Thursday, August 7, 2025

वृत्त क्रमांक 824

विशेष सहाय्य योजनेत 81 लाभार्थ्यांचे डीबीटी केले

नांदेड, दि. ७ ऑगस्ट:- नांदेड तालुक्यातील विशेष अर्थसाहाय्य योजनेतील डिबीटी न झालेल्या लाभार्थ्यांचे डीबिटी , आधार अपडेट,  अनुदान वाटपाचे ईकेवायसी करून घेण्यासाठी मंडळ  अधिकारी तरोडा बुद्रुक व वसरणी मंडळ अधिकारी कार्यालयात आज महसूल सप्ताहात विशेष कॅम्प  घेण्यात आले.

 1  ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत महसूल सप्ताह आयोजित  करण्यात  आला होता. उप विभागीय  अधिकारी नांदेड डॉ. सचिन  खल्लाळ  व तहसिलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शन नुसार विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात  आले होते. विशेष सहाय्य योजनेचे डीबीटी न झालेले लाभार्थी यांना  ग्राम महसूल  अधिकारी व महसूल  सेवक मार्फत संपर्क साधून लाभार्थी यांचे कॅम्पमध्ये डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांचे डीबीटी , आधार अपडेट, अनुदान वाटपाचे ई केवायसी करूण घेण्यात आली. तसेच शिधापत्रिका धारकांचे ईकेवायसी करुन घेण्यात  आले.सदर कॅम्पमध्ये परिविक्षाधिन तहसिलदार अभयराज व नायब तहसीलदार महसूल  सुनील माचेवाड यांनी भेटी देवून मार्गदर्शन केले. 

कॅम्प यशस्वी करण्यासाठी पोस्ट विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच आधार किट सेतू संचालक व महसूल कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.  कॅम्प यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी वाजेगाव व तुप्पा प्रमोद बडवणे,मंडळ अधिकारी तरोडा बु व वसरणी शिवानंद स्वामी,नांदेड ग्रामिण अनिरुद्ध जोंधळे, शिरिश येवते,कुणाल जगताप,नन्हू कानगुले यांचे सहकार्य लाभले. ग्राम महसूल अधिकारी वसरणी आर पी मुंडे, ग्राम महसूल अधिकारी धनेगाव/ मुजामपेठ दिपक सोनटक्के, ग्राम महसूल अधिकारी वांगी दिलीप पवार, ग्राम महसूल अधिकारी वडगाव प्रिंयका कापसे, ग्राम महसूल अधिकारी वाजेगाव एम के पाटील, असरजन सज्जाचे ग्राम महसूल अधिकारी  मारूती जमदाडे, कौठा सज्जाचे ग्राम महसूल अधिकारी  मारुती श्रीरामे, ग्राम महसूल अधिकारी  गोपीनाथ कल्याणकर ,शिवाजी तोतरे, दयानंद पाटील, अंकुर सकवान,भास्कर इपर , मोहन कदम, अश्विनी गिरडे ,संगोयो विभागाचे महसूल सहाय्यक सुनिता पोरडवार,प्रतिका मुदगुलवार,दिपाली काळे,आरती सारंग,ऑपरेटर संतोष वाघमारे तसेच पोस्ट ऑफिसचे कर्मचारी गोविंद मुळे,बापूसाहेब येलमेकर सिडको टी एस ओ,  रेणुका वडजे, तेजस्विनी घोडके, संतोष निर्मले, सय्यद राऊफ, सय्यद मेहराज, बालाजी नायके व आधार कार्ड किट चे संचालक गंगाधर गिरी,ऋषिकेश मेहकर, शेख नदीम हे उपस्थित होते.

या कॅम्पमध्ये अपंग, विधवा व वयोवृद्ध नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता, डीबीटी झालेल्या लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेचा योजनेचा लाभ मिळणार आहे.या कॅम्पच्या अनुषंगाने लाभार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यात आल्या.

०००००














वृत्त क्रमांक 823

जिल्हाधिकाऱ्यांनी केली ई पीक पाहणी

मुदखेड तालुक्यातील खंबाळा गावाला जिल्हाधिकाऱ्याची भेट 

नांदेड, दि. ७ ऑगस्ट:- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत आज मुदखेड तालुक्यातील खंबाळा येथे रोजगार हमी योजनेचे अंतर्गत फुलशेतीची पाहणी करण्यात आली . यावेळेस जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी स्वतः ई पीक पाहणी केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांना स्वतःची इ पिक पाहणी स्वतः करूनकरून घ्यावी असे आव्वाहान यावेळी केले. याप्रसंगी मुदखेड तालुक्याचे तहसीलदार आनंद देऊळगावकर, गटविकास अधिकारी शेखर देशमुख संबंधित गावाचे ग्रामपंचायत अधिकारी, ग्राममहसूल अधिकारी मंडळाधिकारी, रोजगार हमी योजनेची अधिकारी आणि संबंधीत शेतकरी उपस्थित होते.

०००००




 वृत्त क्रमांक 822

प्राथमिक आरोग्य केंद्र मुगट येथे जागतीक स्तनपान सप्ताह समारोप

नांदेड, दि.७ ऑगस्ट:- आज प्रा.आ. केंद्र मुगट येथे जागतीक स्तनपान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रम दि. ०१ ते ०७ ऑगस्ट २०२५ पर्यंत गरोदर स्त्रीया, स्तनदा माता व ०६ महीण्याचे बालके यांची आशा, आरोग्य सेविका व समुदाय आरोग्य अधिकारी यांचे मार्फत घरोघरी भेटी देवून तपासणी करण्यात आली. गरोदर मातेला व स्तनदा मातेला आहाराचे व स्तनपानाचे महत्व समजावून सांगण्यात आले. योग्य पध्दतीने स्तनपान करणे, बाळाला पुरक आहार या बद्यल मार्गदर्शन करण्यात आले.

सदरल कार्यक्रमास उदघाटक म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अनन्या रेडडी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रशांत थोरात, तहसीलदार मुदखेड आनंद देऊळगावकर, डॉ. शिवशक्ती पवार जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी नांदेड, श्रीकांत देशमुख, गटविकास अधिकारी मुदखेड, डॉ. संजय कासराळीकर तालुका आरोग्य अधिकारी मुदखेड, श्रीमती शिवगंगा घोंडगे बालविकास प्रकल्प अधिकारी मुदखेड, तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी, सर्व आशा कार्यकर्ती व परिसरातील माता व बालके यांची मोठ्या संख्येने उपस्थीती होती.

जागतीक स्तनपान सप्ताहाच्या दरम्यान मा. मु.का.अ.जि.प. नांदेड यांच्या मार्गदर्शना नुसार महिलांसाठी हिरकणी माता पुरस्कार व बालकांसाठी बाळकृष्ण पुरस्कार घोषीत करुन मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमा दरम्यान समुदाय आरोग्य अधिकारी यांनी मातांना स्तनपानाचे महत्व समजवण्यासाठी पथनाटयाचे सादरीकरण केले. तसेच आरोग्य सेविका श्रीमती वाघमारे यांनी व आशा श्रीमती संगीता आठवले यांनी स्तनपानाचे महत्व विषद करणारे गीत सादर केले.

समारोपपर भाषनामध्ये जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी स्तनपानाचे महत्व विषद करण्या बरोबरच या पुढेही अशाच प्रकारे माता व बालकांच्या आरोग्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे सुचविले . तसेच केलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करुन मुदखेड आरोग्य विभागाचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालूक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यीका, सर्व आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती यांनी मेहनत घेतली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेश बदनापुरकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. संजय कासराळीकर यांनी केले.

०००००

 विशेष लेख                                                                                                                             

मुख्यमंत्री सहाय्यता निधी ; गरजू रुग्णांसाठी जीवनदायी आधार ! 

राज्यातील गरजू व पात्र रुग्णांना दुर्धर आजारांवरील उपचारासाठी मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्याकडून मदत करण्यात येत आहे. या कक्षाकडून मिळणारी मदत गरजू व पात्र रुग्णांच्या जीवनात आशेचा किरण ठरत असून, अनेक गरजू रुग्णांना या निधीच्या माध्यमातून मदतीचा ओघ दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.  

नांदेड जिल्ह्यातही मागील सात महिन्यात 483 रुग्णांना 3 कोटी 99 लाख 49 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मुख्यमंत्री सचिवालय,  मुख्यमंत्री  सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय मुंबई  यांच्यामार्फत करण्यात आले. नुकताच नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे राहणारा रंगनाथ संतराम पवार या 27 वर्षीय युवकाला अपघातात गंभीर झाल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रीया व उपचारासाठी 1 लाख रुपयांची मदत कक्षाकडून करण्यात आली आहे. 

ही योजना गरजू पात्र रुग्णांसाठी खूप लाभदायक ठरत असून योग्य वेळी उपचारासाठी मदत तात्काळ करण्यात येत आहे. याबाबत रंगनाथ संतराम पवार यांच्या कुटूंबियानी या मदतीबाबत शासनाचे व मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे आभार मानले आहेत. 

लोहा येथील रंगनाथ संतराम पवार हा युवक घरची दोन एकर शेती करुन छोटे मेडीकलचे दुकान चालवितो. दैनंदिन कामकाज करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. अचानक काही दिवसांपूर्वी त्यांचा लोहा येथील शिवाजी चौक येथे त्यांच्या दुचाकीला अपघात होवून डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे कुटूंबियानी यांना तात्काळ नांदेड येथील यशोसाई क्रिटीकल केअर सेंटर रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. उपचारासाठी रुग्णांला जास्तीचे पैसे लागणार होते. एवढे पैसे रंगनाथ पवार यांच्या कुटुंबाकडे नव्हते. रुग्णांच्या घरात त्यांच्याशिवाय कमविणारे दुसरे कोणीही नाही. नातेवाईकांनी पैशांची जुळवाजुळव करुन बाकीच्या पैशासाठी त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे मदतीसाठी अर्ज केला. या कक्षाकडे सर्व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली व या युवकांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, नांदेड यांच्याकडून 1 लाख रुपयांची आर्थीक मदत मिळाली अशी माहिती रुग्णांचे काका गोपाल पवार यांनी दिली. ही बाब आमच्यासाठी व आमच्या कुटूंबासाठी खूप समाधानकारक होती. या मदतीमुळे माझ्या पुतण्यावर यशस्वी उपचार करण्यात आल्याने तो आता सुखरुप आहे. 

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष नांदेड यांच्या मदतीमुळे माझ्यासारख्या अनेक गरजू रुग्णांना अडचणीच्या वेळी मदतीचा हा हात म्हणजे खूप मोठा आधार मिळत असल्याचे  असल्यांचे रुग्णांच्या कुटूंबियांनी सांगितले. आमच्या सारख्या अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या कुटूंबातील व्यक्तीला मोठा आजार, गंभीर अपघात झाल्यास अशा घटनेतून जीव वाचवण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीना वेळप्रसंगी उसनवारी, घर, शेत गहाण टाकून पैशाची जुळवाजुळव करावी लागते. मात्र मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष नांदेड यांच्या मदतीमुळे आम्हाला उपचारासाठी 1 लाख रुपयांची जी मदत झाली, यामुळे आम्ही शासनाचे खूप आभारी आहोत असे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. ही मदत अर्ज केल्यानंतर व कागदपत्रांची पूर्ण पुर्तता केल्यानंतर तात्काळ देण्यात आली याचेही समाधान त्यांनी व्यक्त केले. 

राज्यभरात अशा अनेक गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष  वरदान ठरत आहेत. जिल्हास्तरावर हे मदत कक्ष स्थापन झाल्यामुळे जिल्ह्यातील गरजू रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मुंबई मंत्रालय येथे जाण्याची आवश्यकता राहीली नाही. त्यांना आता आपल्या स्वत:च्या जिल्ह्यातच मदतीसाठी अर्ज करता येत आहे. तसेच प्रस्तावाची सद्यस्थिती येथेच  पाहण्यास मिळत आहे.  

या योजनेअंतर्गत कोणकोणत्या आजारावर मदत मिळते ? 

कॉक्लियर इम्प्लांट,  हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, मूत्रपिंड प्रत्यारोपण,  फुफ्फुस प्रत्यारोपण, अस्ती मज्जा प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, खुब्याचे प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, कर्करोग औषधोपचार किरणोपचार, अस्थिबंधन, नवजात शिशूंचे संबंधित आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, रस्ते अपघात, लहान बालकांच्या संबंधित शस्त्रक्रिया,मेंदूचे आजार, हदयरोग, डायलिसिस, जळीत रुग्ण, विद्युत अपघात, विद्युत जळीत रुग्ण या आजारावर मदत मिळते. 

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अर्ज कसा करावा ? 

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयातून अर्ज मिळवता येतो. आवश्यक कागदपत्रांसह संपूर्ण तपशील भरावा. अर्ज मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा मंत्रालय मुंबई येथे ईमेलद्वारे aao.cmrf-mh@gov.in सादर करावा. त्यानंतर अर्ज प्राप्त झाल्यावर कागदपत्रांची व पात्रतेची पडताळणी करुन मंजुरीनंतर मदतीची रक्कम थेट रुग्णालयाच्या खात्यात जमा केली जाते. 

अलका पाटील

उपसंपादक,जिल्हा माहिती कार्यालय,नांदेड

00000



वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...