Wednesday, August 20, 2025

वृत्त क्रमांक 882

नांदेडच्या नैसर्गिक आपत्तीत सैन्य दलाची मदत

जिल्हाधिकाऱ्यांनी मानले आभार

नांदेड दि.२० ऑगस्ट:- जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस व अतिवृष्टी झाल्याने काही गावात पूरस्थिती निर्माण झाली असता मदत व बचाव करण्यासाठी भारतीय सैन्य दलास पाचारण करण्यात आले होते. बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आभार मानले.

मुखेड तालुक्यातील 17 व 18 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस व अनेक मंडळात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे हसनाळ, रावणगाव,भासवाडी व भिंगोली या गावात पूरस्थिती निर्माण होऊन ग्रामस्थ अडकून पडले होते.

सुरुवातीला राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने पहाटे बचाव कार्यास सुरूवात केली. तथापि पूर बाधितांची संख्या जास्त असल्याने तसेच कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सैन्य दलास पाचारण केले होते. दिनांक 18 रोजी सायंकाळी पुणे येथील 269 इंजिनिअर रेजिमेंट  व छत्रपती संभाजीनगर येथील 321 मेडियम रेजिमेंट यांनी मदत व बचाव कार्यात सहकार्य केले.या तुकड्यांनी 43 कुटुंबातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविले. तसेच 650 नागरिकांना भोजन तसेच 200 लोकांना आरोग्य शिबिरातून सेवा दिली.त्यामुळे आणखी मोठी हानी टाळणे शक्य झाले. आपत्तीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनास मोठी मदत झाली. बुधवार दिनांक 20 रोजी सदर दोन्ही तुकड्यांना कार्यमुक्त केले.याप्रसंगी लेफ्टनंट कर्नल सागर महात्मे, मेजर सुमित चामले, कॅप्टन राणा, कॅप्टन निखिल कदम यांचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आभार मानले.

०००००





 वृत्त क्रमांक 881

राहेगाव किकी पुलास उपविभागीय अधिकाऱ्यानी दिली भेट

पूर समस्या निवारणासाठी ग्रामस्थांशी साधला संवाद

नांदेड दि. 20 ऑगस्ट :- नांदेड तालुक्यातील राहेगाव-किकी येथील पुलावर सततच्या पावसामुळे पाणी येवून दोन गावांचा संपर्क तुटल्याची माहिती मिळताच नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसिलदार संजय वारकड यांनी 19 ऑगस्ट रोजी स्थळ पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या व समस्याचे कायमस्वरूपी निराकरण करण्याच्या अनुषंगाने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

तुप्पा महसूल मंडळातील राहेगाव व किकी या दोन गावांना जोडणारा पुल अरूंद व कमी  उंचीचा आहे. त्यामुळे गोदावरी नदी पात्रातील पाणी पातळी वाढताच पुलावर पाणी येवून वाहतूक ठप्प होऊन  या दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. अलिकडे झालेल्या सततच्या पावसामुळे अंदाजे पाच फूट पाणी आले होते. ही माहिती मिळताच उपविभागीय अधि‌कारी  डॉ. सचिन खल्लाळ, तहसिलदार संजय वारकड यांनी पुलाची पाहणी केली. सुरक्षिततेच्या दृष्टिने सतर्क राहण्यासाठी ग्रामस्थांना आवश्यक सूच‌ना देवून चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी पावसामुळे वारंवार पुलावर पाणी येवून अडचण भासत असल्याचे सांगीतले. 

यावेळी वाजेगाव व  तुप्पा महसूल मंडळाचे मंडळ  अधि‌कारी प्रमोद बडवणे, ग्राम महसूल अधिकारी गौतम  पांढरे, राहेगावचे सरपंच विलास इंगळे, किकीचे सरपंच रवी देशमुख, पांगरीचे सरपंच हनुमंत घोगरे, राहेगावचे पोलीसपाटील संजय इंगळे , किकीचे पोलीस पाटील गोविंद तेलंगे, गोपाळ‌चावडीचे पोलीस पाटील विजय खटके, तुप्पाचे पोलीस पाटील वसंत पल्लेवाड, भायेगावचे  पोलीस पाटील  प्रतिनिधी शिवानंद खोसडे,  रामदास इंगळे, आनंद इंगळे, नरहरी भोंग, राजू इंगळे, शिवाजी किरकण, गजानन किरकण, जळबा तेलंगे, प्रताप मगर आदि उपस्थित होते.

00000




 वृत्त क्रमांक 880

नांदेड तहसील कार्यालयात नैसर्गिक आपत्ती हेल्पलाइन सुरू

नांदेड २० ऑगस्ट : नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांना तातडीने मदत व मार्गदर्शन मिळावे यासाठी तहसील कार्यालय, नांदेड येथे विशेष आपत्ती हेल्पलाइन केंद्र सुरू करण्यात आली आहे. 

या हेल्पलाइनमुळे आपत्तीग्रस्तांना आवश्यक माहिती, मदत व सल्ला एकाच ठिकाणी मिळणार आहे. आपत्तीमुळे होणारे जीवितहानी, मालमत्तेचे नुकसान तसेच तातडीच्या गरजांबाबत त्वरित नोंद घेऊन कार्यवाही करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. नागरिकांनी कोणतीही अडचण, तक्रार किंवा मदतीची गरज भासल्यास 02462-236769 व 7262898815 या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन तहसील प्रशासनामार्फत कऱण्यात येत आहे. 

तहसीलदार यांनी सांगितले की, “आपत्ती ही अचानक येते, परंतु प्रशासन सज्ज असेल तर नुकसान कमी करता येते. या हेल्पलाइनद्वारे प्रत्येक नागरिकापर्यंत शासनाची मदत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.” असे आवाहन तहसीलदार संजय वारकड यांनी केले आहे. 

०००००

वृत्त क्रमांक 879

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध खेळाचे आयोजन  

नांदेड २० ऑगस्ट :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेडच्यावतीने ऑलप्मिक वीर मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिन हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 

तसेच महाराष्ट्राचे सुपुत्र ऑलम्पिक वीर कै.खाशाबा जाधव यांचे स्मरण करून, राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त नांदेड जिल्ह्य़ातील सन 2024-25 या शैक्षणिक वर्षांत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेवुन प्राविण्य प्राप्त केलेल्या प्राविण्य प्राप्त खेळाडुंचा राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 29 ऑगष्ट, 2025 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड द्वारा सन्मान चिन्ह देवुन गौरव करण्यात येणार आहे.

​तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या क्रीडा व खेळाचा प्रचार व प्रसार होत असून अर्थात खेळाची प्रगती साध्य होणे आवश्यक आहे. याकरीता कार्यालयाच्यावतीने 29 ते 31 ऑगष्ट,2025 या कालावधीत खालील खेळाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

हॉकी पॅनल्टी शुट आऊट (19 वर्षे मुले-मुली)- 29/08/2025 – खालसा हायस्कुल, नांदेड

चालण्याची शर्यत (19 वर्षे मुले-मुली) – 30/08/2025 वेळ स. 7 वा. जिल्हा क्रीडा संकुल, नांदेड

बॅडमिंटन व बुध्दीबळ (17 वर्षे मुले-मुली)- 30/08/2025 जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल, नांदेड व खो-खो- तालुका क्रीडा संकुल, सिडको-नांदेड

टेबल टेनिस, स्केटींग व बास्केटबॉल (19 वर्षे मुले-मुली)- दि.31/08/2025 जिल्हा क्रीडा संकुल परिसर व इनडोअर हॉल, नांदेड

मिनी फुटबॉल (19 वर्षे मुले-मुली)- 31/08/2025- इंदिरा गांधी मैदान स्टेडीयम परीसर, नांदेड

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त वरीलप्रमाणे विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून याकरीता जास्तीत खेळाडूंनी सहभाग घ्यावा तसेच सन 2024-25 या शैक्षणीक वर्षात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेवुन प्राविण्य प्राप्त खेळाडुनी आपल्या प्रमाणपञाची सत्यप्रत व नांवे दिनांक 21/08/2025 पर्यन्त जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड येथे जमा करावी व अधिक माहितीकरीता श्रीमती शिवकांता देशमुख (राज्य क्रीडा मार्गदर्शक) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन मा.जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

०००००

वृत्त क्रमांक 878

गुरुवारी पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

देगलूर महाविद्यालयात आयोजन

नांदेड दि. 20 ऑगस्ट :- नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व देगलूर महाविद्यालय देगलूर यांच्यावतीने गुरुवार 21 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10  वा. सांस्कृतीक सभागृह, देगलूर महाविद्यालय, देगलूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजक, शाळा व महाविद्यालय तसेच इतर आस्थापनांच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी गुरुवार 21 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10  वा. देगलूर महाविद्यालय, देगलूर येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. रा.म.कोल्हे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी कार्यालयाचा ई-मेल nandedrojgar०१@gmail.com वर किंवा दूरध्वनी क्रमांक 02462-251674 व योगेश यडपलवार 9860725448 यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविले आहे.

00000

वृत्त क्रमांक 877

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा - कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

नांदेड दि. 20 ऑगस्ट :- मागील पाच ते सहा दिवसांपासून संपूर्ण राज्यात सतत पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने तात्काळ पूर्ण करावेत, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. 

आज हदगाव तालुक्यातील करमोडी येथे भेट देवून त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करुन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार बाबुराव कोहळीकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत व परिसरातील शेतकरी, पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. 

पाच ते सहा दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण राज्यात प्राथमिक अंदाजानुसार 20 लाख 12 हजार एकर शेतीचे नुकसान झाले आहे. यामध्ये एकटया नांदेड जिल्हृयात 2.59 लक्ष हेक्टरवरील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणच्या शेतातील माती वाहून गेलेली आहे. तर जनावरांचेही मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेक घरात पाणी शिरले असून घराची पडझड मोठया प्रमाणात झाली आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे प्रशासनाच्यावतीने सुरु केले आहेत. लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करुन ज्यांचे नुकसान झाले आहे, त्याबाबतचा अहवाल प्राप्त होताच त्यांना शासनाच्यावतीने नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी ग्वाही कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

नांदेड विमानतळावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार आनंदराव बोढारकर, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांनी भेट घेवून नांदेड जिल्ह्यातील पीक नुकसान भरपाई आणि इतर प्रश्नावर चर्चा केली.

00000






वृत्त क्रमांक 878

राहेगाव किकी पुलास उपविभागीय अधिकाऱ्यानी दिली भेट

पूर समस्या निवारणासाठी ग्रामस्थांशी साधला संवाद

नांदेड दि. 20 ऑगस्ट :- नांदेड तालुक्यातील राहेगाव-किकी येथील पुलावर सततच्या पावसामुळे पाणी येवून दोन गावांचा संपर्क तुटल्याची माहिती मिळताच नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसिलदार संजय वारकड यांनी 19 ऑगस्ट रोजी स्थळ पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या व समस्याचे कायमस्वरूपी निराकरण करण्याच्या अनुषंगाने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

तुप्पा महसूल मंडळातील राहेगाव व किकी या दोन गावांना जोडणारा पुल अरूंद व कमी  उंचीचा आहे. त्यामुळे गोदावरी नदी पात्रातील पाणी पातळी वाढताच पुलावर पाणी येवून वाहतूक ठप्प होऊन  या दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. अलिकडे झालेल्या सततच्या पावसामुळे अंदाजे पाच फूट पाणी आले होते. ही माहिती मिळताच उपविभागीय अधि‌कारी  डॉ. सचिन खल्लाळ, तहसिलदार संजय वारकड यांनी पुलाची पाहणी केली. सुरक्षिततेच्या दृष्टिने सतर्क राहण्यासाठी ग्रामस्थांना आवश्यक सूच‌ना देवून चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी पावसामुळे वारंवार पुलावर पाणी येवून अडचण भासत असल्याचे सांगीतले. 

यावेळी वाजेगाव व  तुप्पा महसूल मंडळाचे मंडळ  अधि‌कारी प्रमोद बडवणे, ग्राम महसूल अधिकारी गौतम  पांढरे, राहेगावचे सरपंच विलास इंगळे, किकीचे सरपंच रवी देशमुख, पांगरीचे सरपंच हनुमंत घोगरे, राहेगावचे पोलीसपाटील संजय इंगळे , किकीचे पोलीस पाटील गोविंद तेलंगे, गोपाळ‌चावडीचे पोलीस पाटील विजय खटके, तुप्पाचे पोलीस पाटील वसंत पल्लेवाड, भायेगावचे  पोलीस पाटील  प्रतिनिधी शिवानंद खोसडे,  रामदास इंगळे, आनंद इंगळे, नरहरी भोंग, राजू इंगळे, शिवाजी किरकण, गजानन किरकण, जळबा तेलंगे, प्रताप मगर आदि उपस्थित होते.

00000




    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...