Thursday, September 11, 2025

 जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन 

छत्रपती संभाजीनगर, दि.11, (विमाका) :- जागतिक कौशल्य विकास स्पर्धा दर दोन वर्षानी होते. ही जगातील सर्वांत मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्ठता स्पर्धा असून जगभरातील २३ वर्षाखालील तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ही स्पर्धा ऑलिम्पिक खेळासारखीच आहे. २ वर्षानी आयोजित केली जाणारी सदर जागतिक कौशल्य स्पर्धा सन २०२६ मध्ये शांघाई येथे आयोजित होणार आहे. याकरीता जिल्हा, विभाग, राज्य आणि देशस्तरावर स्पर्धा घेतली जाणार असून याद्वारे गुणवान कौशल्याधारक पात्र स्पर्धक निवडले जाणार आहेत. 

त्यानुसार सदर जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ मधील जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेकरीता पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे. 

पात्रता निकष

१. जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ करीता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे.

२. यासाठी वयोमर्यादा : कमीत कमी १६ वर्षे जास्तीत जास्त दि. १ जानेवारी, २००४ किंवा तद्नंतरचा जन्म दिनांक असणे अनिवार्य आहे.

३. सदर स्पर्धा ६३ विविध कौशल्य क्षेत्रांसाठी आयोजित करण्यात आली आहे.

४.स्पर्धतील सहभागासाठी उमेदवारांनी https://www.skilindiadigital.gov.in या लिंकवर भेट देवुन दि. ३०.०९.२०२५ पर्यंत नोंदणी करून आपला सहभाग निक्षित कराया 

जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ साठी जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरून प्रतिभासंपन, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेकरीता सर्व शासकिय व खाजगी औद्यौगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन महाविद्यालये, एमएसएमई टूल रूम्स, अभियांत्रिकी महाविद्यालये, विद्यापीठे, हॉस्पिटेलिटी इंस्टिट्यूट, स्किल ट्रेनिंग इंस्टीट्यूट, कला, वाणिज्य व विज्ञान शाखेची कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, इतर सर्व प्रशिक्षण संस्था यांनी विहीत वयोमर्यादेतील इच्छूक प्रतिभासंपत्र व कुशल उमेदवारांचे नामांकन या स्पर्धेसाठी करावे असे आवाहन उप आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे. 

*****

No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...