Friday, August 22, 2025

वृत्त क्रमांक 894

सोमवारी किनवट येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड दि. 22 ऑगस्ट :- नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व हुतात्मा गोंडराजे शंकरशाह रघुनाथशाह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 25 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10  वा. हुतात्मा गोंडराजे शंकरशाह रघुनाथशाह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, किनवट येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजक, शाळा व महाविद्यालय तसेच इतर आस्थापनांच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी सोमवार 25 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10  वा. हुतात्मा गोंडराजे शंकरशाह रघुनाथशाह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किनवट येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. रा.म.कोल्हे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी कार्यालयाचा ई-मेल nandedrojgar०१@gmail.com वर किंवा दूरध्वनी क्रमांक 02462-251674 व योगेश यडपलवार 9860725448 यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...