Monday, October 20, 2025

19 ऑक्टोबर 2025

 वृत्त क्रमांक  1115

यंदा राज्यात दहा ठिकाणी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन 

दिल्लीत देखील दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन  

कुसुम सभागृह नांदेड येथे भव्य संगीत दिवाळी पहाट सांस्कृतिक कार्यक्रम

दि. १9 ऑक्टोबर-  सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने रसिकांची दिवाळी स्वर संगीताने उजळण्यासाठी  गाजलेल्या गीतांचा व भावगीतांचा तसेच शास्त्रीय संगीताचा बहारदार कार्यक्रम दिवाळी पहाट आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यमंत्री मा. ॲड आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि श्री किरण कुलकर्णी (भाप्रसे)मा.सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनातून साकारत आहे. 

दि. २३ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे  ७:०० वाजता कुसुम सभागृह नांदेड येथे रंगणाऱ्या या कार्यक्रमात संज्योती जगदाळे संगीतातील लावण्यवती पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध सिने व पार्श्वगायिका तथा उपविजेती -सुर नवा ध्यास नवा-पर्व 5 तसेच निवेदक  बापु दासरी (सुप्रसिद्ध कवी व गझलकार),महेश जैन (गायक/संगीत संयोजक), अंकुश डाखोरे (तबला वादक),रागेश्री जोशी (प्रसिद्ध गायिका), गणेश इंगोले (मृदंग), निवेदिता जोशी (प्रसिद्ध गायिका), राज लामटिळे (की बोर्ड), शिवकुमार मठपती (प्रसिद्ध गायक), किशोर आवटे (ऐक्टोपॅड) हे गायक व वादक कलाकार गाजलेल्या गीतांचा व भावगीतांचा कार्यक्रम रसिकांसाठी सादर होणार आहेत. हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना विनामूल्य पाहता व ऐकता येणार आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहुन आश्वाद घ्यावे, असे आवाहन श्री. विभीषण चवरे संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...