वृत्त क्रमांक 999
29 सप्टेंबर रोजी शौर्य दिनाचे आयोजन
नांदेड दि. 23 सप्टेंबर :- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नांदेड येथे 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता शौर्य दिवस साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व माजी सैनिक तसेच विरनारी, वीरमाता-पीता, शहीद जवानांचे नातेवाईक व समाजातील देशभक्त यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किरण अंबेकर यांनी कळविले आहे.
देशभरात 29 सप्टेंबर हा दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो. 29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्य दलाने उरी सेक्टर मधील अतिरेकी भ्याड हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक द्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याची ही अभिमानस्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यत व्यापक प्रमाणात पोहोचविण्यासाठी तसेच जनतेस देश भक्तीची ज्वाला मोठया प्रमाणात जागविण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी माजी सैनिकांचा सन्मान करुन शौर्य दिवस साजरा करण्यात येतो.
00000
No comments:
Post a Comment