Monday, August 11, 2025

वृत्त क्रमांक 831   

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे बुधवारी आयोजन  

 

नांदेड दि. 11 ऑगस्ट :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगारची संधी उपलब्ध व्हावी यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन बुधवार 13 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून कंधार तालुक्यातील कंधार कॉलेज ऑफ फार्मसी बाळांतवाडी येथे करण्यात आले आहे. 

 

जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व कंधार कॉलेज ऑफ फार्मसी बाळांतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यात नामांकित उद्योजकशाळा व महाविद्यालय तसेच इतर आस्थापनांच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. पासून कंधार कॉलेज ऑफ फार्मसी बाळांतवाडी येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.


अधिक माहितीसाठी मासहायक आयुक्तजिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रआनंदनगर रोडबाबानगर नांदेड येथे ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com संर्पक क्र. 02462-251674 योगेश यडपलवार 9860725448 संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

 0000

 वृत्त क्रमांक 830 

शासकीय तंत्रनिकेतन येथे प्रवेशासाठी संधी

 

नांदेड दि. 11 ऑगस्ट :- शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2025-26 प्रवेशासाठी संस्थेत जागा रिक्त राहिल्यास 13 ऑगस्ट रोजी अतिरिक्त प्रवेश फेरी घेण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी मुळ कागदपत्रे व आवश्यक त्या शुल्कासह सकाळी 8 ते 11 यावेळेत माहिती व तंत्रज्ञान इमारत शासकीय तंत्रनिकेत नांदेड येथे उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी संपर्क 9421871893, 9766809179 वर संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. नागेश जानराव यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक 829   

जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

 

नांदेड दि. 11 ऑगस्ट :- गोकुळ अष्टमी, दहीहंडी, पोळा सण, गणेश उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक मंगळवार 12 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे दुपारी 4.30 वा. आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी बैठकीस वेळेवर उपस्थित राहुन मार्गदर्शन करावे, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक 828   

‘हर घर तिरंगा’ अभियानात कार्यालयासह नागरिकांनी सहभाग घ्यावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

 

तिसऱ्या टप्पा  13 ते 15 ऑगस्ट कालावधीत  

 

नांदेड दि. 11 ऑगस्ट :- शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे हर घर तिरंगा हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शेवटचा टप्पा 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आयोजित केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात प्रत्येक घरावरसर्व शासकीय कार्यालयेखासगी आस्थापनांवर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. 

 

या कालावधीत प्रत्येक घरावरकार्यालयावर राष्ट्रध्वज फडकविणे अभिप्रेत आहे. त्या दृष्टिकोनातून संबंधित विभागकार्यालयांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेण्यात आली. या बैठकीस विविध विभागाचे तालुका व जिल्हास्तरावरील अधिकारी उपस्थित होते. 

 

हर घर तिरंगा अभियानांतर्गत विविध कार्यक्रमउपक्रमांचे आयोजन करण्याबाबत केंद्र व सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात विविध कार्यक्रमउपक्रम हाती घेऊन हे अभियान उत्साहात यशस्वी साजरा करण्याची कार्यवाही सर्व कार्यालय प्रमुखांनी करावी. जिल्ह्यातील प्रमुख शासकीय महत्त्वाची स्थळेपाणीसाठे आणि वारसास्थळे या ठिकाणी तिरंगा रोषणाई व स्वच्छता करण्याची सूचना यावेळी देण्यात आली. या अभियानाची अधिक माहितीस्वयंसेवक नोंदणीसेल्फी अपलोड करण्यासाठी व तपशीलवार माहितीसाठी नागरिकांनी https://harghartiranga.com या संकेतस्थळाला भेट द्यावीअसे आवाहन करण्यात आले आहे.

0000







 

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...