वृत्त क्रमांक 1123
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा
नांदेड, दि. 24 ऑक्टोबर :- राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार हे शनिवार 25 ऑक्टोबर 2025 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
शनिवार 25 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबई विमानतळ येथून विमानाने सकाळी 10 वा. श्री गुरू गोविंद सिंग जी विमानतळ नांदेड येथे आगमन. त्यानंतर सकाळी 10.10 वा. हेलिकॉप्टरने प्रयाण. सकाळी 10.30 वा. गोरठा हद्दीतील कोर्ट ऑफिसच्या मोकळया जागेवर हेलिपॅड ता. उमरी जि. नांदेड येथे आगमन. नंतर मोटारीने प्रयाण. सकाळी 10.40 वा. मोंढा मैदान, उमरी ता. उमरी, जि. नांदेड येथे आगमन. सकाळी 10.40 वा. कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 12.25 वा. मोटारीने प्रयाण. दुपारी 12.30 वा. श्री. शिरीष देशमुख गोरठेकर यांचे निवासस्थान, गोरठा, ता. उमरी जि. नांदेड येथे आगमन. दुपारी 12.30 वा. राखीव. दुपारी 1.15 वा. मोटारीने प्रयाण. दुपारी 1.20 वा. गोरठा हद्दीतील कोर्ट ऑफिसच्या मोकळया जागेवरील हेलिपॅड ता. उमरी जि. नांदेड येथे आगमन. दुपारी 1.25 वा. हेलिकॉप्टरने प्रयाण. दुपारी 1.40 वा. देगलूर महाविद्यालय हेलिपॅड, देगलूर, ता. देगलूर जि. नांदेड येथे आगमन. नंतर मोटारीने प्रयाण. दुपारी 1.50 वा. हजरत शाह जियावोद्दीन रफाई दर्गा येथे आगमन व भेट. नंतर मोटारीने प्रयाण. दुपारी 2 वा. मोंढा मैदान, देगलूर, ता. देगलूर जि. नांदेड येथे आगमन व कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती. सायं. 4 वा. मोटारीने प्रयाण. सायं. 4.5 वा. श्री. लक्ष्मीकांत पद्यमवार यांचे निवासस्थान देगलूर येथे आगमन. सायं. 4.5 वा. राखीव. सायं. 4.35 वा. मोटारीने प्रयाण. सायं. 4.40 वा. देगलूर महाविद्यालय हेलिपॅड, देगलूर येथे आगमन. सायं. 4.45 वा. हेलिकॉप्टरने प्रयाण. सायं.5 वा. श्री. गुरु गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथे आगमन. सायं. 5.5 वा. विमानाने पुणेकडे प्रयाण करतील.
00000
No comments:
Post a Comment