वृत्त क्रमांक 1026
शासनमान्य ग्रंथांच्या यादीत समावेशासाठी 15 ऑक्टोबरपर्यत प्रथम आवृत्ती पाठविण्याचे आवाहन नांदेड दि. 29 सप्टेंबर :- शासनमान्य ग्रंथाची यादीसाठी सन 2024 यावर्षासाठी कॅलेडर वर्ष 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 मध्ये प्रकाशित झालेल्या मराठी भाषेतील ग्रंथाची निवड करण्यासाठी आणि शासनमान्य ग्रंथांच्या यादीत समावेश होण्याच्या दृष्टीने प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथाची प्रत्येकी एक प्रत विनामुल्य ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, नगर भवन, टाऊन हॉल, मुंबई-400 001 यांच्याकडे 15 ऑक्टोबर 2025 पर्यत पाठविण्यात यावी असे आवाहन ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे.
तसेच सन 2024 या वर्षात प्रकाशित झालेले ग्रंथ जर यापूर्वी संचालनालयास पाठविले असल्यास पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही. सदर निवेदन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in व ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ठेवण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment