इसापूर प्रकल्पातून रात्री 9 वाजता पुन्हा विसर्ग वाढ
हवामान विभागाकडून आजपासून पुढील 5 दिवसांच्या कालावधीत यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तो लक्षात घेऊन इसापूर धरण पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने व पाणी पातळीमध्ये घट करण्याच्या दृष्टीने आज 26 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजता चालू असलेल्या विसर्गात आणखी दोन गेट उघडून वाढ करण्यात येणार आहे. तरी पैनगंगा नदीच्या दोन्ही तिरावरील नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन पूर नियंत्रण कक्ष इसापूर प्रकल्प यांनी केले आहे.
इसापूर धरणातून विसर्ग वाढ ; उर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरण
ROS नुसार धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज 26 सप्टेंबर 2025 रोजी 8 वाजता आणखी 4 गेट 0.50 मीटरने उघडण्यात आले आहेत. सद्यस्थितीत इसापूर धरणाच्या सांडव्याचे 9 गेट 0.50 मीटर ने चालू असून एकूण 9 गेटद्वारे पैनगंगा नदीपात्रात 15273 क्युसेक्स (432.491 क्युमेक्स) इतका विसर्ग सुरू आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी. - इसापूर धरण पूरनियंत्रण कक्ष
00000
No comments:
Post a Comment