Monday, September 1, 2025


गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून यानिमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महाराष्ट्राबाहेर मराठीबहुल असणाऱ्या प्रदेशात पाच ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची असून या कार्यक्रमाकरिता सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. रसिक प्रेक्षकांनी या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.


 

No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...