होताच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालया अंतर्गत चाईल्ड हेल्प लाईनच्या ऐश्वर्या शेवाळे व दिपाली हिंगोले यांनी पिडीत मुलीच्या घरी गृहभेट देऊन मुलीच्या आई वडीलांचे समुपदेशन केले. मुलीच्या वयाबाबत खात्री करुन बाल विवाहाच्या दुष्परिणामाबाबत व बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 बाबत सविस्तर माहिती दिली. बालविवाह हा बेकायदेशीर असल्याबाबत मुलीच्या पालकांना समजावुन सांगण्यात आले. 

मुलीला काळजी व संरक्षणाच्यादृष्टीने बाल कल्याण समिती, नांदेड यांच्यासमोर हजर करण्यात आले. पालकांचे बाल विवाह न करणे बाबतचे हमी पत्र घेण्यात आले असुन सदरील बाल विवाह रोखण्यात आला आहे.

बाल विवाहाची कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ शहरी भागातील बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच ग्रामीण भागात ग्रामसेवक, अंगणवाडी सेवीका, चाईल्ड हेल्प लाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. जेणेकरुन भविष्यातील अनिष्ठ प्रथा रोखता येतील, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 1268

खेळाडुंसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जातील – क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

विभागस्तरीय युवा महोत्सवाचे उद्‌घाटन संपन्न ; क्रीडा विभागाच्या विविध बाबींचा आढावा

नांदेड, दि. 4 डिसेंबर : विद्यार्थ्यानी आपल्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देत स्पष्ट ध्येय निश्चित करावे. अडचणींवर मात करून कला गुणांच्या वृद्धीसाठी विविध स्पर्धांमध्ये सहभाग वाढवावा. खेळाडूंसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासह निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री  ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले. स्टेडियम परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित विभागस्तरीय युवा महोत्सव 2025-26 च्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत उपसंचालक (क्रीडा व युवक सेवा) लातूर विभाग कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, राष्ट्रीय सेवा योजना व माय भारत यांच्या संयुक्त विद्यमाने या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उपसंचालक महादेव कसगावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, स्वारातीमचे सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ. संदीप काळे, माय भारतच्या जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर, डॉ. सान्वी जेठवाणी, ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष श्री. गील, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी सिरसीकर, क्रीडा अधिकारी संजय बेत्तीवार, शिवछत्रपती पुरस्कारार्थी जनार्दन गुपीले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

आगामी ऑलिंपिकमध्ये भारताला अधिकाधिक पदके मिळवून देण्यासाठी खेळाडूंना सर्व प्रकारच्या सुविधा, आवश्यक ते प्रशिक्षण आणि निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे श्री. कोकाटे यांनी स्पष्ट केले. नांदेड क्रीडा संकुलाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात येऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी त्यांनी जिल्ह्यातील क्रीडा कार्यालयाच्या योजनांचा, उपलब्ध निधीचा, तालुका क्रीडा संकुलातील कामांचा, तसेच कोणत्या खेळांचा प्रसार अधिक आहे व कोणत्या मैदानांवर नियमित सराव केला जातो याचा सविस्तर आढावा घेतला. विविध क्रीडा संघटना व खेळाडूंच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याची ग्वाही त्यांनी दिली. सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराच्या स्टेडियमच्या मागणीवरही त्यांनी सकारात्मक भूमिका मांडली आणि कामे लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी युवा कला स्पर्धकांना स्पर्धेसाठी त्यांनी शुभेच्छा देत विभागाचे नावलौकिक वाढवावे असे आवाहन केले.

मंत्री श्री. कोकाटे म्हणाले की, चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येकाने एखादा खेळ किंवा कला जोपासली पाहिजे. शासनाकडून खेळाडूंच्या गुणांना वाव देण्यासाठी अनेक सुविधा पुरविण्यात येत आहेत. विविध स्पर्धांमधील मुलींचा वाढता सहभाग समाधानकारक असून अलीकडेच मुलींनी क्रिकेट वर्ल्ड कपही जिंकला आहे. निकोप समाजासाठी चांगले मार्गदर्शक व प्रशिक्षक तयार होणे आवश्यक असून मोबाईलच्या युगात सांस्कृतिक कार्यक्रम, नाटके यांचा होत असलेला घटता कल चिंतेची बाब आहे. म्हणूनच बालवयापासूनच मुलांना कला व क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात ड्रॅगन बोट, रस्सीखेच, फेन्सिंग, जिम्नॅस्टिक्स, पॅरा ॲथलेटिक्स आणि राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच मार्गदर्शकांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले. 

तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुरलीधर हंबर्डे यांनी तर आभार क्रीडा मार्गदर्शक बालाजी सिरसीकर यांनी मानले.

00000








 


वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...