Friday, August 15, 2025

 वृत्त क्रमांक 862 

जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक संपन्न 

नांदेड, दि. 15 ऑगस्ट :-  कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्यावतीने निर्देशानुसार  जिल्ह्यातील जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक नुकतीच सोमवार 11 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेण्यात आली. या बैठकीस विविध बँकेचे प्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते. 

बैठकी दरम्यान जनसमर्थ किसान क्रेडिट कार्ड पोर्टलचा प्रभावी वापर कसा करावा याबाबत पीपीटी सादरीकरणाद्वारे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित सदस्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली. बैठकी चालू महिन्यात 1 हजार नवीन शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड कर्ज मंजूर करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. यासोबतच, केसीसी KCC नूतनीकरण संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच सॅच्युरेशन विषयावर सविस्तर चर्चा व विचारमंथन करण्यात आले. किसान क्रेडिट कार्ड पोर्टल अंतर्गत सर्व बँकांनी जास्तीत जास्त कर्ज प्रकरणे करून आपले उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी व्यवस्थापक बी. जी. सोनकांबळे यांनी यावेळी केले.

0000

No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...