Wednesday, September 10, 2025

वृत्त क्रमांक 951

रब्बी पीक प्रात्यक्षिकासाठी शेतकरी गट, उत्पादक कंपन्यानी

महाडिबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि. 10 सप्टेंबर :-  राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान- कडधान्य- गहू, हरभरा, पौष्टिक तृणधान्य- रब्बी ज्वारी,राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया- करडई, सुर्यफुल व राष्ट्रीय कृषि विकास महाराष्ट्र मिलेट मिशन योजनेंतर्गत- ज्वारी या घटकांतर्गत रब्बी हंगामात गहू, हरभरा,ज्वारी, करडई व सुर्यफुल या  या पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

पीक प्रात्यक्षिकासाठी कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे 31 मार्च 2024 पुर्वी नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था पात्र आहेत. गटाने प्राधिकृत सदस्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावा. ही सुविधा 2 सप्टेंबर 2025 पासुन उपलब्ध आहे. संकेतस्थळावर बियाणे वितरण फलेक्सी घटक, औषधे आणि खते या टाईल अंतर्गत शेतकरी गटांना अर्ज करता येईल.

 तरी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांनी रब्बी हंगाम पीक प्रात्यक्षिकासाठी महाडीबीटीवर अर्ज करावेत. तसेच अधिक माहितीसाठी गावचे सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 950 

श्रीवेद मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीची निवडणूक जाहीर

 

·         जिल्हाधिकारी राहुल कर्डिले निवडणूक निर्णय अधिकारी   

नांदेड, दि. 10 सप्टेंबर :- श्रीवेद मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., बी-5, विष्णु कॉम्पलेक्स, हॉटेल ताज पाटील जवळ आय.टी.आय. नांदेडची निवडणूक जाहीर करण्यात आली असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक पार पडणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत आज यासंदर्भातील माहिती जारी करण्यात आली.   

ॲसीस्टंट रजिष्टार, को-ऑपरेशन, सी.ई.ए. (को-ऑपरेटीव्ह इलेक्शन ॲथोरेटी) 9 वा मजला, टावर-ई, वर्ल्ड ट्रेड सेंटर, नौरोजी नगर, दिल्ली-110029 यांनी त्याचे पत्र दिनांक 17 जून 2025 नुसार सदर संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणुक घेणेसाठी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची नियुक्ती केली आहे. 

संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमानुसार एकूण 11 संचालक निवडून द्यावयाचे असून त्यामध्ये सर्वसाधारण मतदार संघातुन आठ, अनुसूचीत जाती/जमाती मतदार संघातून एक आणि महिला राखीव मतदार संघातून दोन संचालकाची निवड करावयाची आहे. 

सदर संस्थेच्या संचालक मंडळाचा निवडणूक कार्यक्रमासह 27 ऑक्टोंबर 2025 रोजी संस्थेच्या पात्र मतदारांची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. 29 ऑक्टोंबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत प्रारुप मतदार यादीवर आक्षेप नोंदविणे, प्राप्त झालेल्या आक्षेपाची छाननी 3 ते 6 नोव्हेंबर 2025 या कालावधीत करण्यात येऊन 6 नोव्हेंबर 2025 रोजी संस्थेच्या सभासदांची अंतिम मतदार यादी दुपारी 3 वा. प्रसिध्द करण्यात येणार आहे. 

7 ते 11 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सकाळी 11 ते दु. 3 यावेळेत नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल. प्राप्त नामनिर्देशन पत्राची प्रसिध्दी 11 नोव्हेंबर 2025 रोजी दु. 5 वा. करण्यात येणार आहे. सदर प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी 18 नोव्हेंबर 2025 रोजी करुन वैध नामनिर्देशनपत्राची प्रसिध्दी 18 नोव्हेंबर 2025 रोजी दु. 5 वा. करण्यात येणार आहे. तसेच 25 नोव्हेंबर 2025 रोजी दु. 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र परत घेता येतील. त्यानंतर निवडुन द्यावयाच्या उमेदवारांची अंतिम यादी 25 नोव्हेंबर 2025 रोजी दु. 5 वा. प्रसिध्द करण्यात येणार आहे. आवश्यकता असल्यास 30 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 या कालावधीत मतदान घेण्यात येणार असुन मतमोजणी 1 डिसेंबर 2025 रोजी करण्यात येणार आहे. को-ऑपरेटीव्ह इलेक्शन ॲथॉरीटी नवी दिल्ली यांचेकडून मंजूरी प्राप्त झाल्यानंतर 5 डिसेंबर 2025 रोजी संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल निवडणूक प्राधिकरणाचे पूर्व परवानगीनंतर घोषीत करण्यात येणार आहे. 

श्रीवेद मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि. बी-5 विष्णु कॉम्पलेक्स हॉटेल ताज पाटील जवळ आय.टी.आय. नांदेडच्या सर्व सभासदांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन निवडणुक निर्णय अधिकारी श्रीवेद मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., बी-5, विष्णु कॉम्पलेक्स हॉटेल ताजपाटील जवळ आय.टी.आय. नांदेड तथा जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे. संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम संस्थेच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. अधिक माहिती संस्थेचे बी-5 विष्णु कॉम्पलेक्स हॉटेल ताज पाटील जवळ आयटीआय नांदेड येथील मुख्य कार्यालयात पहावयास मिळतील, असे प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

000000



वृत्त क्रमांक 949  

शासकीय तंत्रनिकेतन येथे प्रवेशासाठी सुवर्ण संधी 

नांदेड, दि. 10 सप्टेंबर :- शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2025-26 प्रवेशासाठी संस्थेत जागा रिक्त असलेल्या संभाव्य रिक्त होणाऱ्या जागेवर सोमवार 15 सप्टेंबर 2025 रोजी अतिरिक्त प्रदेश फेरी घेण्यात येणार आहे. च्छुक विद्यार्थ्याांनी आपली मुळ कागदपत्रे व आवश्यक त्या शुल्कासह माहिती व तंत्रज्ञान इमारत शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत उपस्थित रहावे, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. नागेश जानराव यांनी केले आहे.  

000000


    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...