Monday, August 4, 2025

 वृत्त क्रमांक 808 

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत हृदय शस्त्रक्रियेसाठी 18 बालके मुंबईकडे रवाना

 

नांदेड दि. 4  ऑगस्ट :  श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयातून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयाचे आजार असलेल्या सदृश्य बालकांची 2 डी इको तपासणी शिबिर 16 जुलै रोजी घेण्यात आले होते. या शिबिरामधून 18 हृदय शस्त्रक्रियेसाठी पात्र  झालेल्या बालकांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मुंबई येथे आज रवाना करण्यात आले.

 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय पेरकेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुखअतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पांडुरंग पावडेनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ राजाभाऊ बुट्टे यांच्या नेतृत्त्वाखाली या बालकांना तपासणी करण्यात आली होती. सदरील कार्यक्रमांतर्गत मागील वर्षीपासून 125 बालकांच्या ह्र्दय शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आलेल्या असून  इतर आजाराच्या 634 शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत.  एकूण 76 बालकांना श्रावण यंत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आल्याने त्यांचा बहिरेपणा दूर झाला आहे. यामुळे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत तपासणी करण्यात आलेल्या शाळाअंगणवाडी मधील बालकांची आरोग्य तपासणी होऊन त्यांना असलेल्या आजारापासून मुक्त करण्यासाठी वेळीच औषधोपचार आणि गरजेनुसार शस्त्रक्रिया केल्या जात असल्याने पालक व शिक्षक यांच्याद्वारे समाधान व्यक्त होत आहे.

 

याकामी अनिल कांबळे आरबीएसके जिल्हा कार्यक्रम समन्वयकविठ्ठल तावडे डीइआयसी व्यवस्थापक श्रीमती अनिता चव्हाण आणि गुनानंद सावंत तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत असलेले वैद्यकीय अधिकारीकर्मचारी व डीइआयसी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी  यांनी परिश्रम घेतले.

00000





No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...