वृत्त क्रमांक 1085
भूमि लोक अदालतीचे सोमवार 13 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजन
नांदेड दि. 11 ऑक्टोबर - भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर यांच्या स्तरावर प्रलंबित असलेले अर्धन्यायिक प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी भूमी लोक अदालतचे आयोजन सोमवार 13 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे.
भूमि अभिलेख विभागात उप अधीक्षक भूमि अभिलेख, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख व उपसंचालक भूमि अभिलेख, यांचे स्तरावर अर्धन्यायीक स्वरूपाचे कामकाज चालते. तथापी सदरचे विविध टप्प्यावर प्रलंबित असलेल्या अर्धन्यायीक प्रकरणांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने सदर प्रकरणांत संबंधितांना न्यायदानास विलंब होत आहे.
विविध टप्यावर प्रलंबित असलेल्या अर्धन्यायीक प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी भूमि लोक अदालत आयोजन करण्याबाबद निर्देश प्राप्त झाले आहेत.
भूमि लोक आदालतीच्या माध्यमातून जनतेला जलद गतीने न्याय मिळवून देणे तसेच एकंदरीत समाजामध्ये सलोखा आणि सामंजस्य निर्माण होऊन सौहार्दपूर्ण वातावरण निर्मितीसाठी शासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणून भूमि लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
सवव प्रलंचित असलेली अर्धन्यायीक स्वरूपाची प्रकरणे जलद गतीने निपटारा होण्यासाठी तसेच सर्व संबंधित नागरिकांचे वेळेची बचत होण्याचेदृष्टीने भूमि अभिलेख विभागातील उपसंचालक, भूमि अभिलेख, छत्रपती संभाजी नगर प्रदेश, छत्रपती संभाजी नगर यांचे स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्धन्यायिक प्रकरणात भूमि लोक अदालतचे आयोजन सोमवार 13 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात आले आहे.
सर्व संबंधित पक्षकार, वादी/प्रतिवादी, अपीलदार/जावदार, त्यांचे विधीज्ञ व नागरिक यांनी उपसंचालक भूमि अभिलेख, छत्रपती संभाजीनगर यांचे स्तरावर प्रलंबित असलेल्या सर्व प्रकारच्या अर्धन्यायीक प्रकरणात तडजोडीने प्रकरण निकाली करणेबाबत 13 ऑक्टोबर 2025 रोजी भूमि अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी, छत्रपती संभाजीनगर दमडी महल, पंचायत समिती शेजारी, गणेश कॉलनी, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेल्या भूमि लोक अदालतीमध्ये उपस्थित राहून आपली प्रकरणे तडजोडीने निकाली करणेबाबत आवश्यक ते सहकार्य करावे.
भूमि लोक अदालतीमध्ये अपिलातील दोन्ही पक्षकार स्वयंप्रेरणेने अथवा वकीलामार्फत तडजोड करण्यासाठी या न्यायाधिकरणाकडे अर्ज दाखल करू शकतात. प्रलंबित असलेली अर्धन्यायीक स्वरूपाची प्रकरणे भूमि लोक अदालतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निकाली करणेसाठी आयोजीत भूमि लोक अदालतीमध्ये सहभागी होवून ही भूमि लोक अदालत यशस्वी करणेसाठी उपसंचालक भूमी अभिलेख किशोर जाधव यांनी आवाहन केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment