विशेष लेख
Friday, November 7, 2025
वृत्त क्रमांक 1170
गुरुद्वारा गेट नंबर 1 चौक ते भगतसिंग चौक वाहतुकीसाठी प्रतिबंध
नांदेड, दि. 7 नोव्हेंबर : नांदेड शहरात गुरूद्वारा गेट नंबर 1 ते भगतसिंग चौक हा मार्ग वाहतुकीसाठी 9 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2025 या कालावधीत बंद राहणार आहे. या कालावधीत देनाबॅक चौक ते जुनामोंढा चौक हा मार्ग दुहेरी मार्ग म्हणून जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी घोषीत केला आहे. देनाबॅक चौक ते जुनामोंढा चौक या पर्यायी मार्गाने वाहने वळविण्यास त्यांनी मान्यता दिली आहे.
पोलीस अधिक्षक नांदेड यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी रस्ता वाहतुक प्रतिबंध व पर्यायी रस्त्यासाठी आवश्यक असलेले बोर्ड, चिन्ह लावणे इत्यादी बाबतची कार्यवाही करावी. अशी अधिसुचना जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी मोटार वाहन कायदा 1999 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार 7 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमीत केली आहे.
00000
वृत्त क्रमांक 1169
वंदे मातरम गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त
सामुहिक गायनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
नांदेड, दि. 7 नोव्हेंबर : “वंदे मातरम” या राष्ट्रभावना जागविणाऱ्या गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त आज जिल्ह्यात वंदे मातरम समूह गायन कार्यक्रम सर्वत्र उत्साहात संपन्न झाला. नांदेड येथे श्री गुरूग्रंथ साहिबजी भवन येथे हा कार्यक्रम हजारो विद्यार्थ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रभक्तीच्या वातावरणात उत्साहात पार पडला.
श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, तहसिलदार संजय वारकड, गुरुद्वारा अधीक्षक हरजितसिंग कडेवाले, शहर पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजने, जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुर्यवंशी, शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राथमिक यांच्यासह शहरातील विविध शाळेतील शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह विविध कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक स्थळी सकाळी 10 वा. एकाच वेळी “वंदे मातरम्” गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. विद्यार्थ्यांसह शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि अभिमानाची भावना दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभागाच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी दिल्ली येथील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सामूहिक वंदे मातरम गीत गायन सुरु होते, हा कार्यक्रम सर्वाना दूरदृश्यप्रणालीद्वारे दाखविण्यात आला.
“वंदे मातरम्” गीताच्या 150 व्या वर्षानिमित्ताने घेतलेल्या या सामूहिक गायन उपक्रमाने जिल्ह्यात देशभक्तीचा उत्साह आणि ऐक्याची भावना वृद्धिंगत झाली. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात ‘वंदे मातरम’ या गीताचा विशेष उल्लेखनीय प्रभाव राहिला आहे आणि हे गीत स्वातंत्र्य सैनिकांसाठी प्रेरणास्त्रोत बनले होते. थोर कवी आणि तत्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 साली रचलेल्या ‘वंदे मातरम’ या गीताला शुक्रवारी 7 नोव्हेंबर रोजी 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 या दरम्यान एकूण चार टप्प्यात राज्यात विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून कौशल्य विकास विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने राज्यभरात वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी “वंदे मातरम्” गीतावर आधारीत लघुनाटिका सादर केली.
00000
वृत्त क्रमांक 1168
शासकीय तंत्रनिकेतन नांदेडला एनबीए मानांकन : शिक्षण क्षेत्रात यशाची भर
नांदेड,दि.७ नोव्हेंबर:- शासकीय तंत्रनिकेतन नांदेडच्या सिव्हिल, माहिती तंत्रज्ञान व विद्युत अभियांत्रीकी या विभागाला 31 डिसेंबर2028 पर्यंत तसेच यंत्र व उत्पादन अभियांत्रिकी या विभागाला दि. 30 जून 2027 पर्यंत National Board of Aceridinarion (NBA) कडून मानांकन प्राप्त झाले आहे.
राष्ट्रीय मान्यता मंडळ (एनबीए) ही भारतातील एक स्वायत्त संस्था आहे जी अभियांत्रिकी आणि इतर तांत्रिक कार्यक्रमांचे मूल्यमापन आणि मान्यता राष्ट्रीय स्तरावर देते. सदर राष्ट्रीय मानांकण हे विभागाच्या दर्जेदार, शैक्षणिक आणि तांत्रिक सुविधासाठी मिळाले आहे.
एनबीए मान्यता प्रक्रियेत अभ्यासक्रम, विद्यार्थाची गुणवत्ता आणि मुल्यांकन प्रणाली इ. बाबींची कसून तपासणी केली जाते. राष्ट्रीय मान्यता मंडळ (एनबीए) मान्यता दिल्याने विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण, चांगल्या नोकरीच्या संधी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळण्यात मदत होते. यामुळे शिक्षण शिकण्याच्या प्रक्रियेत सुधारणा होते.
तसेच संस्थेच्या वैद्यकीय अणुविद्युत या विभागाला MSBTE कडून मागील वर्षाकरिता शैक्षणिक तसेच गुणवत्तेच्या आधारे उत्कृष्ट दर्जा प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर भारत सरकारच्या अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण यांच्याकडून संस्थेस २६ जुन 2027 पर्यंत प्रमाणित करण्यात आले आहे.
नजिकच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त शाखांना मानांकन मिळणारी मराठवाड्यातील शासकीय तंत्रनिकेतन नांदेड ही दुसरी संस्था ठरली आहे. त्यामुळे संस्थेची मान नक्कीच उंचावलेली आहे.
सदरील मानांकनासाठी विभागाचे संचालक तसेच सहसंचालक यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य डॉ. एन. एल. जानराव यांनी तसेच संस्थेचे एनबीए समन्वयक डॉ.गणेशडी अवचट यांनी समाधान व्यक्त केले असून, हे यश सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांचे फळ असल्याचे सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण यश ठरले आहे.
0000
वृत्त क्रमांक 1277 जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध नांदेड (जिमाका) , दि . 5 :- जिल्हा माहिती कार्यालय , नांदे...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक 975 हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जनक्रांती व हुतात्मा संतराम कांगठीकर वाचनालयात भव्य ग्रंथप्रदर्शन नांदेड, दि. 17 सप्...