वृत्त क्रमांक 1122
27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत
दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्याच्या सूचना
नांदेड, दि. 24 ऑक्टोबर : राज्यात 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी ‘दक्षता- आपली सामायिक जबाबदारी’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. भ्रष्टाचार निर्मुलनाच्या प्रतिज्ञेने कार्यक्रमाचा प्रारंभ करावा. सदर प्रतिज्ञा विभाग व कार्यालय प्रमुख किंवा जेष्ठतम अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी प्रतिज्ञा करावी व प्रतिज्ञा केल्यानंतर मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री यांनी या सप्ताहानिमित्त दिलेला संदेश उपस्थितांना वाचून दाखवावा अशा सूचना शासन परिपत्रकानुसार दिल्या आहेत.
सप्ताह बाबत आयोजित करावयाच्या कार्यक्रमाबाबत दि. 14 ऑक्टोबर 2025 रोजीच्या शासन परिपत्रकामध्ये सविस्तर कळविले आहे. तरी 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सर्व कार्यालय व विभागप्रमुखांनी दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment